Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

गरोदरपणात आढळणारी ही ’20′लक्षणं अगदी सामान्य आहेत

$
0
0

गरोदरपणात शरीरात अनेक बदल जाणवू लागतात.हे बदल ज्या प्रमाणे शारीरिक असतात त्याचप्रमाणे मानसिकही असतात.गर्भाशयातील गर्भाची वाढ व तुमच्या शरीरातील मेटॉबॉलिजम व हॉर्मोन्सच्या पातळीतील वाढ ही एकाच वेळी होत असते.रक्तातील हॉर्मोन्सची पातळी वाढते ज्याला human chorionic gonadotropin(HCG)असे म्हणतात.मात्र गरोदरपणातील प्रत्येक महिलेची लक्षणे ही वेगवेगळी असु शकतात.काही महिलांना गरोदरपणात खूप त्रास होतो तर काहींना होत नाही.यासाठी जाणून घ्या ही २० लक्षणे जी गरोदरपणात जाणवणं अगदी स्वाभाविक आहे.

१. मॉर्निंग सिकनेस -

कोणताही वास किंवा एखादा विशिष्ट वास सहन न होणे हे गरोदरपणातील एक प्रमुख लक्षण आहे.काही जणींना तर या दिवसात काही खाल्ले तरी लगेच मळमळते व उलटी होते.या त्रासाला मॉर्निंग सिकनेस असं म्हणतात.प्रेगन्सीच्या पहिल्या काही महिन्यांमध्ये हा त्रास जाणवतो हा त्रास अगदी नॉर्मल आहे.या दिवसात मॉर्निंग सिकनेसचा त्रास गरोदर महिलांना दिवसभरात कधीही जाणवतो.काहींजणींचा मॉर्निंग सिकनेस गरोदरपणाच्या १२ व्या आठवड्या नंतर कोणत्याही उपचाराशिवाय आपोआप कमी होतो.तर काहीजणींना मात्र संपुर्ण गरोदरपणात हा त्रास जाणवण्याची शक्यता असते.human chorionic gonadotropin (HCG) चे रक्तातील प्रमाण वाढल्यामुळे मॉर्निंग सिकनेस सोबत कोणाताही गंध सहन न होण्याच्या त्रास देखील जाणवू लागतो. प्रोजेस्टोरॉन(progesterone hormone)या हॉर्मोन्सच्या पातळीतील वाढीमुळे मळमळणे व उलटी होण्याचा त्रास जाणवतो.मॉर्निंग सिकनेसचा बाळाला कोणताही त्रास होत नाही कारण यामुळे एकप्रकारे तुमच्या शरीराला टॉक्सिन्सपासुन संरक्षण मिळते.तुमच्या शरीरात तुमच्या बाळाचे पोषण होईल अशी नैसर्गिक व्यवस्था असते.मॉर्निंग सिकनेसमुळे प्रचंड थकवा जाणवतो.मॉर्निंग सिकनेसमध्ये होणा-या मळमळ व उलटीमुळे शरीरातील पाण्याची व पोटॅशियमची पातळी कमी होते.वजन देखील कमी होते.असे जरी असले तरी हे एक सामान्य लक्षण आहे.मात्र सतत उलट्या झाल्याने शरीरातील पाणी व पोषणमुल्ये कमी झाल्यास यावर उपचार करणे गरजेचे आहे. हे नक्की वाचा  Morning Sickness तुमच्या बाळासाठी धोकादायक ठरु शकते का ?

२. विशिष्ट पदार्थाचे डोहाळे लागणे व इतर कोणतेही पदार्थ खाण्याची इच्छा न होणे-व्व

या दिवसांमध्ये तुम्हाला एखादा विशिष्ट पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते.हे डोहाळे अगदी कोणत्याही पदार्थांचे असु शकतात.या दिवसांमध्ये गर्भाच्या वाढीसाठी तुमच्या शरीराला जास्त ऊर्जा व पोषणमुल्यांची गरज असते.त्यामुळे  गरोदरपणात भूक जास्त लागु शकते मात्र कोणत्याही पदार्थांचे अतिसेवन करणे टाळावे. नक्की वाचा चटकदार डोहाळ्यांवर मात करा या ’10′ हेल्दी पदार्थांनी !

३. थकवा जाणवणे-

सतत होणा-या उलट्यांमुळे व पुरेसे अन्न पोटात न गेल्याने तुमच्या शरीरातील रक्तदाबावर परिणाम होतो व थकवा जाणवतो.अशावेळी आहारात योग्य बदल केल्यास याचा त्रास कमी होतो.मात्र जर तुम्हाला संपुर्ण गरोदरपणात हा त्रास जाणवला तर तुम्ही अशक्त होण्याची शक्यता आहे.अशक्तपणामुळे इतर शारीरिक समस्या देखील निर्माण होऊ  शकतात यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

४. पहिल्या तिमाहीत वजन कमी होणे-

तुमचे अचानक वजन कमी होत असेल तर लगेच घाबरु नका.कारण पहिल्या तिमाहीत २ किलो पर्यंत वजन कमी होणे सामान्य आहे.या दिवसांमध्ये मळमळ व उलटी होईल या भीतीने तुम्ही कमी जेवता.यामुळे पहिल्या तिमाहीत शरीरातील कॅलरीज कमी झाल्याने तुमचे वजन कमी होते.पण जर हे वजन तीन किलोपेक्षा जास्त कमी झाले असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे. जाणून घ्या गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात कोणती काळजी घ्याल ?

५. वजन वाढणे-

गरोदरपणात तुमचे सरासरी ११ ते १४ किलो वजन वाढण्याची शक्यता असते.त्यामुळे तुमच्या बाळाचे योग्य नियोजन होते व प्रसुतीनंतर स्तनपानासाठी लागणा-या दुध निर्मिती करणा-या कॅलरीज वाढण्यास मदत होते.यासाठी पुरेशा कॅलरीज व पोषक आहार घेणे गरजेचे आहे.तुमचे वजन किती असावे हे तुमच्या body massindex (BMI) वर अवलंबून आहे. यासाठी तुमच्या वजनात हळूहळू व सातत्याने वाढ होत आहे का याकडे लक्ष द्या.

वजन कमी वाढत असेल तर त्यामुळे प्रिमॅच्युअर डिलीव्हरी किंवा बाळाचा पूर्ण विकास न झाल्याने कमी वजनाचे बाळ जन्माला येऊ शकते.वजन अधिक वाढल्यास उच्च रक्तदाब(preeclampsia)किंवा गर्भाशयाचा मधुमेह (gestational diabetes) होण्याचा धोका संभवतो.वजन जास्त असल्यास तुम्हाला सि-सेक्शनला देखील सामोरे जावे लागू शकते.हे वाढलेले वजन प्रसुतीनंतरही कायम राहते.यासाठी पहिल्या तिमाहीत ०.५ ते २ किलो वजनवाढ योग्य आहे.कधी कधी हे तीन किलो देखील असू शकते.यानंतर दुस-या तिमाहीत २ ते ३ किलो व तिस-या तिमाही पर्यंत दर महिन्याला १ ते २ किलो वजन वाढणे योग्य आहे.

६. सतत लघवी(युरीन) होणे-

गर्भारपणात सतत लघवी होणे हे एक सामान्य लक्षण आहे.पहिल्या तिमाहीपासुन गर्भाशयाच्या वाढीमुळे मुत्राशय(ब्लॅडर)वर दाब येतो त्यामुळे युरीन थांबवणे कठीण होते.हॉर्मोन्समध्ये झालेल्या बदलामुळे देखील युरीनचे प्रमाण वाढते.दुस-या तिमाहीत या त्रासापासुन काही काळ आराम मिळतो.मात्र ३१ व्या आठवड्या दरम्यान पुन्हा बाळाच्या डोक्याचा दाब ब्लॅडरवर आल्याने हा त्रास जाणवतो.तसेच प्रेगन्सीमध्ये सर्दी,खोकला किंवा शिंका आल्यास त्यामुळे युरीन बाहेर पडते.

७. स्तनांचा आकार बदलतो-

गरोदरपणात प्रसुतीनंतर स्तनपान करण्यासाठी पुरक व पोषक असे बदल आधीच स्तनांमध्ये होतात.पहील्या तिमाहीपासुन स्तन हळुहळु वाढु लागतात.जड व अधिक संवेदनशील होतात.३० व्या आठवड्यापासुन ते स्तनपानासाठी योग्य होतात. हे नक्की वाचा स्त्री शरीरात या ’6′ टप्प्यांवर होतात Breast च्या आकारात बदल !

८. छातीत जळजळ व बद्धकोष्ठता-

अपचनामुळे तुम्हाला छातीत जळजळ व बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू शकतो.गरोदरपणात पोट पुढे आल्याने तसेच दोन जेवणात बरेच अंतर पडल्याने असिडीटी होते व छातीत जळजळण्याचा त्रास होतो.प्रोजेस्स्ट्रोरॉनची वाढणारी पातळी व आयर्नच्या पुरेश्या पुरवठ्यामुळे देखील पचनसंस्थेवर परिणाम होतो.या काळात मुळव्याधीचा(Hemorrhoids) त्रास स्वाभाविक आहे मात्र प्रसुती दरम्यान ही मुळव्याधी त्रासदायक ठरु शकते. हे नक्की वाचा या नैसर्गिक उपायांनी कमी करा बद्धकोष्ठतेचा त्रास

९. योनीमार्गावाटे ब्लिडींग होणे-

गरोदरपण्याच्या सुरुवातीच्या काळात ब्लिडींग किंवा स्पॉटींग हे खुप सामान्य आहे.पण कधी कधी ही लक्षणे गर्भपात(मिसकॅरेज) किंवा ट्युबमध्ये गर्भधारणा(एक्टोपिक प्रेगन्सी) झाल्यास जाणवतात.एस्ट्रोजीनच्या वाढीमुळे व योनीमार्गातील रक्तप्रवाहामुळे ब्लिडींग होते.तसेच ३८ व्या आठवड्यानंतर होणारा रक्तस्त्राव प्रसुतीपुर्वीचे एक लक्षण असु शकते.

१०. त्वचेच्या समस्या-

शरीरीत होण्या-या हॉर्मोन्सच्या बदलामुळे एक्ने,पिगमेटेंशन,स्ट्रेच मार्क अश्या समस्या होणे हे सामान्य आहे.पहिल्या सहा ते आठ आठवडयात जननेद्रिंयामधुन निळसर स्त्राव बाहेर पडणे हे गरोदरपणाचे एक पहिले लक्षण असु शकते.कधीकधी बेंबीजवळ गडद आडवी रेष दिसते जी नंतर कमी होत जाते.चेहरा,मान,छाती व मांड्यावर डाग दिसतात जे त्रासदायक नसतात.१४ व्या आठवड्यानंतर चेह-यावर एक्ने व डाग दिसु लागतात.काही जणींच्या नाक व गालावर गडद डाग दिसतात.पोट,मांड्या व स्तनांवर गुलाबी रेघा दिसू शकतात.गरोदरपणात गर्भाशयाच्या वाढीमुळे पोट ताणले जाते व पोटावर स्ट्रेचमार्कस दिसतात.ही लक्षणे टाळता येणे शक्य नाही मात्र त्वचेला मॉश्चरराईज करुन आपण या समस्या नक्कीच कमी करु शकतो.

११. केसांचा पोत सुधारतो-

कधीकधी प्रेगन्सीची लक्षणे फायदेशीर देखील ठरतात.यामध्ये हॉर्मोन्सच्या पातळीत होणा-या बदलामुळे तुमच्या केसांचा पोत सुधारतो.केस अधिक जाड व चमकदार होतात.

१२.बेबी बम्प-

गरोदरपणात पोट बाहेर दिसू लागते.मात्र काही महिलांचे पोट दुस-या तिमाहीत ही मोठे दिसत नाही.गरोदरपणाच्या चौदाव्या आठवडयापासून गर्भशयाच्या होणा-या वाढीमुळे पोट बाहेर दिसू लागते.पण जर त्याआधीच ते दिसत असेल तर मात्र ते पोटातील हवेमुळे देखील असू शकते.तुमच्या उंची व पोटातील स्नायुंवर तुमचे पोट किती बाहेर दिसते हे अवलंबून असते.मोठे पोट असल्यास बाळ मोठे असेलच असे नाही,त्याचप्रमाणे छोट्यापोटामुळे बाळ छोटे असेलच असे नाही.पोटाच्या आकाराचा विचार करण्यापेक्षा त्याची काळजी घ्या.पोटाला स्पर्श करत आतील बाळाशी संवाद साधा तुमच्या बाळाला या भावना जाणवतात त्यामुळे याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल. हे नक्की वाचा ‘लिंग’ निदान करण्याच्या ’9′ रंजक पद्धती !

१३.पाठदुखी-

पोटदुखी,पाठदुखी,डोकेदुखी व हातपाय दुखणे हे गरोदरपणात सामान्यत: जाणवते.गर्भाशयाच्या वाढीमुळे शरीरातील इतर अवयवांवर ताण जाणवतो.पोट पुढच्या दिशेने झुकल्याने पाठदुखी जाणवते.पण जर तुम्हाला प्रेगन्सीच्या पुढील काळात पाठ दुखत असेल तर कधीकधी हे वेळे आधीच प्रसुती होण्याचे लक्षण असु शकते. जाणून घ्या  गरोदरपणातील पाठदुखी कमी करेल ही ’5′ योगासनं !

१४. पायांना सुज येणे-

प्रेगन्सीमध्ये पायांना सुज येते.२१ व्या आठवड्यानंतर पाय,घोटे तसेच तळवे व बोटांना सुज दिसू लागते.हॉर्मोन्सच्या बदलामुळे व शरीरातील जास्त पाण्यामुळे ही सूज येते. हे एक सामन्य लक्षण आहे पण या सूजेसोबत वेदना,श्वासाच्या समस्या,दृष्टीदोष आढल्यास मात्र ही चिंतेची बाब ठरु शकते.

१५. खोट्या कळा येणे(फॉल्स कॉन्ट्रॅक्शन)

फॉल्स कॉन्ट्रॅक्शनला Braxton Hicks contractions असे म्हणतात.दुस-या आणि तिस-या तिमाहीत हा त्रास जाणवतो.गर्भाशयाच्या स्नायुंच्या आकुंचन व प्रसरणामुळे हा त्रास जाणवतो.ही एक प्रकारे प्रसुतीची पूर्वतयारी असूशकते.प्रसुतीच्या शेवटच्या महिन्यात या कळा वारंवार येतात.

१६. प्रेगन्सी टयुमर-

प्रेगन्सी टयुमरला घाबरण्याचे काहीच कारण नाही.यात गरोदरपणात हिरड्यांच्या समस्येमुळे त्यांना सुज किंवा गाठ येते.ही गाठ त्रासदायक नसुन प्रसुतीनंतर नाहीशी होते.कधीकधी हॉर्मोन्समधील बदलांमुळे अश्या त्रासात हिरड्यां मधून रक्त देखील येते.

१७.गर्भाच्या हालचालीचा अनुभव-

कधीकधी गर्भाशयात बाळ हात-पाय मारत असल्याचा अनुभव येतो.याचा अर्थ असा की, तुमचे बाळ गर्भाशयात व्यायाम करीत आहे.नवव्या आठवड्यापासुन गर्भाच्या हालचाली सुरु होतात.मात्र पहिल्या गरोदरपणात तुम्हाला त्या १८ किंवा १९ व्या आठवड्याने जाणवू लागतात.२८ व्या आठवड्यानंतर या हालचाली अधिक जाणवू लागतात.तुमच्या बाळाच्या या हालचालींमुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागणे कमी होते.अपु-या जागेमुळे ३५ व्या आठवड्यानंतर या हालचाली अधिकच वाढतात.या हालचालींना अनुभवा कारण त्या बाळाच्या वाढीसाठी चांगल्या आहेत. जाणून घ्या गर्भात असताना बाळ करते या ’8′ इंटरेस्टिंग गोष्टी !

१८. मुड बदलतो-

शरीरात जाणवणारे बदल,अतिवजन व हॉर्मोन्सच्या बदलामुळे तुम्हाला थकवा जाणवतो.अश्या परिस्थितीत कंटाळा येणे स्वाभाविक आहे मात्र त्याचा तुमच्या व तुमच्या बाळाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.योग्य आहार,मेडीटेशन,योगासने व व्यायाम याची तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण आणण्यास मदत होऊ शकते.

१९. अपुरी झोप-

या दिवसांमध्ये पुरेशी झोप तुमच्यासाठी आवश्यक असली तरी ती घेणे तुम्हाला शक्य होत नाही.तिस-या तिमाही नंतर अपु-या झोपेची तुम्हाला सवय होते.वाढलेले पोट,वजन,थकवा,गर्भाच्या हालचाली,लघवी सारखे उठणे या गोष्टीमुळे तुम्हाला पुरेशी व स्वस्थ झोप घेणे शक्य होत नाही. जाणून घ्या गर्भारपणात कशी घ्याल पुरेशी झोप?

२०. अस्पष्ट दिसणे-

जर तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल तर हे देखील गरोदरपणाचे एक लक्षण आहे.सामान्यत: ३४ व्या आठवडयात हा त्रास जाणवतो व तो नंतर आपोआप बरा होतो.तसेच डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स,डोळ्यात खाज येणे,जळजळ होणे,डोळे कोरडे व लाल होणे अशी लक्षणे देखील काही महिलांमध्ये आढळून येतात.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>