Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Complan, Bournvita सारखी पावडर मुलांना देणं खरंच आरोग्यदायी आहे का ?

$
0
0

Read This in English 

 Translated By  -  Dipali Nevarekar
 छायाचित्र सौजन्य : Shutterstock

जाहिरातीच्या भडिमारामुळे असेल किंवा नाश्ता करायला वेळ नसल्याने अनेक मुलांना सकाळ -संध्याकाळ माल्ट बेव्हरेजेस म्हणजेच दूधात मिसळून काही पोषक पावडर दिल्या जातात. यामध्ये अनेक पोषणद्रव्य असून स्वादानुसार वेगवेगळ्या स्वरूपात ते उपलब्ध करून दिले जाते. बुस्ट, मायलो, बॉर्नव्हिटा, हॉर्लिक्स अशा विविध ब्रॅन्डमध्ये माल्ट बेस्ड बेव्हरेजेस उपलब्ध असतात. सर्वसाधारण चॉकलेटच्या जवळपास जाणारी चव असल्याने मुलांनाही दूधासोबत  मिसळून त्याला पिण्याची सवय होते. पण अशी पेय देणं खरंच आरोग्यदायी आहेत का ? हा मूळ प्रश्न आहे.

मुलांना अशाप्रकारची ड्रिंक्सदेण्यामागील काही दुष्परिणाम  जाणून घ्या :

  • बाजारात मिळणार्‍या पावडर दूधात मिसळून तयार केलेल्या ड्रिंकमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. तसेच चॉकलेटही अधिक प्रमाणात आढळते. त्याचा शरीरावर परिणाम होतो.
  • अशा पेयांमुळे दात आणि तोंडाचे आरोग्य बिघडते. अतिप्रमाणात साखर खाल्ल्याने ओरल बॅक्टेरिया वाढतात आणि कॅव्हिटीज वाढतात.
  • अशा प्रकारची हेल्द ड्रिंक्स तात्काळ उर्जा देतात कारण त्यामध्ये साखर अधिक असते. मात्र काही वेळाने तुम्ही आळशी होऊ शकतात. तुम्हांला तात्काळ उर्जा इतरही काही नैसर्गिक पदार्थांमुळे मिळू शकते. त्यासाठी माल्ट ड्रिंक्स किंवा सप्लिमेंटची गरज नाही.
  • माल्ट ड्रिंक्स किंवा सप्लिमेंटमध्ये प्रिझरव्हेटीव्ह्ज अधिक असल्याने शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
  • क्लिनिकल स्टडीजच्या अहवालानुसार, आर्टिफिशियल रंग, प्रिझर्व्हेटीव्ज यांचा शरीरावर परिणाम होतो.
  • मुलांची एकाग्रता, अलर्टनेस यावरदेखील परिणाम होतो. मुलं हायपरअ‍ॅक्टीव्ह होण्याचा धोकादेखील यामुळे वाढतो.
  • साखरेतून आणि स्ट्रेचेसमधून येणार्‍या कॅलरीज या एम्प्टी कॅलरीज असतात. त्यामुळे त्याचा आरोग्यदायी फायदा होत नाही. मधूमेही, लठ्ठ मुलांना अशी पेय देणं त्रासदायक ठरू शकतात.
  • केवळ लठ्ठ किंवा मधूमेही मुलांनाच नव्हे तर निरोगी मुलांनादेखील माल्ट ड्रिंक्स देणे टाळा. म्हणजे यामुळे त्यांच्यामध्ये जीवनशैलीशी निगडीत  आजार उत्त्पन्न होणार नाहीत.

माल्ट पावडर न मिसळता दूध अधिक टेस्टी बनवण्यासाठी त्यामध्ये हे पदार्थ मिसळा.

गोड फळांचा पल्प मिसळून मिल्कशेक बनवा.

शराच्या काही काड्या दूधात मिसळून प्या.

माल्ट पावडरऐवजी त्यामध्ये दालचिनी पावडर किंवा बदामाची पूड मिसळा.

खजूर, अंजीर यांची पावडर किंवा पल्प मिसळूनही दूध अधिक चविष्ट होऊ शकते.

भारतीयांच्या खाद्यपदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स अधिक आढळतात. त्यामुळे अधिकची साखर माल्ट ड्रिंक पावडर किंवा सप्लिमेंटमधून घेऊ नका. रिफाईन्ड साखरेचा वापर कमी करून नैसर्गिक स्वरूपातील साखरेचा अधिकाधिक समावेश आहारात करावा. क्वचित प्रसंगी अशाप्रकारची पेयं मुलांना देणे ठीक आहे. मात्र त्याची सवय लावणे त्रासदायक ठरू शकते.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>