Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

झोपेत होणारे केसांचे नुकसान टाळण्यासाठी खास एक्सपर्ट टीप्स !

$
0
0

Translated By  -  Dipali Nevarekar

Read this in English

छायाचित्र  सौजन्य – Shutterstock

रात्री झोपताना नेमके केस मोकळे ठेवून झोपावे की बांधून ? हा प्रश्न अनेकींना पडतो. रात्री झोपेत केसांमध्ये गुंता होतो आणि सकाळी तो सोडवताना नुकसान होण्याचे प्रमाण अधिक वाढते. मग केसांचे आरोग्य जपण्यासाठी नेमकी कशी काळजी घ्यावी याकरिता ब्युटी आणि हेअर एक्सपर्ट जनेत फर्नांडीस यांनी दिलेल्या या खास टीप्स

  • 4-5 थेंब लेमनग्रास ऑईल हातावर घेऊन केसांना टोकांशी लावा. आणि त्यानंतर केसांचा आंबाडा बांधून झोपा. लेमनग्रास ऐवजी तुम्ही पेपरमिंट ऑईल वापरू शकता. यामुळे केसामधील शुष्कता आणि टोकांना  होणारे  नुकसान कमी होण्यास मदत होते.
  • केस मोकळे ठेऊन झोपणे अनेकांना त्रासदायक वाटते. यामुळे सहाजिकच केसांचे नुकसान अधिक प्रमाणात होते. मग अशावेळी  तुमचे केस सरळ असतील तर हलकेच पोनिटेल बांधून झोपा. म्हणजे सकाळी उठल्यावर ते फ्रिजी होणार नाहीत. तुमचे केस लांबसडक असतील तर त्याचे हलकीच  वेणी बांधा. म्हणजे ते गुंतणार नाहीत. तसेच तुमचे केस कुरळे असतील तर डोक्यावर अंबाडा बांधून झोपा. मात्र केस बांधताना इलॅस्टिकचा हेअर बॅन्ड वापरू नका. यामुळे केसांवर विनाकारण ताण येण्याची शक्यता असते.
  • रात्री झोपायला जाण्यापूर्वी केस नीट विंचरा. त्यासाठी मोठ्या दातांची फणी वापरा. केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत केस योग्यरित्या विंचरा. यामुळे टाळूवर निर्माण होणारे नैसर्गिक तेल टोकांपर्यंत नीट पोहचेल.
  • रात्री झोपताना केस सिल्कच्या किंवा मऊ कापडामध्ये गुंडाळून झोपा. दुसर्‍या दिवशी सकाळी केस मोकळे करा. यामुळे केसांचे नुकसान टाळण्यास मदत होईल.
  • ओले केस असताना झोपू  नका. ते पुरेसे कोरडे करा. अन्यथा ते गुंतण्याची शक्यता अधिक असते.
  • उशीचं कव्हर कॉटनची असल्यास ती बदलून सिल्क किंवा सॅटीनच्या कापडाची बनवा. कॉटन कापडामधून मॉईश्चरायझर शोषले जाते. तसेच गुंता वाढतो. सिल्कच्या मऊ कापडामुळे मॉईश्चरायझर शोषले जात नाही. आरामदायी झोपेसाठी कशी कराल उशीची निवड ? हे नक्की जाणून घ्या.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles