Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
मी 22 वर्षीय युवती असून नियमित जिममध्ये व्यायाम करते. मात्र मासिकपाळीच्या 5 दिवसांमध्येदेखील व्यायाम करणे त्रासदायक ठरणार नाही ना ? अनेकजण या दिवसांत आराम करण्याचा सल्ला देतात. मग नेमके काय करावे ? जिममध्ये व्यायाम करावा का ?
मासिकपाळीचे दिवस हे स्त्रीयांना त्रासदायक वाटतात. या दिवसात होणारा त्रास, मानसिक व शारिरीक बदल यामुळे अनेकांसाठी त्रासदायक वाटू शकतात. त्याचसोबत ‘मासिकपाळी’ विषयी समाजात अनेक समज-गैरसमज असल्याने मुलींच्या, स्त्रियांच्या समाजातील सर्रास वावराबद्दल काही बंधन असतात. या काळात अनेकींना पोटदुखीचा त्रास होतो म्हणून आराम करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र व्यायम करणे कितपद फायदेशीर ठरते याबद्दलचा खास सल्ला फीटनेस एक्सपर्ट शीनू अरोरा यांनी दिला आहे.
मासिकपाळीच्या दिवसात व्यायम करणे अगदीच फायदेशीर आहे. व्यायामादरम्यान शरीरातून एंडॉरफिन नामक हार्मोन्सचा प्रवाह होतो. या हार्मोनमुळे ताणतणाव, डोकेदुखी, वेदना, क्रॅम्स कमी होण्यास मदत होते. व्यायामाचे हे फायदे असले तरीही अतिप्रमाणात किंवा थकवणारे व्यायाम करणे टाळा. प्रत्येक स्त्रीसाठी तिच्या शारिरीक समस्या आणि कुवतीनुसार व्यायामाचे बंधन असते. प्रत्येक स्त्रीसाठी मासिकपाळीतील त्रासदेखील वेगवेगळा असतो. ( नक्की वाचा: मासिकपाळीच्या काळातील वेदना दूर करण्यासाठी पेन किलर ऐवजी या ’10′ नैसर्गिक उपायांचा वापर करा)
कोणत्या प्रकारचे व्यायाम टाळावेत ?
मासिकपाळीच्या दिवसात व्यायाम करणे फायद्याचे असले तरीही काही अपवाद आहेत. या दिवसात प्रामुख्याने खूप कष्टाचे कोअर व्यायाम करणे टाळा. तसेच शीर्षासनासारखे शरीरा उलट्या बाजूने झुकेल असे व्यायाम किंवा योगासनं करणेदेखील टाळा. मासिकपाळीच्या दिवसात सौम्य स्वरूपाचा व्यायाम करा. यामध्ये कार्डीयो, स्ट्रेचिंगचा समावेश होतो. तसेच काही योगासनांचादेखील समावेश होऊ शकतो.
काय खावे ?
मासिकपाळीचा त्रास वाढू नये म्हणून व्यायामा सोबतच आहाराचे पथ्यपाणी पाळणेदेखील गरजेचे आहे. मासिकपाळीच्या दिवसांत ब्लोटींगचा त्रास सामान्य असतो. मात्र तरीही आहार हलका आणि परिपूर्ण असावा. म्हणजे मरगळ किंवा नैराश्य जाणवणार नाही. तसेच या दिवसामध्ये खारट, मसालेदार, कॅफिनयुक्त, अतिगोडाचे पदार्थ टाळा. चॉकलेट खाऊ नका. उलट प्रोटीन, कॅल्शियम, आयर्नयुक्त पदार्थ आणि भरपूर पाणी यांचा आहारात समावेश करा. रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी कोरफडीच्या रसासोबत मध प्यावे. तसेच मासिकपाळीच्या दिवसांत हे ’6′ पदार्थ टाळाच !
व्यायामाप्रमाणे मासिकपाळी बाबत मुलींच्या मनात हे 10 प्रश्न देखील नक्की डोकावतात. मग त्याचीदेखील उत्तरं पाहण्यासाठी येथे क्लिक करा