दिवाळीच्या दिवसांमध्ये शिशिर ऋतूची चाहूल लागते. हवामानात बदल होतो आणि थंडी वाढत जाते. हवेतील रुक्षता वाढत जाते. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावरही होतो. म्हणूनच दिवाळीच्या पहाटे उठल्यावर तेलाचा मसाज आणि उटण्याने आंघोळ केली जाते. या पारंपारिक प्रथेमागे काही शास्त्रीय आणि आरोग्यदायी कारणं आहेत.
सायन आयुर्वेदीक महाविद्यालयाच्या माजी प्रोफेसर आणि वैद्य डॉ. रजनी पाटणकर यांच्या सल्ल्यानुसार अभ्यंगस्नान केवळ दिवाळीपुरता मर्यादित नसून वर्षभर तेलाचा मसाज करणे आवश्यक आहे. हवामानानुसार तेलाचे प्रमाण कमी जास्त असू शकते. संपूर्ण शरीराला नियमित तेलाचा मसाज करणे शक्य नसेल तर किमान शीर (डोकं), कर्ण (कान) व पाद (पाय) या भागाला तेलाचा मसाज केल्यास स्वास्थ्य सुधारण्यासाठी मदत होते.
अभ्यंगस्नान आजही फायदेशीरच !
आजकाल पूर्वीप्रमाणे थंडी नाही म्हणून उटणं आणि अभ्यंग़ तेलाचा मसाज टाळण्याची काही गरज नाही. कारण डॉ. पाटणकरांच्या मते, तापमान कमी झाले नसले तरीही हवेतील रुक्षता मात्र कमी होते. याचा परिणाम आपल्या शरीरावर सहाजिकच दिसून येतो. अशावेळी नैसर्गिकरित्या त्वचेचे रक्षण करण्यासाठी मदत होते.
अभ्यंगस्नानाचे फायदे -
तेलाचा मसाज केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. तसेच ताण कमी होण्यास मदत होते. कोमट तेलाचा मसाज केल्यास नर्व्हस मोकळ्या होतात. न्युरॉलॉजिकल विकारांचा धोका कमी होतो. शरीराला नियमित तेलाचा मसाज केल्यास स्नायूंचे कार्य सुधारते. तसेच त्यांची कार्यक्षमता सुधारते. उटण्याने मिळवा चेहर्याच्या या ’4′ समस्यांपासून सुटका !
कसे बनवाल घरगुती सुगंधी तेल
अभ्यंगस्नानाला सुगंधी तेलाचा प्रामुख्याने वापर केला जातो. यासाठी आयुर्वेदात विविध सुगंधी घटकांचा वापर करून सिद्ध तेल बनवले जाते. वाळा, चंदन, तीळाचे तेल, खोबरेल तेल, बदाम तेलाचा वापर केला जातो. मात्र घरी तेल बनवताना समप्रमाणात तीळाचे तेल, खोबरेल तेल आणि बदामाचे तेल मिसळावे. मात्र रिफाईंड ऑईलचा वापर टाळा. त्यातील स्निग्ध घटक काढून टाकलेले असतात. तुम्ही वर्षभर घरच्या घरीदेखील उटणं बनवू शकता. मग त्याची कृती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
संबंधित दुवे -
फराळावर ताव मारण्याआधी लक्ष द्या त्यातून मिळाणार्या कॅलरी काऊंटवर !
छायाचित्र सौजन्य – Shutterstock