Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

डिजीटल बीपी मॉनिटर विकत घेण्यापूर्वी जाणुन घ्या या ’5′महत्वाच्या गोष्टी

$
0
0

जर तुम्हाला सतत उच्च रक्तदाब किंवा हायपरटेंशनचा त्रास होत असेल तर डिजीटल बीपी मॉनिटर विकत घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.मात्र यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.जर तुम्ही आजच डिजीटल बीपी मॉनिटर खरेदी करण्याचा विचार करत आहात तर मग जरा थांबा…डिजीटल बीपी मॉनिटरची निवड करण्यापुर्वी प्रथम त्याचा वापर कसा करायचा हे नक्की जाणून घ्या.फोर्टीस हॉस्पिटल,मुंबई येथील कनसल्टंट फिजीशियन तज्ञ डॉ.प्रदीप शाह तुम्हाला सांगत आहेत डिजीटल बीपी मॉनिटर विषयी  महत्वाची माहिती.

१. रक्तातील साखर तपासण्यासाठी वापरण्यात येणा-या ग्लुकोमीटर प्रमाणे डिजीटल बीपी मॉनिटर मध्येही काही त्रुटी आढळतात.यासाठी डिजीटल बीपी मॉनिटर वर रक्तदाब तपासण्यापुर्वी प्रथम मॅनोमीटर वर स्वत: रक्तदाब तपासून बघा व त्यानंतर पुन्हा डीजीटल बीपी मॉनिटर वर रक्तदाब तपासा.(उदा.जर मॅनोमीटर रक्तदाब १२०/८० दाखवत असेल आणि त्याचवेळी डिजीटल बीपी मॉनिटर हाच रक्तदाब ११०/७० असेल तर यात फरक आहे.)त्यामुळे यानंतर जेव्हा तुम्ही कधीही डिजीटल बीपी मॉनिटर रक्तदाब तपासाल तेव्हा हा फरक लक्षात घेऊन रक्तदाब समजून घ्या. जाणून घ्या रक्तातील साखरेवर लक्ष ठेवण्यासाठी glucometerचा वापर करण्यापूर्वी या ’5′ गोष्टींकडे लक्ष द्या.

२. डिजीटल बीपी मॉनिटर यंत्र हातावर योग्य ठिकाणी लावले नसेल तर हे यंत्र चुकीचा रक्तदाब नोंदवू शकते.अशावेळी ख-या रक्तदाबापेक्षा अधिक किंवा मग कमी रक्तदाब नोंदवला जाण्याची शक्यता असते.यासाठी रक्तदाब तपासण्यापुर्वी प्रथम यंत्र योग्य ठिकाणी लावले आहे ना याची खात्री करुन घ्या.

३. डिजीटल बीपी मॉनिटर यंत्र हातावर योग्यप्रमाणात घट्ट बांधले आहे का याची देखील जरुर खात्री करुन घ्या असे न केल्यास ते जास्तीचा रक्तदाब नोंदवू शकते.अनेक वेळा असे घडते की,पेशंट या उच्च रक्तदाबाची नोंद पाहून घाबरतात व तडक हॉस्पिटल गाठतात.खरेतर त्यावेळी त्यांचा रक्तदाब नियंत्रित असतो मात्र यंत्रावर चुकीची नोंद दाखवण्यात आली असते.कधी कधी तर असे पेशंट यंत्रावरील अधिकची रक्तदाबाची नोंद पाहून इतके घाबरतात की त्वरीत उच्च रक्तदाबाच्या औषधांचा जास्तीचा डोस घेतात.जो डोस त्यांना डॉक्टरांनी रक्तदाब वाढल्यावर घेण्यास सांगितला असतो.खरेतर त्यांचा रक्तदाब नियंत्रित असुनही ही औषधे घेतल्याने अशावेळी मग त्यांचा रक्तदाब नेहमी पेक्षा खुप कमी होतो व त्यांना हायपोटेंशनला सामोरे जावे लागते. हे नक्की वाचा ‘बीपी लो’ झाल्यास करा हे प्रथमोपचार !

४. डिजीटल बीपी मॉनिटरची निवड करताना ते साधे,हाताळण्यास सुलभ व सहज वाचण्यासारखे आहे का याची खात्री करुन घ्या.डिजीटल बीपी मॉनिटर मध्ये संकेत देणा-या एका विशिष्ट आवाजाची(बिप) व्यवस्था करण्यात आली असते.हा बीपर देखील नीट तपासुन पहा.बाजारात असे डिजीटल बीपी मॉनिटर सहज उपलब्ध असतात. डिजीटल बीपी मॉनिटरसाठी जास्त खर्च पैसे खर्च करु नका.बाजारात अनेक ब्रॅन्डचे डिजीटल बीपी मॉनिटर उपलब्ध आहेत.तुमच्या बजेटनुसार तुम्ही त्यांची खरेदी करु शकता.काही डिजीटल बीपी मॉनिटरमध्ये एक मेमरी चिप देखील लावली असते जिच्यामुळे तुमच्या दिवसभरातील रक्तदाबाची नोंद जतन करता येते.यामुळे रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे सुलभ होऊ शकते.अशी चिप असलेले यंत्र महागडे असले तरी फायद्याचे ठरु शकते. जाणून घ्या लिंबू – रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचा उत्तम घरगुती उपाय !

५. सामान्यत: दिवसाभरात सकाळी व सायंकाळी असे दोन वेळा रक्तदाब तपासणे गरजेचे असते.ब-याचदा सकाळच्या रक्तदाबाची नोंद ही संंध्याकाळच्या रक्तदाबा पेक्षा जास्त असु शकते.डोकेदुखी किंवा अस्वस्थ वाटल्यास रक्तदाब वाढु शकतो त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास त्वरीत रक्तदाब तपासा.जर तुमच्या रक्तदाबाची नोंद नियंत्रित किंवा सरासरी होत असेल तर आठवडयातुन फक्त एकदा किंवा दोनदाच रक्तदाब तपासा.

डॉ.प्रदीप शाह यांच्या मते डिजीटल बीपी मॉनिटर उच्च रक्तदाब असणा-या रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.त्यामुळे त्यांना हे डिजीटल बीपी मॉनिटर यंत्र खरेदी करणे फायदयाचे ठरु शकते.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>