Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

काही विशिष्ट लोकांनाच डास अधिक का चावतात याची ’3′कारणं !

$
0
0

Read this in English

Translated By  -  Dipali Nevarekar

  छायाचित्र सौजन्य –Getty Images

पावसाळ्याच्या दिवसात अस्वच्छता आणि पाण्याच्या डबक्यांमुळे मच्छरांची पैदास अधिक वाढते. प्रवासादरम्यान बाहेर फिरताना, रेल्वेमध्ये, घरामध्ये हाता-पायांवर डास डंख मारतात. पण काही विशिष्ट लोकांना  डास चावण्याचे प्रमाण आजूबाजूच्या व्यक्तींपेक्षा थोडे अधिक असते. मग पहा त्यामागे काय आहेत वैज्ञानिक कारणं. (नक्की वाचा : डासाच्या डंखाचा त्रास दूर करेल केळ ! )

1. तुमचा रक्तगट ‘O’ असल्यास :

Journal of medical entomology च्या 2004 सालच्या अहवालानुसार, इतर रक्तगटांच्या व्यक्तींच्या तुलनेत डास ओ रक्तगटाच्या व्यक्तींकडे अधिक आकर्षित होतात.

या अभ्यासानुसार डास सर्वप्रथम ओ रक्तगट त्यानंतर ए रक्तगट त्यानंतर बी रक्तगट आणि सगळ्यात शेवटी एबी रक्तगटाच्या व्यक्तींकडे आकर्षित होतात. त्यामुळे ओ रक्तगटाच्या व्यक्तींनी डासांपासून स्वतः चा बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण डासांमुळे मलेरिया, डेंगी, चिकनगुनिया, झिका यासारख्या आजारांचा धोका वाढतो.

2. गर्भवती स्त्रिया :

वयोवृद्ध किंवा लहान मुलांच्या तुलनेत गर्भवती स्त्रियांमध्ये डासांचा डंख होण्याचा धोका अधिक असतो. the annals of tropical medicine and parasitology 2004 च्या अभ्यासानुसार सामान्य स्त्रियांच्या तुलनेत गर्भवती स्त्रियांना डास चावण्याचा धोका दुप्पट असतो. मेटॅबॉलिक रेट अधिक असणार्‍यांमध्ये कार्बन डायऑक्साईडच्या निर्मितीचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे त्यांच्याकडे डास आकर्षित होतात. गर्भवती स्त्रियांचे मेटॅबॉलिझम वाढलेले असते त्यामुळे त्यांना डास चावण्याची शक्यताही वाढते.

3. तुमची जणुकं mosquito magnet असल्यास :  

तुमच्या शरीरातील जणूकं तुम्हांला mosquito magnet बनवतात.the journal Infections, Genetics and Evolution  2013 सालच्या अभ्यासानुसार शरीरातील काही विशिष्ट जणूकं डासांना आकर्षित करतात.the journal Infections, Genetics and Evolution  नामक ही जणूकं शरीराच्या वासामध्ये असतात. त्यामधील केमिकल्समुळे डास अधिक जवळ येतात. तसेच डास विशिष्ट भागावर चावतात.   ‘Olfaction in Mosquito-Host Interactions’ या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार डेंगीला कारणीभूत असणारे डास (Aedes aegypti) डोक्याजवळ अधिक चावतात.

डासांना पळवून लावा या ’10′ नैसर्गिक उपायांनी !  ( उपाय पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा )

 

malaria-mosquitoes-diseases-THS

References

  1. Shirai Y, Funada H, Seki T, Morohashi M, Kamimura K. Landing preference of Aedes albopictus (Diptera: Culicidae) on human skin among ABO blood groups, secretors or nonsecretors, and ABH antigens. J Med Entomol. 2004 Jul;41(4):796-9. PubMed PMID: 15311477.
  2. Himeidan YE, Elbashir MI, Adam I. Attractiveness of pregnant women to the malaria vector, Anopheles arabiensis, in Sudan. Ann Trop Med Parasitol. 2004 Sep;98(6):631-3. PubMed PMID: 15324469.
  3. Tauxe GM, MacWilliam D, Boyle SM, Guda T, Ray A. Targeting a dual detector of skin and CO2 to modify mosquito host seeking. Cell. 2013 Dec 5;155(6):1365-79. doi: 10.1016/j.cell.2013.11.013. PubMed PMID: 24315103; PubMed Central PMCID:PMC3899525.
  4. Verhulst NO, Beijleveld H, Qiu YT, Maliepaard C, Verduyn W, Haasnoot GW, Claas FH, Mumm R, Bouwmeester HJ, Takken W, van Loon JJ, Smallegange RC. Relation between HLA genes, human skin volatiles and attractiveness of humans to malaria mosquitoes. Infect Genet Evol. 2013 Aug;18:87-93. doi: 10.1016/j.meegid.2013.05.009. Epub 2013 May 18. PubMed PMID: 23688850.
  5. CIBA Foundation Symposium. Olfaction in Mosquito-Host Interactions, Volume 781 of Novartis Foundation Symposia,John Wiley & Sons, 2008.342 p.

Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>