Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ’10′लक्षणांनी पोटाचा कॅन्सर वेळीच ओळखा !

$
0
0

Read this in English

Translated By  -  Dipali Nevarekar

 Image Source: Shutterstock

अनेकदा कॅन्सरचे निदान हे त्याचा खूपच वाढल्यावर किंवा अंतिम ट्प्प्यात पोहचल्यावर होते. पोटाचा कॅन्सर हा अनेकांमध्ये आढळतो. त्याची सुरवातीच्या टप्प्यामधील लक्षणं ही अ‍ॅसिडीटी / पित्त, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांमध्येही आढळते. त्यामुळे अनेकांकडून या गंभीर आजाराकडे दुर्लक्ष केले जाते. म्हणूनच Wockhardt Hospital मुंबईच्या ऑन्को सर्जन डॉ. मेघल संघवी यांनी सांगितलेली ही लक्षणं आणि पचनाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.

  1. छातीत जळजळ किंवा अपचन होणे -

भरपेट जेवणानंतर जड वाटणे किंवा पित्त वाढणे सहाजिक आहे त्यावर अ‍ॅन्टासिड्स घेऊन मात करता येऊ शकते. मात्र 2-3 महिने हे लक्षण त्रासदायक ठरत असल्याचे आढळून आल्यास आणि प्रत्येकवेळी जेवणानंतर असा त्रास होत असल्यास वेळीच तपासणी करून घेणे हिताचे आहे. ट्युमरची पोटात वाढ होत असल्यास हे लक्षण आढळून येते. पोटातील गाठीकडून शोषले जाणारे एन्झाईम पचनकार्यात बिघाड निर्माण करते.  ती गाठ वाढत गेल्यास अन्न लहान आतड्यापर्यंत पोहचण्याच्या कार्यामध्ये बिघाड होतो. त्यामुळे पित्त वाढते. अ‍ॅन्टासिड वरचेवर घेणे योग्य आहे का ?

2. थोडेसे खाल्ले तरीही पोट भरते

भूक कमी जास्त होण्यामागे अनेक कारणं आहेत. मात्र जेवणाची इच्छा कमी होणे किंवा कमी खाल्ले तरीही पटकन पोट भरल्यासारखे वाटल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. पोटात ट्युमरची वाढ होताना अन्नपचनाच्या कार्यामध्ये अनेक बिघाड होतात. त्यामुळे अनेकदा ब्लोटेड / पोट फुगल्यासारखे वाटते.

3. अचानक वजन कमी होणे

पुरेसे खाणे न होणे, पोषणद्रव्यांची कमतरता अत्सेच भूक मंदावणे ही वजन घटण्याची लक्षण आहेत. पण यावरून ट्युमरचे निदान करता येत नाही. मात्र वजन घटण्यासोबतच पित्ताचा त्रास होत असल्यास योग्य चाचण्यांनी त्याचे निदान करा.

4. मळमळ आणि उलट्यांचा त्रास

उलटीमध्ये नुकतेच खाल्लेले आणि अर्धवट पचलेले अन्न बाहेर पडते. सतत मळमळ जाणवणे, काहीही खाल्ल्यानंतर थोड्या वेळातच उलटीतून बाहेर पडणे ही लक्षण धोक्याची सूचना देतात. ट्युमरची होत असलेली वाढ पचनकार्यात अडथळा निर्मान करतात.

5. थकवा जाणवणे - 

भूक कमी होणे, पित्तामुळे पोषणद्रव्य कमी होणं, वजन कमी होणं सोबतच रक्त कमी होते. यामुळे थकवा वाढतो. चालताना धाप लागते.

6. शौचामध्ये बदल होणे -

बद्धकोष्ठता, डायरिया किंवा काळपट रंगाचे  शौच हे चिंतेचे कारण  आहे.

7. सौम्य ताप - 

शरीरातील इंफेक्शनमुळे ताप येतो. शरीरात कॅन्सरच्या गाठीची वाढ होताना ताप सौम्य प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. यासोबतच थकवा, छातीत जळजळ जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे गंभीर ठरू शकते.

8. पोटदुखी -

पोटदुखीच्या त्रासासोबत जाडसर गाठ जाणवत असल्यास हे पोटाच्या कॅन्सरचे एक  लक्षण आहे. पोटात वेदना होणार्‍या जागा देतात या ’5′ आजाराचे संकेत

9.  शौचातून रक्त पडणे - 

हे लक्षणदेखील पोटाच्या कॅन्सरचे संकेत देतात. शौचातून पडणारे रक्त आतड्यांचे आरोग्य ठीक नसल्याचे संकेत देतात. पोटात वाढणारी गाठ रक्तवाहिन्यांचे नुकसान करतात त्यामुळे शौचातून रक्त पडण्याचा त्रास वाढतो.

10. गिळण्यास त्रास होतो - 

पोटाच्या कॅन्सरमध्ये अंतिम टप्प्यांत हे लक्षण आढळते.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles