Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य –Getty Images
भारतीय अन्नपदार्थांमध्ये चिंचेचा वापर प्रामुख्याने केला जातो. चटकदार पाणीपुरी असो किंवा आंबट -गोड कटाची आमटी, सार्यातच चिंचेचा वापर केला जातो. आहाराप्रमाणेच पाचकता वाढवण्यासाठी चिंचेचा वापर केला जातो. लहान मुलांच्या पोटातील जंताचा त्रास कमी करण्यासाठी चिंच फायदेशीर ठरते. पण जेवणानंतर चिंचेची गोळी खायला देण्यामागे काय विचार असेल हे तुम्हांला ठाऊक आहे का ? चिंचेची गोळी ही चिंचेचा कोळ, साखर, मीठ, तिखट यांनी बनवली जाते. चटकदार चिंचेची गोळी जितकी चविष्ट आहे तितकीच आरोग्यदायीदेखील आहे. म्हणूनच त्याच्या सेवनाचे फायदे साई आधार आयुर्वेद सेंटरच्या आहारतज्ञ डॉ. प्रभा चव्हाण यांच्याकडून जाणून घेतले आहेत.
- पचन सुधारते -:
चिंचेच्या कोळामध्ये डाएटरी फायबर्स मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते. तसेच शौचाला सुलभ होते. यामुळे डाएटरी ज्युस आणि एन्झाईम्सचे सिक्रीशन सुधारते. तसेच पचनकार्य सुधारते. चिंचेचा कोळ पित्ताचा त्रास कमी करण्यासही फायदेशीर ठरतो. जेवणानंतर 2-3 चिंचेच्या गोळ्या खाल्ल्यास पोटातील गॅस, अपचन, ब्लोटींगचा त्रास कमी होण्यास मदत होते. अनेकजण आवळा, वेलची, खडीसाखर जेवणानंतर खातात. तेदेखील फायदेशीर ठरते.
- रक्तातील कोलेस्ट्रेरॉल नियंत्रणात राहते -:
चिंचेचा कोळ रक्तातील कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. यामूळे हृद्यविकार नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. म्हणूनच जेवणानंतर चिंचेची गोळी खा. परिणामी हृद्याचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते.
- शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते -:
चिंचेमध्ये आढळणारे टारटारिक अॅसिड अॅन्टीऑक्सिडंटयुक्त असते. यामूळे शरीरातील फ्री रॅडीकल्सचा धोका कमी होण्यास मदत होते. जेवणानंतर चिंचेच्या गोळ्या खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. यासोबतच चिंचेमधील पोटॅशियम घटक रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. शरीरातील पाण्याची पातळी राखते तसेच हृद्याचे कार्य सुधारते. मात्र जेवणानंतर 2-3 गोळ्यांपेक्षा अधिक खाऊ नका. त्यामधील साखर आणि मीठ यांचे प्रमाण अति झाल्यास आरोग्य बिघडू शकते.