काहीवेळेस सकाळी उठायला उशीर झाल्याने घाईगडबडीत आवरण्याच्या घाईत अनेकजण वॉशरूमला / शौचाला जाणं टाळतात किंवा सार्वजनिक ठिकाणी टॉयलेट्समधील अस्वच्छतेमुळे वॉशरूमला जाणे टाळतात. यामुळे दिवसभर तुम्हांला अस्वस्थ वाटते. पण वेळेवर शौचाला न जाणं किंवा ती अडवून ठेवणं त्रासदायक ठरते. त्याचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम Fortis Hospitals Delhi चे gastroenterologist डॉ. राजीव राघन यांनी सांगितले आहेत. तुम्हीदेखील जाणून घ्या शौचाला फारवेळ अडवणे आरोग्याला किती त्रासदायक ठरू शकते.
शरीरात शौच / मळ जितका अधिकवेळ राहिल तितके ते बाहेर पडणे अधिक त्रासदायक ठरते. शौचाला जाण्याची इच्छा होऊनदेखील तुम्ही ती टाळत राहिल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास वाढेल. यामुळे शौचासोबत रक्तदेखील पडू शकते. हा त्रास अधिक वाढल्यास भविष्यात haemorrhoids चा त्रास होऊ शकतो. तसेच गुद्द्वाराजवळील नाजूक टिश्युंना त्रास होऊ शकतो. तेथील जागेजवळ भेगा पडू शकतात. अशावेळी केवळ शस्त्रक्रिया हा उपचाराचा पर्याय राहतो. म्हणूनच भविष्यातील या त्रासदायक समस्यांना टाळण्यासाठी शौचाला अडवून ठेवण्याची सवय तात्काळ सोडा. कोणत्या टप्प्यावर बद्धकोष्ठतेच्या त्रासासाठी उपचार सुरू करणे गरजेचे ठरते ? हेदेखील नक्की जाणून घ्या
दिवसभरात किती वेळा शौचाला जाणे आरोग्यदायी आहे ?
आपण आहार काय खातो आणि कसे खातो याचा शौचावर परिणाम होतो. दिवसभरात 2-3 वेळेस शौचाला जाणं हे सामान्य आणि आरोग्यदायी समजले जाते. (नक्की वाचा : वेस्टर्न स्टाईल पब्लिक टॉयलेटच्या वापराने आजारांना आमंत्रण !)
# टीप्स-
- तुमची पचनशक्ती सुधारण्यासाठी आहारात आणि प्रामुख्याने रात्रीच्या जेवणात फायबरयुक्त पदार्थ ठेवावेत. धान्य, डाळी, ताज्या भाज्या, फळं यांचा समावेश करा. यामुळे सकाळी पोट साफ होण्यास तसेच शौचाला मोकळे होण्यास मदत होते. मात्र आहारात फायबर्सचा अधिक समावेश झाल्यास वाढतील हे ’5′ त्रास !
- आहारात खूप प्रमाणात कॅफिनयुक्त पदार्थ, मद्यपान आणि धुम्रपानाची सवय टाळा.
- सकाळ पोट साफ होण्यासाठी योग्य आणि किमान घरच्या घरी व्यायाम, योगाअभ्यास करण्याची सवय ठेवा. या ’5′ सवयींमध्ये बदल करा म्हणजे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होईल !
म्हणूनच घराव्यतिरिक्त इतर ठिकाणी असताना तुम्हांला शौचाला जाण्याची इच्छा होत असल्यास त्याबाबत लाज न बाळगता वेळीच मोकळे व्हा. तसेच जुनाट बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock