Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

दीपा कर्माकरच्या खेळाची आणि डाएटची खास वैशिष्ट्य !

$
0
0

क्रिकेट हा खेळ  धर्म मानल्या जाणार्‍या भारत देशामध्ये इतर खेळांकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. मात्र यंदा अनेक भारतीयांची नजर  रिओ ऑलंपिक २०१६ मधील जिम्नॅस्टिक दीपा कर्माकरच्या खेळावर लागली होती. भारताकडून पहिल्यांदा जिम्नॅस्टिक विभागात दीपा कर्माकर पदकांच्या शर्यतीत इतकी जवळ पोहचली होती. अवघ्या काही गुणांच्या पछाडीने दीपा कर्माकरचे पदक  हुकले आहे. मात्र 23 वर्षीय दीपाच्या चमकदार कामगिरीवर भारतभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.  

Produnova vault

दीपा कर्माकरच्या ‘Prodonova vault’ प्रकाराची झलक

दीपाची खास वैशिष्ट्य -:

दीपा कर्माकर ही 23 वर्षीय जिम्नॅस्टीक तिच्या ‘Prodonova vault’ ( प्रोडोनोव्हा व्हॉल्ट) या शैलीसाठी विशेष चर्चेत आली आहे.  ‘Prodonova vault’ हा कठीण समजला जाणारा एक प्रकार आहे. मुळातच ऑलंपिक मध्ये जिमनॅस्टिक हा प्रकार कशाप्रकारे सादर केला जातो आणि त्याच्या काठीण्य पातळीवरून तपासला जातो. त्यानुसार गुण दिले जातात. दीपा पदकांच्या शर्यतीत 15.066 इतका स्कोअर मिळवत चौथ्या क्रमांकावर आली.

dipa vault

टीव्हीवर पाहताना हा अवघ्या काही सेकंदाचा खेळ वाटत असला तरीही त्यासाठी शरीराची लवचिकता अत्यंत गरजेची असते. केवळ मनगटांच्या जोरावर शरीराचा भार सारवत उलटी उडी मारून एका विशिष्ट ठिकाणी सरळ रेषेत पुन्हा स्वतःला सावरणं यामध्ये खेळाडूचं कसब लागतं. त्यासाठी वजन, स्नायूंची लवचिकता आणि प्रसंगावधान राहणं अत्यंत गरजेचे असते. अन्यथा गंभीर इजा होण्याचीदेखील शक्यता असते.

दीपा कर्माकरचं डाएट -

इतर खेळातील खेळाडूंप्रमाणेच जिम्नॅस्टीक दीपाच्या आहारातही प्रोटीन हा महत्त्वाचा भाग आहे. मिडीयाला दिलेल्या माहितीनुसार, मुलाखतींनुसार दीपाच्या प्रोटीन घटकामधील प्रमुख स्त्रोत हा चिकन आहे. मात्र दीपाला मासे खूप आवडतात. त्रिपुराची दीपा जेव्हा तिच्या मूळ गावी जाते तेव्हा माशांचा आस्वाद अवश्य घेते. तसेच  शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स आणि पाण्याचे प्रमाण संतुलित राहण्यासाठी आवश्यक घटकांचा आहारात पुरेसा समावेश करणेही आवश्यक आहे.

Image source – Dipa Karmakar/ Facebook Account


 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>