मेष -: या आठवड्यात पचनाचे किंवा श्वसनाचे विकार त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. लक्षण आढळल्यास त्यावर वेळीच उपचार सुरू करा. दुर्लक्ष केल्याने समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता वाढते.
वृषभ – : मध्यमवयीन आणि त्याहून अधिकच्या वयोगटातील लोकांनी जुन्या व्याधींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपचार वेळीच करा. अल्टरनेटीव्ह उपचारांची तुम्हांला मदत होईल. आरोग्याला गृहीत धरणे टाळा. आरोग्यदायी सवयी आणि लाईफस्टाईलमधील सकारात्मक बदल करून स्वास्थ्य सुधारण्याचा प्रयत्न करा.
मिथून-: मधूमेहींना आहाराचे पथ्य पाळणे गरजेचे आहे. अन्यथा त्रास वाढण्याची शक्यता आहे. जुन्या व्याधी नसलेल्या व्यक्तींना या आठवड्यात आरोग्याची चिंता नाही. मात्र नियमित योगा आणि ध्यानसाधना करा.
कर्क -: या आठवड्यात राशीतील ग्रहमान आरोग्याला अनुकूल आहे. काही जुने त्रास असल्यास त्यावर उपचार करा. दुर्लक्ष केल्याने त्रास वाढल्यास त्यावर नियंत्रण मिळावणे कठीण होऊन बसेल. त्यामुळे चालणे, हलका व्यायाम करणे याद्वारा तुमचा स्टॅमिना वाढवा.
सिंह- : या आठवड्यात आरोग्याच्या चिंता वाढू शकतात. अनियमित रक्तदाबाची समस्या असल्यास चिंता वाढू शकते. मसालेदार जंक फूड खाणे टाळा. योगा आणि ध्यानसाधनेने फीटनेस वाढवण्याचा प्रयत्न करा.
तूळ -: राशीतील ग्रहमान पाहता सांधेदुखी वाढू शकते. वेदना खूपच त्रासदायक होण्याची शक्यता आहे. त्यावर अल्टरनेटीव्ह उपायांनी मात करा. कॅल्शियमयुक्त भाज्या, फळांचा आहारात समावेश करा. नियमित व्यायाम करा.
कन्या – : हा आठवडा तुमच्यासाठी आरोग्यदायी आहे. नवा कोणताच त्रास उद्भवणार नाही. श्वसनाशी निगडीत आजार असल्यास काळजी घ्या. सकाळ-संध्याकाळ चालल्याने तुमचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी मदत होईल.
वृश्चिक- : कामामुळे येणारा ताण तुमच्या आरोग्याच्या चिंता वाढवेल. या आठवड्यात पचनाचे विकार वाढण्याची शक्यता आहे. हलक्या व्यायामामुळे तुमचे स्वास्थ्य सुधारायला मदत होईल. रक्तदाबाचा त्रास असणार्या व्यक्तींनी मात्र नियमित चेकअप करून त्यानुसार उपचार सुरू ठेवणे आवश्यक आहे.
धनू- : हा आठवडा तुमच्यासाठी आरोग्यदायी आहे. कॅल्शियम कमी असणार्यांनी आहारात कॅल्शियमयुक्त फळं आणि भाज्यांचा समावेश करावा. नियमित योगा आणि वप्राणायम केल्याने स्वास्थ्य सुधारण्यासाठी मदत होईल.
मकर- : या आठवड्यात पचनाचे विकार त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यावर उपचार करण्यात टाळाटाळ करू नका. काहींना डोळ्यांचे आजारदेखील होऊ शकतात. त्यावर उपचार करण्यासाठी स्पेशलिस्टची मदत घ्या. आरोग्याला गृहीत धरणे टाळा. त्याची काळजी घ्या.
कुंभ : या आठवड्यात अपघाताची दाट शक्यता आहे. तसेच पचनमार्गात बिघाड होऊ शकतो. त्यावर तात्काळ उपचार करा. राशीतील ग्रहमानआरोग्यविषयक समस्या वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे विशेष काळजी घ्या. जीवनशैलीत सकारात्मक बदल करा.
मीन : या आठवड्यात व्हायरल इंफेक्शन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लक्षण आढळताच उपचार सुरू करा. योगसाधना आणि ध्यानसाधनेने तुमचा फीटनेस वाढवण्याचा प्रयत्न करा.