Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

शांत झोप मिळवण्यासाठी ‘जायफळ’फायदेशीर !

$
0
0

भारतीय खाद्यसंस्कृतीची खरी खासियत त्यात मिसळल्या जाणार्‍या मसाल्यांमध्ये आहे.  जायफळ आणि वेलचीने तर गोडाच्या पदार्थांची चव अधिकच वाढते. पदार्थ चविष्ट बनवण्यासोबतच जायफळामध्ये काही औषधी गुणधर्मदेखील आहेत. निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी जायफळ अत्यंत उपयुक्त आहे. ‘ the Journal of Ethnopharmacology’च्या अहवालानुसार जायफळमुळे झोप येण्याची शक्यता वाढते तसेच तुम्हांला दीर्घकाळ शांत झोप मिळते.  रात्री झोप येत नाही ? यामागे कामाचा नाही तर या ’7′ पदार्थांचा ताप आहे !

  • जायफळाचे फायदे 

जायफळात आढळणारे ‘ट्रायमिरस्ट्रेन’ (trimyristin) घटक शरीरातील स्नायू आणि चेतासंस्था आरामदायी  स्थितीत आणण्यास मदत करतात. त्यामुळे निद्रानाशाची समस्या दूर करण्यास मदत होते. तसेच तुम्ही शांत व दीर्घकाळ झोपता. मग पहा तुम्हांला अजून किती तास झोपेची गरज आहे. 

  • कसा कराल जायफळाचा आहारात समावेश 

1. जायफळ – मधाचे मिश्रण :

जायफळाची चिमूटभर पावडर चमचाभर मधात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी किमान 15 मिनिटे आधी घ्यावे. मधात हे ‘5’ पदार्थ मिसळा आणि तुमचे वजन घटवा

2. जायफळाचा काढा : 

प्राचीन काळापासून शांत झोप येण्यासाठी जायफळाचा वापर केला जात असे.  जायफळाची पूड करून कपभर पाण्यात मिसळून उकळा. उकळ आल्यानंतर गॅस बंद करा आणि चहा गाळून घ्या. रात्रीच्या जेवणानंतर हा चहा तुम्हांला आरामदायी झोप येण्यासाठी हा चहा नक्कीच मदत करेल.

3. जायफळयुक्त दूध :

रात्री झोपण्यापूर्वी तुम्हांला दूध पिण्याची सवय असेल तर त्यात चिमूटभर जायफळ मिसळा. दुधामुळे  सेरोटोनीन आणि मेलाटोनीनचे प्रमाण वाढते. या दोन्हींमुळे तुम्हांला आरामदायी झोप मिळण्यास मदत होते. त्यामुळे दुधात जायफळ पूड घालून पिणे फायद्याचे आहे.

4. जायफळ आणि आवळ्याचा  रस :

ग्लासभर  आवळ्याच्या रसामध्ये चिमूटभर जायफळ पूड  मिसळल्यास पचन सुधारते. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर आरामदायी झोप येण्यास मदत होते. वजन घटवणारी 15 हेल्दी घरगुती ड्रिंक्स !

5. जेवणात  जायफळ :

रात्री झोपण्यापूर्वी चहा,कॉफी पिण्याची सवय असेल तर त्यात आवर्जून जायफळ पूड मिसळा. तसेच रात्रीच्या जेवणात सूप, कढी किंवा दह्याचा समावेश करत असल्यास त्यात जायफळाची पूड जरूर मिसळा.

6. जायफळ पावडर :

तुम्हांला एखाद्या पेयात किंवा जेवणाच्या पदार्थात जायफळ पूड मिसळणे  आवडत नसल्यास चिमुटभर पूड पाण्यासोबत घ्यावी.  रात्री झोपण्यापूर्वी  हा प्रयोग केल्यास निद्रानाशाची समस्या कमी होण्यास मदत होईल.

  • खबरदारीचा उपाय – :

निद्रानाशावर जायफळ परिणामकारक असले तरीही त्याचा अतिवापर टाळा. चिमूटभरापेक्षा अधिक जायफळ पूड खाऊ नका.  जायफळ अधिक प्रमाणात खाल्ल्यास पित्त, मळमळणं, अस्वस्थ  वाटणं, तोंड सुकणं, सतत तहान लागणं असा समस्या वाढण्याची शक्यता अधिक असते. तसेच काही औषधांसोबत जायफळ खाल्ल्यास दुष्परिणाम होण्याचा धोका अधिक असतो. रात्री झोप येत नाही? मग हे १० उपाय करून पहा !

Translated By  -  Dipali Nevarekar

Source – 6 ways to use nutmeg for a good night’s sleep

छायाचित्र सौजन्य –  Shutterstock

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>