Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर –टाळूवरील खाज कमी करण्याचा नैसर्गिक उपाय !

$
0
0

Translated By  -  Dipali Nevarekar

Read this in English

छायाचित्र  सौजन्य – Shutterstock

उन्हाळ्याचा कडाका असो किंवा हिवाळ्यातील थंडावा या दोन्ही ऋतूमध्ये त्वचेला त्रास होतोच.टाळूवरील त्वचेला खाज येणे त्रासदायक आणि चारचौघात लाजिरवाणे असते. अनेकदा खाजेवर उपाय करताना खूप सारे पैसे खर्च होतात. सोबतच केमिकल्सचा दुष्परिणाम झाल्यास हा त्रास अधिक वाढतो. मग त्यापेक्षा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर या नैसर्गिक उपायाने टाळूवरील खाज कमी करण्यास मदत करतात.

दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी, केसातील कोंडा, काखेत येणारा घाम अशा अनेक समस्यांवरदेखील अ‍ॅपल सायडर व्हिनेगर फायदेशीर ठरते. यामधील सायट्रिक अ‍ॅसिड बॅक्टेरियाची वाढ कमी करण्यास मदत होते. त्यापासून इंफेक्शन वाढत नाही. यामधीलअ‍ॅन्टीसेप्टीक आणि दाहशामक घटक इंफेक्शनचा धोका कमी करतात. सतत घाम आल्याने बॅक्टेरिया आणि फंगसचे इंफेक्शन अधिक वाढते. तसेच खाज आल्याने कमी झालेली त्वचेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

कसा कराल उपाय ?

  • त्वचेवरील खाज कमी करण्यासाठी उपाय -

10 मिली पाण्यात  मिलीभर अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिसळा. या मिश्रणामध्ये कापसाचा गोळा बुडवा. आणि खाज येणार्‍या त्वचेवर लावा. मात्र शरीरभर खाज येत असल्यास त्यामध्ये थोडे व्हिनेगर बादलीमध्ये  मिसळा. आंघोळ करताना या पाण्याचा वापर करा.

  • टाळूवर खाज येत असल्यास -

टाळूवर खाज येत असल्यास केस थंड पाण्याने स्वच्छ धुवा. ते नीट कोरडे होऊ द्या. त्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये 5 मिली अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि पाणी मिसळा. हा स्प्रे केसांवर मारून 15 मिनिटं राहु द्या. त्यानंतर केस माईल्ड शाम्पूने धुवा. हा उपाय दर एक आड एक दिवस करा.

References

  1. Stepanovs, J. (1999). Skin Saver Remedies. Harald Tietze Publishing P.
  2. Lansky, V., & Campbell, M. (2004). Vinegar: Over 400 Various, Versatile & Very Good Uses You’ve Probably Never Thought of. Book Peddlers.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>