वाढत्या शहरीकरणामुळे आजकाल सर्वत्रच डासांची पैदास वाढत आहे. यामुळे मलेरिया, डेंग्यू ,चिकनगुनिया आणि झिका सारख्या आजारांचा धोका वाढतो. (नक्की वाचा : मलेरियाची ही ’6′ लक्षणं दुर्लक्षित करू नका !) डास चावल्यामुळे अंगावर दाने उठतात, सतत खाज येत राहते. म्हणूनच कॉईल, रॅकेट्स अशा उपायांपेक्षा काही नैसर्गिक उपचारांनी डासांना घरापासून दूर ठेवा. आणि डास चावल्यानंतर होणारा त्रास टाळण्यासाठी रेपलंट क्रीम लावण्याऐवजी केळ्याची साल लावा. यामुळे डासाच्या डंखाचा त्रास कमी होण्यास मदत होते. नक्की वाचा : त्वचेवर खाज येतेय? मग करा हे 6 घरगुती उपाय!
डासाच्या डंखामुळे त्वचेवर होणारी जळजळ कमी करण्यासाठी केळ्यासोबत केळ्याची सालदेखील फायदेशीर ठरते. कैराली आयुर्वेदाचे डिरेक्टर गीता रमेश यांच्या सल्ल्यानुसार डास चावल्यानंतर त्या जागी केळ्याचा पल्प किंवा साल लावल्यास डासांच्या डंखामुळे होणारा त्रास कमी होण्यास मदत होते. Journal of Pharmacognosy and Phytochemistry च्या अभ्यासानुसार डासांच्या डंखामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी केळ्याची साल हा घरगुती उपाय फायदेशीर ठरतो. केळ्याप्रमाणे केळफूल आणि केळ्याच्या खोडाचे फायदेदेखील जाणून घ्या.
- कसा कराल हा उपाय ?
डास चावल्यानंतर त्रास होत असल्यास पिकलेल्या केळ्याचा पल्प तुम्ही थेट लावू शकता. यामुळे त्वचा थंड होण्यास तसेच खाज येण्यापासून आराम मिळण्यास मदत होते.
केळ्याची वापरण्यापूर्वी त्वचेचा तो भाग सॅनिटाईझ करुन घ्या. त्यानंतर केळ्याच्या सालीची आतील बाजू डास चावलेल्या जागेवर 5-10 मिनिटे दाबून ठेवा.
त्वचेवर केळ्याची साल घासा. यामुळे त्वचेवरील खाज कमी होण्यास आणि शुष्क त्वचा मोकळी होण्यास मदत होते.
Reference
Kumar, K. S., & Bhowmik, D. (2012). Traditional and medicinal uses of banana. Journal of Pharmacognosy and Phytochemistry, 1(3).