काही जुन्या रूढी-परंपरा केवळ अंधश्रद्धा किंवा अज्ञान समजून दुर्लक्षित केले जातात. परंतू त्यामागे काही वेळेस वैज्ञानिक आधारदेखील असतो. पूर्वीच्या काळी जमिनीवर बसून जेवणाची रीत असे. जमिनीवर बसून जेवण्याचेही अनेक फायदे आहे. आजही उपवासाच्या दिवशी केळीच्या पानावर जेवण वाढण्याची सवय आहे. जेवणाला सुरवात करण्यापूर्वी ताटाभोवती पाण्याचे काही थेंब फिरवण्याची सवय तुम्ही पाहिली असेल. मग प्रार्थना म्हणून अशाप्रकारे ताटाभोवती पाणी फिरवण्यामागील नेमके कारण काय असते हे जाणून घेण्यासाठी योगा आणि आयुर्वेदाचार्य रमण मिश्रा यांनी दिलेला हा सल्ला नक्की जाणून घ्या.
जेवणाच्या ताटाभोवती पाणी का फिरवले जाते ?
पूर्वीच्या काळी सारावलेल्या जमिनीवर जेवणाचे पान वाढले जायचे. त्यामुळे आजुबाजूने कोणी चालत गेल्यास सहाजिकच जमिनीवरील धूळ, माती पानात उडली जात असते. यामुळे जेवणाच्या ताटाभोवती पाण्याच्या शिडकाव्याने ती माती भिजवली जात असे. त्यामुळे मातीचे कण उडत नाही.तसेच जेवणात दूषित घटक जाण्याचा धोका कमी होतो. रात्रीच्या वेळेस एखादा कीटक चालत असल्यास तो स्पष्टपणे दिसत नसे अशावेळी जेवणापूर्वी पाणी शिंपडून माती ओली करण्याची रीत फायदेशीर ठरत असे.
आजकाल इम्पोर्टेड डाएनिंग टेबलवर बसून जेवणाची फॅशन आहे. मात्र जमिनीवर बसून जेवणे आरोग्यदायी ठरते. जमिनीवर बसून जेवल्याने पाठीच्या कणाचा व्यायाम होतो, रक्ताभिसरण सुधारते, पचनक्रिया सुधारते. जेवण जमिनीवर बसून जेवणाप्रमाणेच ते हाताने का जेवावे ? हे देखील जरूर जाणून घ्या.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock Images