हिवाळ्यात संरक्षणासाठी फक्त अधिक उबदार कपडे व सुरक्षित वातावरणात राहण्याचा प्रयत्न करतो.मात्र यादिवसांमध्ये आपण आपल्या आरोग्याची देखील तितकीच काळजी घेणे गरजेचे आहे.तज्ञांच्या सल्यानुसार हिवाळ्यात ह्रदयविकारांच्या रुग्णांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी.
Max Hospital मधील Cardiac Electrophysiology Lab and Arrhythmia Services च्या Associate Director and Head डॉ.वनिता अरोरा यांच्या मते, ‘हिवाळ्यात रुग्णांमध्ये ह्रदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक असते.कारण हिवाळ्यात कमी तापमानामुळे ह्रदयाला रक्तपुरवठा करण्या-या रक्तवाहिन्या आंकुचन पावतात.पुरेसा रक्तपुरवठा न झाल्याने ह्रदयावर रक्त पंप करण्यासाठी अधिक ताण येतो.या ताणामुळे हार्टअटॅक येऊ शकतो. ह्रदयविकारांकडे दुर्लक्ष करण्या-यांना याचा अधिक धोका असतो.यासाठी हिवाळ्यात तुमच्या सदृढ आरोग्यासाठी नियमित आरोग्य तपासणी जरुर करुन घ्या.’
हिवाळ्यात तुमच्या ह्रदयाची काळजी घेण्यासाठी या नऊ हेल्थ टिप्स-
१. ह्रदयाला आराम द्या-
कोलेस्टेरॉलचे प्रमाण प्रत्येक ऋतुमानानुसार बदलत असते.हिवाळ्यात हे प्रमाण नेहमीपेक्षा अधिक असते.जर तुमच्या कोलेस्टेरॉलच्या प्रमाणात वाढ झाली असेल तर तुम्हाला या हिवाळ्यात ह्रदयविकाराच्या त्रासाला सामोरे जावे लागु शकते.यासाठी कोलेस्टेरॉलचे चे प्रमाण नियंत्रणात आणा व ह्रदयावर जास्त ताण येणार नाही काळजी घ्या. हे नक्की वाचा व्यस्त जीवनशैलीतही कसे जपाल हृद्याचे आरोग्य
२. जास्त दगदग टाळा-
हिवाळ्यात शरीराला जास्त थकवा आणणारी कामे करु नका.सततची दगदग व कामाचा ताण यामुळे ह्रदयावर ताण येतो.यासाठी शरीराला व मनाला काम करताना थोडावेळ आराम द्या.
३. सुर्यप्रकाशात फिरा-
कडाक्याच्या थंडीत सकाळी फिरायला जाण्याऐवजी दुपारी सुर्यप्रकाशात किंवा संध्याकाळी सुर्यास्ता पूर्वी फिरण्यास जा.
४. सतत थोडया वेळाने थोडे थोडे खा-
हिवाळ्यात आपल्याला नेहमीपेक्षा जरा जास्तच भूक लागते. पण एकदाच भरपेट जेवल्याने ह्रदयावर ताण येतो.यासाठी थोड्या थोड्या वेळाने प्रमाणात आहार घ्या.
५. अल्कोहोल घेणे टाळा-
थंडीमध्ये शरीरात पुरेशी उष्णता निर्माण करण्यासाठी बरेच लोक दारु(अल्कोहोल)घेतात.पण दारुच्या अतिसेवनाने आर्टिएल फ्रिब्रीलेशन(Atrial Fibrillation)व अर्रेथिमीया (Arrhythmia) किंवा ह्रदयाचे ठोके अनियमित होण्याचा त्रास होऊ शकतो.
६. सावध रहा-
स्वत:सोबत एखादी एमर्जेंसीसाठी गोळी ठेवा. जी तुम्ही अचानक छातीत दुखण्याचा किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास लगेच घेऊ शकता.तुम्ही सोर्बिटरेट गोळी अशावेळी सोबत ठेऊ शकता.मात्र यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
७. उबदार रहा-
हिवाळ्यात हायपोथर्मिया व हार्टफेलमुळे होणा-या मृत्युचे प्रमाण अधिक असते.यापासुन बचाव करण्यासाठी उबदार कपडे घाला,गरम पाण्यानेच अंघोळ करा व गरज नसल्यास विनाकारण घराबाहेर पडू नका.
८. लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका-
छातीत जाणवणारी अस्वस्थता,घाम सुटणे,श्वास घेण्यास त्रास,मान,हात,तोंडाचा जबडा व खांद्यातुन कळा येणे अशी लक्षणे जाणवल्यास अजिबात दुर्लक्ष करु नका.ही सर्व हार्टअटॅकची लक्षणे असल्याने असे जाणवल्यास त्वरीत तुमच्या डॉक्टरकडे जा. जाणून घ्या हृद्यरोगींनो ! या’5′ कारणांसाठी हिवाळ्यात घ्या विशेष काळजी
९. नियमित हेल्थ चेकअप करुन घ्या-
जर तुम्हाला ह्रदयविकार किंवा इतर कोणताही गंभीर आजार असेल तर नियमित हेल्थ चेकअप करणे गरजेचे आहे.नियमित आरोग्य तपासणी केल्यास तुमचा हार्टअटॅक पासून बचाव होऊ शकतो.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock