Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य : Shutterstock
पांढरे शुभ्र दात कोणाला आवडत नाहीत? कारण यामुळे तुमचे हास्य अधिक खुलून येते आणि तोंडाचे आरोग्यही सुधारते. आजच्या जाहिरातीच्या युगात सारेच टुथपेस्ट ब्रॅन्ड चमकदार दातांचा दावा करतात. डेन्टिस्टकडे चमकदार दातांसाठी अनेक ट्रीटमेंट उपलब्ध असतात. पण ‘केळ्याची साल’ हा घरगुती उपाय दातांची चमक वाढवायला मदत करतात हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
पित्त कमी करण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी तसेच कमी करण्यासाठीही केळं गुणकारी ठरतं. मग केळं खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून देण्याऐवजी दात चमकवायला अवश्य वापरा. केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम यासोबतच व्हिटामिन डी चा मुबलक साठा असतो. यामुळे दातांची चमक वाढवायला मदत होते. पोटॅशियम घटकांमुळे दातांमधील सेंन्सिटीव्हीटीची समस्या कमी करण्यास मदत होते. एका मिनिटात दातांचा पिवळेपणा हटवण्यासाठी हा उपाय करून पहा
एका अभ्यासाच्या निष्कर्षानुसार, केळ्याच्या सालीची आतील बाजू दातांवर दोन मिनिटे घासल्यास ते अधिक शुभ्र होतात.
कसा कराल हा उपाय :
- पूर्ण पिकलेल्या केळ्याची साल निवडा मात्र त्यावर काळे डाग नाहीत याची काळजी घ्या.
- त्यानंतर सालीचे 2 इंचाचे तुकडे करा. यामुळे सालीचा तुकडा हातात पकडणे सुकर होईल. तसेच दातांवर घासताना ग्रीप मिळेल.
- एका तुकड्याने 2-3 दात घासणे शक्य होईल. ते सालीच्या तुकड्याने गोलाकार दिशेने किंवा वरा खाली घासावेत.
- त्यानंतर तुमच्या ब्रश आणि टुथपेस्टने दात घासा. पाण्याने तोंड स्वच्छ धुवा. चूळ भरल्याने दातांमध्ये अडकलेले सालीचे कण बाहेर पडण्यास मदत होईल.
हा उपाय केल्यानंतर लगेचच दात पांढरेशुभ्र दिसणार नाही मात्र नियमित काही दिवस हा उपाय केल्यास दातांची चमक नक्कीच सुधारायला मदत होईल. त्यामुळे किमान हा प्रयोग आठवड्यातून एकदा करावा.
अजून एका अभ्यासाच्या निष्कर्षानुसार, केळ्याच्या सालीतील अॅन्टी फंगल, अॅन्टीबायोटीक घटक आढळतात. त्यामुळे केळ्याची साल दातांवर घासल्यास दात शुभ्र होतात तसेच तोंडाची शुद्धतादेखील वाढते.
References:
- Rizvi, F. J., & Zaidi, M. A. Oral Hygiene in Ayurveda with Special Refrence to Kavala (Oil Pulling).
- Kumar, K. S., Bhowmik, D., Duraivel, S., & Umadevi, M. (2012). Traditional and medicinal uses of banana. Journal of Pharmacognosy and Phytochemistry,1(3), 2278-4136.
- Haywood VB Department of Oral Rehabilitation, School of Dentistry, Medical College of Georgia, Augusta, USA. Compendium of Continuing Education in Dentistry (Jamesburg, N.J. : 1995) [2005, 26(9 Suppl 3):11-20]