Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मेनोपॉजच्या टप्प्यावर स्त्रियांमध्ये वाढतो या 5 गोष्टींमुळे ह्रदयविकाराचा धोका

$
0
0

आयुष्यात प्रत्येकाला त्याच्या वयानुसार निरनिराळ्या अवस्थेतून जावे लागते.मेनोपॉज ही देखील स्त्रीयांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक व अटळ अवस्था आहे.या अवस्थेत महिलांमधील हॉर्मोन्समध्ये अनेक बदल दिसून येतात.ब-याचदा या स्थितीत महिलांचे वजन वाढते,अचानक मूड बदलतो किंवा शरीरात उष्णता निर्माण होते.तज्ञांच्या माहीतीनुसार महिलांना मेनोपॉज या अवस्थेत ह्रदयविकाराची देखील शक्यता असते.

शरीरातील इस्ट्रोजन या हॉर्मोन्समुळे महिलांचे ह्रदयविकारापासून संरक्षण होत असते.मात्र मेनोपॉज या स्थितीत त्यांच्या शरीरातील इस्ट्रोजन या हॉर्मोन्सच्या निर्मितीची पातळी कमी होते.त्यामुळे मेनोपॉजनंतर महिलांना ह्रदयविकाराचा धोका निर्माण होतो.मेनोपॉज व्यतिरिक्त महीलांमध्ये ह्रदयविकार होण्याची अनेक कारणे असू शकतात.मात्र जर महिलांनी मेनोपॉजमध्ये योग्य जीवनशैली अवलंबली तर त्यांचा ह्रदयविकार होण्याचा धोका नक्कीच टळू शकतो.  जाणून घ्या या डाएट टीप्सने कमी करा ‘मोनोपॉज’चा त्रास !

इंटरनॅशनल मेनोपॉज सोसायटीच्या डायरेक्टर डॉ. दुरू शाह यांच्या मते,“काही महीलांमध्ये नैसर्गिक रित्या मेनोपॉज ही अवस्था लवकर येते तर काही जणींना त्यांच्या ओव्हरीज काही कारणात्सव काढाव्या लागल्यामुळे देखील मेनोपॉज ही अवस्था ठराविक वयाच्या आधीच येऊ शकते.’ असे जरी असले तरी मेनोपॉज ही एक नैसर्गिक अवस्था आहे.

मेनोपॉजमध्ये ह्रदयविकार होण्याची काही प्रमुख कारणे-

१ . उच्च रक्तदाब-

मेनोपॉज या अवस्थेत शरीरातील इस्ट्रोजनची पातळी कमी झाल्याने ह्रदयामधील स्नायू व रक्तवाहिन्या कठीण होतात तसेच त्यांच्यातील लवचिकताही कमी होते.त्यामुळे रक्तप्रवाहाचा ह्रदयातील धमण्यांवर अधिक ताण येतो,सहाजिकच यामुळे रक्तदाब वाढतो.या परिस्थितीत उच्च रक्तदाबामुळे ह्रदयविकार होण्याचा धोका वाढतो.ह्रदयविकार टाळण्यासाठी मेनोपॉज या अवस्थेत नियमित रक्तदाब तपासणी करा व रक्तदाब नियंत्रित राहील याची दक्षता घ्या.  जाणून घ्या नैसर्गिकरित्या ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याचा घरगुती उपाय !

२. कोलेस्टॉलचे प्रमाण वाढणे-

शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे हे ह्रदयविकाराचे प्रमुख कारण आहे.मेनोपॉजमध्ये महीलांच्या शरीरात इस्ट्रोजनची पातळी खालावल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून येते.इस्ट्रोजन ची पातळी कमी झाल्याने शरीरात Low-density lipoprotein म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल वाढते तर High-density lipoprotein गुड कोलेस्ट्रॉल कमी होते ज्यामुळे ह्रदयविकार होण्याचा धोका निर्माण होतो.कोलेस्ट्रॉल प्रमाणेच मेनोपॉजमध्ये शरीरातील ट्रायग्लिसराईड(Triglycerides) या फॅटचे प्रमाण वाढते ज्यामुळे कॉर्डिओवॅस्क्युलर(Cardiovascular)विकार होण्याचा धोका निर्माण होतो.यासाठी वाढत्या वयोमानानुसार आहारातून कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ कमी करा व कमी कोलेस्ट्रॉल असलेले पदार्थ खाणे सुरु करा.

३. वजन वाढणे-

मेनोपॉजनंतर महिलांमध्ये वजन झपाट्याने वाढू लागते.विशेषत: या स्थितीत पोटावरील चरबी वाढण्याचे प्रमाण जास्त असते. इस्ट्रोजन हे हॉर्मोन्स शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते पण मेनोपॉजमध्ये या हॉर्मोन्सची पातळी कमी झाल्याने शरीरात अतिरिक्त चरबी जमा होते.त्याचप्रमाणे मेनोपॉजमध्ये शरीरातील मेटाबॉलिजम पण कमी होते ज्यामुळे वजन वाढते व ह्रदयविकाराचा धोका निर्माण होतो.ह्रदयविकारातून वाचण्यासाठी नियमित व्यायाम करा अथवा कमीतकमी ३० मिनीटे वेगात चाला.

४. मधूमेह-

मधूमेह असणा-या व्यक्तींना ह्रदयविकार होण्याची शक्यता अधिक असते.पण ब-याच महीलांना हे माहीतच नसते की या काळामध्ये त्यांच्यातील इन्सुलीन रेजिस्टेंस होण्याची शक्यता अधिक असते.याच कारणामुळे प्रीमेनोपॉज ते मेनोपॉज या काळात महीलांना मधूमेह होण्याची शक्यता वाढते.यासाठी आधीपासूनच ग्लुकोजच्या पातळीत नियंत्रित राहील याची काळजी घ्या.पोषक आहार घ्या ज्यामुळे ह्रदयविकाराचा धोका टळू शकतो. हे नक्की वाचा मधूमेहींच्या आहाराबाबतचे दूर करा हे ’6′ गैरसमज !

५. अनियमित हार्ट रेट-

atrial fibrillation म्हणजेच ह्रदयाचे ठोके अनियमित असणे यामुळे देखील ह्रदयविकार होण्याची शक्यता वाढते.वयाच्या पन्नाशी नंतर शरीरातील एस्ट्रोजनची पातळी कमी होऊ लागते ज्याचा परिणाम थेट ह्रदयाच्या कार्य क्षमतेवर पडतो.यामुळे ह्रदयाचे ठोके कमी होतात,ह्रदयामध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात.महीलांमध्ये कार्डिओ वॅस्क्युलर cardiovascular आणि कोरोनरी coronary ह्रदय विकार होण्याचा धोका देखील यामुळे निर्माण होतो.त्यात उच्च रक्तदाब असल्यास हा धोका अधिकच वाढतो.यासाठी रक्तदाब नियंत्रित ठेवा.त्याचप्रमाणे ह्रदयविकारात जाणवणारी थकवा आणि चक्कर अशी लक्षणे जाणवल्यास त्वरीत तुमच्या डॉक्टराचा सल्ला घ्या.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>