Image Source: WhatsApp forward
गेले काही दिवस व्हॉट्सअॅपवर 48 तासात ‘डेंग्यू’ ठीक करणारे औषधाबाबतचे काही मॅसेज फिरत आहेत. त्यामध्ये ठळक अक्षरात Caripill याचा समावेश असलेल्याचा उल्लेख आहे. त्यामध्ये पपईच्या पानांचा अर्क असल्याचे सांगितले आहे. जाणून घ्या का आहे पपईच्या पानांचा रस ‘डेंग्यू’ रुग्णांसाठी फायदेशीर !
Antahkarana कडून हे मोफत उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच त्यावर काही फोन नंबर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे सामान्य नागरिक त्या प्रभावाखाली येऊन त्याची मागणी करू शकतात. मात्र आम्ही या फोनशी संपर्क केल्यानंतर हे खोटे असल्याचे आम्हांला आढळले आहे.
पहिल्याच फोनवर संपर्क केल्यानंतर तो ‘ Dr Vishwanath Halnikeri ‘ यांनी उचलला. त्यांनी सांगितला हा मॅसेज फेक आहे. Antahkarana हे कर्नाटक, बॅंगलोर येथील होमियोपेथिक क्लिनिक आहे. हा मेसेज जसजसा फॉरवर्ड होतोय तसे आम्हांलाही अनेक फोन, मेसेज येत आहेत. पण व्हॉट्सअॅप फिरणारा हा मेसेज आमच्या अॅड्ससोबत मिसळून तयार केलेला हा एक फोटो आहे. आमच्या क्लिनिकचा आणि Caripill चा काहीही संबंध नाही.
Caripill ही एक बॉटनिकल गोळी आहे. Micro Labs या फार्मासिस्ट कंपनीकडून त्याची निर्मिती केली जाते. Micro Labs च्या VP of Medical Affairs, डॉ. मंजुला सुरेश यांच्याशी संपर्क केल्यानंतर, ‘आम्हांला अशाप्रकारचे संदेश फिरत असल्याची कल्पना नाही. Caripill हे केवळ डॉक्टरांना आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच उपलब्ध केले जाते. त्याच्या वापरानंतर 48 तासात डेंग्यू ठीक होतो असा आमचा दावा नाही. उलट 5 दिवस औषध घेण्याचा सल्ला दिला जातो.’
डेंग्यूसाठी कोणतेही मिरॅकल औषध नाही. तसेच Caripill हे रुग्णांचे प्लेटलेट्स सुधारण्यास मदत करते. त्यामुळे फोटोवर जी माहिती दिली जाते त्याबद्दल योग्य कारवाई केली जाईल.
दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात डेंग्यू आणि इतरही साथी झपाट्याने पसरतात. गेल्या दहा दिवसात मुंबईत सुमारे 50 रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे फोर्टीस हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. प्रदीप शहा यांनी सांगितले. तसेच Caripill अवघ्या काही तासात डेंग्यू ठीक करू शकत नाही. मला देखील अनेक रुग्ण त्याचे प्रिसक्रिब्शन मागतात. डेंग्यूचे उपचार सामान्यपणे 8-10 दिवस केले जातात. तसेच स्थिती गंभीर असल्यास त्याला अधिक वेळ आणि उपचारांची गरज असते असा सल्ला डॉ. शहा यांनी दिला आहे.