Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

नैसर्गिक प्रसुतीसाठी 9 खास टिप्स

$
0
0

प्रत्येक गर्भवती महीलेला तिची प्रसुती नैसर्गिक व्हावी असे वाटत असते मात्र ब-याचदा असे घडताना दिसत नाही.कारण प्रसुती दरम्यान नेमके काय घडेल हे कोणीच सांगु शकत नाही.सुलभ नैसर्गिक प्रसुतीची खात्री तेव्हाच देता येते जेव्हा प्रसुती वेदना सुरु झाल्यावर तुमचा रक्तदाब नियंत्रित असतो,शरीर प्रकृती  सुदृढ असते व गर्भ सुखरुप अवस्थेत असतो.

प्रसुती नैसर्गिक होण्यासाठी जाणुन घ्या नऊ टिप्स

नियमित व्यायाम करा-

जर तुम्हाला नियमित व्यायाम करण्याची सवय नसेल तर गरोदरपणात मात्र तुम्ही तो करायलाच हवा.नियमित व्यायाम केल्यामुळे सुलभ प्रसुती होऊ शकते. व्यायामामुळे तुमचे ओटीपोट व मांडीचे स्नायु बळकट होतात.हे स्नायु बळकट नसल्यास प्रसुतीकळांचा ताण ते सहन करु शकत नाहीत व त्यामुळे डॉक्टर त्वरीत सी-सेक्शन (सिझेरियन डिलीवरी) करण्याच्या सल्ला देतात.यासाठी शरीराच्या कंबरेखालील भागांना बळकट करणारे व्यायाम प्रकार करण्याचा सराव करा.जर तुम्हाला या दिवसांमध्ये व्यायाम कसा करावा हे माहीत नसेल तर कृपया तुमच्या डॉक्टरांचा किंवा प्रसुतीपुर्व प्रशिक्षण देणा-या तज्ञांचा सल्ला घ्या. जयापाली शेट्टी,हिप्नोबर्थिंग प्रॅक्टिश्नर,मुंबई यांच्या मते जर गरोदरपणात तुम्ही चुकीचा व्यायाम केला तर तुम्हाला व तुमच्या बाळाला त्रास होऊ शकतो.

ताण-तणावापासून दूर रहा-

आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण हा प्रत्येकाला येतोच.मात्र गरोदरपणात प्रयत्नपूर्वक ताण टाळण्याचा प्रयत्न करा.सरावाने मन प्रसन्न ठेवता येते.या सरावाचा प्रसुती दरम्यान तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल.ताण तुमच्या शरीरातील ऑक्सिटोसिन हे हॉर्मोन कमी करतो जे सुलभ प्रसुतीसाठी अत्यंत आवश्यक असते.ताणामुळे प्रसुती होण्यास वेळ लागतो त्यामुळे ती त्रासदायक देखील होते.प्रसुती दरम्यान आलेला ताण हा बाळ व आई या दोघांच्याही जीवासाठी धोकादायक असतो.डॉ.जयपाली यांच्या मते प्रसुती दरम्यान येणारा ताण सहन करण्यासाठी आधीच तयारी करायला हवी. जाणून घ्या गर्भपाताचा धोका टाळण्यासाठी या ’4′ सवयी दूर ठेवा

योग्य रितीने श्वास घेण्याचा सराव करा.

सुयोग्य पद्धतीने घेतलेला श्वास ताणतणाव दुर करतो,शरीरामध्ये ऊर्जा वाढवतो आणि बाळाची योग्य वाढ करण्यास मदत करतो.सुयोग्य पद्धतीने घेतलेला श्वासामुळे शरिराला मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळते व त्यामुळे बाळाची शारिरिक व मानसिक वाढ चांगली होते. सहाजिकच तुमचे बाळ प्रसुती दरम्यान सुखरुप बाहेर येते.

इतरांच्या भयानक अनुभवांपासून स्वत: ला दूर ठेवा-

डॉ.जयपाली यांच्या मते, ‘ब-याच स्त्रीयांना त्यांच्या आयुष्यात प्रसुती दरम्यान आलेले बरे-वाईट अनुभव गरोदर महिलांना सांगण्याची सवय असते.अशा महिलांपासून  दूर रहा.हे भयानक अनुभव प्रसुती दरम्यान तुमच्यामध्ये नकारात्मक भावना निर्माण करु शकतात.ज्यांचा परिणाम थेट तुमच्या प्रसुतीवर देखील होऊ शकतो.’ जाणून घ्या गरोदरपणात आढळणारी ही ’20′ लक्षणं अगदी सामान्य आहेत.

सकस आहार घ्या-

तुम्ही काय खाता याचा तुमच्या गरोदरपणावर,प्रसुतीवर व बाळाच्या जन्मावर परिणाम होत असतो.गरोदरपणात तेला-तुपाचे पदार्थ खाल्याने बाळंतपण सुलभ होते हा एक गैरसमज आहे.त्यामुळे असाच पौष्टिक आहार घ्या ज्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण होईल व गर्भ चांगल्या रितीने पोसला जाईल.डॉ.जयपाली यांच्या मते, “जर आईची प्रकृती सुदृढ असेल तर ती प्रसुतीवेदना सहज सहन करते सहाजिकच तिची प्रसुती नैसर्गिक होते.गरोदरपणात घेतलेल्या चांगल्या आहारामुळे गर्भाचेही पोषण उत्तम झाल्याने प्रसुती दरम्यान बाळ योग्य रितीने बाहेर येण्यास मदत होते.’मात्र यासाठी तुमचे वजन नियंत्रित ठेवा.कारण जास्त वजनामुळेही तुमची नैसर्गिक प्रसुती होणे कठीण होऊ शकते. हे नक्की वाचा गर्भारपणात काय खाणे टाळाल ?

गरोदरपण व प्रसुती याबाबत योग्य माहिती मिळवा -

डॉ.जयपाली यांच्या मते, ‘नैसर्गिक प्रसुतीसाठी प्रसुतीविषयी योग्य व अचूक माहीती मिळवणे गरजेचे आहे.यासाठी गर्भसंस्कार वर्ग,प्रसुतीपुर्व घेण्यात येणारे प्रशिक्षण वर्ग यामध्ये सहभाग घ्या.याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.’

लेबररुम मध्ये तुमच्या सोबत तुमची जवळची व्यक्ती असू द्या

लेबर रुममध्ये तुमच्यासोबत तुमचे पती किंवा घरातील जवळची व्यक्ती असणे गरजेचे आहे.डॉ.जयपाली यांच्या मते, ‘भावी आईसोबत तिचा पती किंवा जवळची व्यक्ती असल्यास तिला एक प्रकारे मानसिक व भावनिक आधार मिळतो.ज्यामुळे तिचा ताण कमी होऊन सुलभ प्रसुती होण्यास मदत होते.’

चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डॉ.जयपाली यांच्या सल्यानुसार, ‘तुमच्या रुटीन चेकअप दरम्यान नैसर्गिक प्रसुती विषयी तुमच्या डॉक्टरांसोबत चर्चा करा.जर तुम्हाला त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसेल तर त्वरीत दुस-या डॉक्टर किंवा प्रसुतीगृहात जाण्याचा निर्णय घ्या जिथे सर्वात आधी नैसर्गिक प्रसुतीसाठी प्रयत्न केले जातात.’ चांगला डॉक्टर शोधण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या बाळाच्या जन्माविषयी एक योजना तयार करा व डॉक्टरशी चर्चा करा.जर ते याबाबत तुमच्या भावनांचा आदर करीत नसतील तर तुम्ही इतर तज्ञांचा सल्ला घेण्यास तयार व्हा. हे नक्की वाचा या ’8′ कारणांसाठी gynaecologist चा सल्ला अवश्य घ्या

योनीमार्गाला नियमित मसाज करा.

सातव्या महिन्यानंतर योनिमार्गाला केलेला मसाज तुमचा ताण कमी करु  शकतो.तसेच यामुळे स्नायुंवरील सूज व वेदना कमी होते.यासाठी तुमच्या योनीजवळील अवयवांना हलक्या हाताने मसाज करा.या मसाजचा तुम्हाला बाळंतपणात होणा-या वेदनेचा त्रास कमी करण्यास मदत होऊ शकते.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>