खरतर एकादशी आणि दुप्पट खाशी ! असे म्हटले जाते. कारण उपवास म्हटला की, त्या विचारानेच भूक अधिक लागते. मग अशावेळेस तूपकट पदार्थ अधिक खाल्ल्यास पित्ताचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच यंदाच्या आषाढीला ही उपवासाची ‘हेल्दी’ टिक्की नक्की करून बघा.
साहित्य -
- करांदे
- अळ्कुड्या
- सुरण / रताळे
- शिंगाडा
- वरी तांदूळ
- तेल
- खिसलेलं खोबरं
- जिरं
- कापलेली मिरची
- आल्याची पेस्ट
- मीठ
कृती -
प्रथम सारी कंदमुळं कुकरमध्ये किंवा मोदक पात्रात शिजवून घ्यावीत. नंतर ती सारी कुस्ककरून त्यात आल्याची पेस्ट व मीरपूड मिसळावे. यामुळे पिष्टमय पदार्थामुळे पोटफुगीचा होणारा त्रास कमी होतो. त्यानंतर हळूहळू त्यात मिरची, खोबर, जिरं मिसळून त्याच्या लहान लहान टिक्की बनवाव्यात.
वरीच्या तांदूळामध्ये ही टिक्की घोळवून तेलामध्ये शॅलोफ्राय करावीत. तळताना शेंगदाणाऐवजी तीळाच्या तेलाचा उपयोग केल्यास अधिक आरोग्यदायी ठरते. तीळाच्या तेलामुळे पदार्थातील पोषणद्रव्यं अधिक सुकरतेने शरीरात घेतली जातात. यकृताचे कार्य सुधारते तसेच कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यतादेखील कमी होते.कोलेस्टेरॉल कमी करायचयं? मग आहारात ठेवा हे 7 पदार्थ !
या हेल्दी टिक्कीचे आरोग्यदायी महत्त्व जाणून घेण्यासाठी खालील व्हिडियोवर क्लिक करा.
छायाचित्र सौजन्य – Zee marathi
Video Source – Zee marathi / You tube channel
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा.