Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
Image Source: Shutterstock
दिवसभर ऑफिसमध्ये एसीत बसणार्या अनेकांना माझ्याप्रमाणे किमान दुपारचे जेवण गरम हवे असते. त्यासाठी मुद्दामून प्लॅस्टीकचा डबा खरेदी केला जातो. प्लॅस्टिकचा डबा फ़्रीजमध्ये गरम करणे सोपे असते. परंतू प्लॅस्टीकचे डबे स्वच्छ करणे तितकेच जिकीरीचे काम आहे. अनेकदा त्यावर डाग, आधीच्या दिवसाच्या पदार्थांचा वास येतो. यामुळे अनेकदा चारचौघात फजिती होण्याची वेळ अनेकांवर येते. म्हणूनच वास आणि डाग यांना दूर ठेवण्यासाठी हे काही खास उपाय
डाग काढण्यासाठी काय कराल ?
- डब्ब्यातला पदार्थ खाल्ल्यानंतर तो ताबडतोब धुवा. तसे करणे शक्य नसल्यास घरी पोहचल्यानंतर ताबडतोब डबा बाहेर काढून पाण्याने स्वच्छ करा. थंड पाणी फारसे परिणामकारक नसले तरीही ते करणे सोपे असते.
- डबा धुतल्यानंतर तो टीश्यूपेपरने स्वच्छ करा.
- त्यानंतर डबा कोमट पाण्यात आणि सौम्य डीश वॉशरने स्क्रबरच्या मदतीने पुन्हा घासा.
- कोमट पाणी आणि डीश बारच्या सोल्युशननेदेखील डाग गेला नाही तर व्हिनेगर सारखे एखादे किचनमधील सोल्युशन वापरा. व्हिनेगरमुळे हळदीचे किंवा अगदी टोमॅटो सॉसचे डागदेखील जाण्यास मदत होते.
- व्हिनेगर घरी नसल्यास अर्ध्या लिंबाचा रस डब्ब्याला चोळा. त्यानंतर डबा किमान 15-20 मिनिटांनी धुवा. यासोबत एखादे माईल्ड सोप सोल्युशनदेखील वापारता येऊ शकते. त्यानंतर डबा कोमट पाण्याने धुवा.
- डाग फारच चिकट असल्यास ते बेकींग सोडा आणि पाण्याच्या पेस्टने जाऊ शकतील. डब्ब्यातील डागांच्या ठिकाणी ही पेस्ट चोळून एक दिवस हा डबा तसाच ठेवा. दुसर्यादिवशी कोमट पाण्याने डबा स्वच्छ धुवावा.
- डाग नैसर्गिक पद्धतीने जावा असे वाटत असल्यास तो नियमित सवच्छ धुवा. तसेच सूर्यप्रकाशात डाबा सुकवा.
डब्ब्यातील डागांंप्रमाणेच वास घालवण्यासाठी देखील थोडे विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- डब्बा धुण्याता त्यामध्ये चमचाभर मीठ घाला. तो डबा सिल्ड करून (झाकून) ठेवा. यामुळे वास जाण्यासोबतच डब्ब्यातील कीटाणूदेखील नाहीसे होतील.
- रात्रभर डब्ब्यामध्ये तुम्ही काही कॉफीचे दाणे टाकून ठेवल्यास वास दूर होईल.
- डबा धुतल्यानंतर त्यामध्ये एक लिंबाची फोड ठेवा. यामुळेदेखील वास दूर होतो.
- रात्रभर डब्ब्यामध्ये कागदाचा बोळा भरून ठेवा. यामुळे वास कमी होण्यासाठी मदत होते.
डाग आणि वास टाळण्यासाठी काय कराल ?
- नियमित वापरासाठी एकापेक्षा अधिक डब्बे वापरात ठेवा. यामुळे डब्ब्याचा वास नैसर्गिकरित्या जाण्यासाठी मदत होईल.
- डाळी किंवा सॉस मायक्रोव्हेव ओव्हनमध्ये गरम करणे टाळा. यामुळे डब्ब्यावर डाग पडतात. प्लॅस्टिकऐवजी काचेची भांडी वापरा.
- डब्ब्यामध्ये अॅल्युमिनियम फॉईलचा वापर करा. यामुळे डाग पडणार नाहीत.
- डब्बा भरण्यापूर्वी त्याला तेल किंवा तूप लावा. यामुळे डाग पडणार नाहीत. तसेच धुतल्यानंतर तो डब्बा स्वच्छ पुसून घ्या.
- सारे प्रयत्न करूनही जुन्या डब्ब्यामधील डाग जात नसल्यास तो फेकून द्या आणि नवा डब्बा वापरायला घ्या.
टीप :
प्लॅस्टिकचा डब्बा विकत घेताना तो बीपीए फ्री असलेला घ्यावा. बीपीए म्हणजेच Bisphenol A या प्लॅस्टिकमधील केमिकलमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो. या घटकामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
Reference:
Vogel, S. A. (2009). The politics of plastics: the making and unmaking of bisphenol a “safety”. American journal of public health, 99(S3), S559-S566.