Read this in English
Translated by Sushantdeep Sagvekar
आंंब्याचा मोसम संंपत आला आहे. या मोसमातला शेवटचा आंंबा आणि रमजान महिन्यातील खाण्याची चंगळ या दोन्हीचा मिलाफ करून तुम्ही हेल्दी टेस्टी रेसिपीचा आस्वाद घेऊ शकता. आमरस, आंब्याचा मिल्कशेक यापेक्षा आंबा – ब्राऊन राईस फिरनी हा एक चविष्ट आणि नवा पर्याय आहे. गोड आवडीने खाणाऱ्यांंकरीता वजन वाढण्याची काळजी न करता खाता येईल अशी ही रेसीपी आहे. यात गोड चवीसाठी साखरेऐवजी मध आणि आमरस आहे. या रेसीपीमध्ये वेगन डाएट करणाऱ्यांंकरीता नेहमीच्या दुधाऐवजी सोया दूध वापरून हेल्दी ट्विस्ट देता येऊ शकतो. बदामासारखा सुकामेवा आणि आरोग्याला उपयुक्त अशी चवदार करवंंद देखील आहेत. नक्की वाचा भाताची पेज रोज पिण्याची ’5′ हेल्दी कारणं
आंंब्याचे फायदे:
- रोगप्रतिकारशक्ती वाढते
- कर्करोगाची समस्या कमी होते
- रक्तदाब प्रमाणात राहतो अधिक फायदे जाणुन घेण्यासाठी येथे क्लिक करा.
साहित्य:
- १/२ कप भिजवलेला ब्राऊन राईस
- ४ कप सोया दूध
- १/२ कप लो फॅट क्रिम
- ४ टेबल स्पुन मध
- १/२ हापूस आंंब्याचा रस
- २ टेबल स्पुन सोललेल्या बदामाचे तुकडे
- चिमुटभर केशर
- ५-६ सुकलेली करवंंदे
- पुदिन्याची पाने सजावटीकरीता
कृती:
- तांंदुळ १ तास भिजत ठेवा.
- त्यानंंतर ते धुवुन त्यातील पाणी काढुन टाकावे. तांदूळातील ओलसरपणा कमी होण्यासाठी सुती कापडात बांधुन ठेवा.
- तांंदळातील पाणी कमी झाल्यानंंतर त्याची मिक्सरमध्ये जाड पावडर करा.
- त्यात अर्धा कप थंंड दूध मिसळा आणि ढवळुन त्याची पेस्ट करुन बाजुला ठेवा.
- उरलेले दूध उकळा आणि त्यात पेस्ट मिसळुन मिश्रण ढवळा.
- मिश्रणात मध मिसळून काही वेळ उकळु द्या.
- त्यात आंंब्याचा रस मिसळा आणि मिश्रण ढवळुन घ्या.
- मिश्रण भांंड्यात काढुन तासभर फ्रिजमध्ये थंंड करण्यासाठी ठेवा.
- थंंड झालेले मिश्रण बदाम, केसर, पुदिन्याची पाने आणि सुक्या करवंंदांंनी सजवा. जाणून घ्या या आरोग्यदायी कारणांसाठी जरूर कराच आहारात भाताचा समावेश !
जाणुन घ्या कशी बनवावी रमजान हेल्दी रेसिपी: लखनवी मटण बिर्याणी
छायाचित्र स्रोत: http://indiansweetsrecipesimages.blogspot.in/