Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

लहान मुलांचे दात काढल्यानंतर कशी घ्याल काळजी ?

$
0
0

दात काढणं ही प्रक्रिया अत्यंत त्रासदायी असते. मात्र प्रौढांच्या तुलनेत मुलांचे दात काढण्याची प्रक्रिया थोडी कमी त्रासदायक असते. परंतू हा त्रास थोडा अजून कमी त्रासदायी करण्यासाठी Smile Dental Care च्या कन्सलटंट डॉ. निकिता गोएल यांनी दिलेला हा सल्ला नक्की पहा.   

  • दात काढल्यानंतर रक्त येणं सहाजिकच आहे. मात्र हे केवळ दिवसभरासाठी असते. दात काढताना डेन्टीस्ट gauze दात काढलेल्या जागी ठेवतात. यामुळे ब्लड क्लोटींग होते आणि रक्तप्रवाहाची समस्या कमी होते.
  • तसेच तुमचे मुलाचे तोंड स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे इंफेक्शनचा धोका कमी होईल. ग्लासभर पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळा. या मिश्रणाने तोंड स्वच्छ करा.दिवसातून अनेकदा मीठाच्या पाण्याने चूळ भरा. तसेच ब्रश करताना ब्रिसल्स दात काढलेल्या भागापासून दूर ठेवा.
  • दात काढल्यानंतर आराम करणे आवश्यक आहे. दात काढल्यानंतर सुरवातीचे किमान दोन  तास मुलं खूप नाचानाच , दंगामस्ती करणार नाहीत याची काळजी घ्या. यामुळे वेदना वाढू शकतात.
  • वेदना काही काळ जास्त राहिल्यास आईस पॅक किंवा फ्रोझन व्हेजिटेबलचा पॅक गालाच्या बाहेरच्या बाजूला लावा.यामुळे सूज कामी होण्यास मदत होते.
  • खूपच वेदना होत असल्यास Tylenol किंवा Ibuprofen या पेनकिलर गोळ्या द्या. दात काढण्या आधीच कोणत्याही पेनकिलर मुलांना देऊ नका. यामुळे ब्लड क्लोटींगच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
  • दात काढल्यानंतर 24 तास, चावायला कठीब पदार्थ मुलांना खाऊ देऊ नका. तसेच फार गरम पेयं टाळा. याउलट दही, पुडींग सारखे पदार्थ खायला द्यावेत.

मात्र दात काढल्यानंतर ताप आल्यास किंवा अतिरिक्त सूज आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Read this in English

Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य –Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>