तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी चैन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये ५ डिसें बर रोजी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 73 दिवसांपासून जयललितांवर उपचार सुरू होते. मात्र 4 डिसेंबरच्या संध्याकाळी कार्डिएक अरेस्ट च्या झटक्यानं तर जयललिता यांची प्रकृती अधिकच खालावली आणि उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. Heart attack आणि Cardiac arrest यामध्ये नेमका फरक काय असतो ?
ताप आणि डिहायड्रेशन च्या त्रास होत असल्याने २२ सप्टेंबर रोजी त्यांना चै न्न ई तील आपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवासांपासून जय ललितांवर उपचार सुरू होते. देशा-परदेशातील तज्ञ डॉक्टर मंडळी त्यांच्यावर उपचार करीत होते. दरम्यान उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत जयललितांच्या प्रकृती मध्ये कमालीची सु धारणा देखील आढळून आली होती. त्यानुसार जय ललितांना आय सी यु मधून जनरल रूम मध्ये हलवण्यात आले होते. नक्की वाचा Sudden cardiac arrest चा धोका वेळीच कसा ओळखाल ?
मात्र ४ डिसेंबर च्या संध्याकाळी जयललितांना तीव्र कार्डी एक अरेस्ट चा झटका आला. ह्रदय विकाराच्या या झटक्यानंतर त्यांच्यावर CPR ( Cardio Pulmonary Resuscitation) व अत्याधुनिक ECMO अशा उपाचारांनी वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र या उपचारांचे व डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. आणि अखेर जयललितांची प्राणज्योत मालवली. नक्की वाचा ह्रद्यविकाराच्या झटक्यानंतर रुग्णाला वाचवण्यासाठी Cardio Pulmonary Resuscitation ने कशी कराल मदत ?
पक्षाच्या अधिकृत ट्विटर स्थळावरून हे वृत्त जारी करण्यात आले आहे.
Our beloved leader, The Iron Lady of India Puratchi Thalaivi Amma is no more.
— AIADMK (@AIADMKOfficial) December 5, 2016