Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

नग्न झोपण्याचे ’6′फायदे !

$
0
0

Read this in English 

Translated By  -  Dipali Nevarekar

  छायाचित्र सौजन्य : Shutterstock

अनेकजण ‘नग्न’ झोपण्याच्या संकल्पनेपासून दूर राहतात. मात्र लाजून किंवा मूर्खपणाची गोष्ट समजून याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याचे फायदे समजून घ्या आणि याबाबत थोडा विचार करून पहा. मग पहा ‘नग्न’ झोपण्याचे फायदे

#1 साथीदारासोबतचे सख्य वाढते -: 

साथीदारासोबत नग्न झोपण्यामुळे तुमचे रिलेशनशिप अधिक घट्ट होण्यास मदत होते. त्वचेचा एकमेकांशी संपर्क आल्यास ऑक्सिटीनचा प्रवाह होतो. ऑक्सिटीन हे हार्मोन किंवा न्युरोट्रान्समीटर किस किंवा आलिंगन दिल्यानंतर एकमेकांमधील सख्य वाढवण्यात प्रमुख भूमिका पार पाडते. तसेच एकमेकांमधील संकोच कमी होण्यास मदत होतो. इंग्लंडमध्ये एका संशोधनातून पुढे आलेली एक बाब म्हणजे, 57 % नग्न झोपणारी लोकं इतरांच्या तुलनेत साथीदारासोबत अधिक आनंदी राहतात.

#2. स्वतःच्या शरीराकडे सकारात्मकतेने पहाल -:

स्वतःला नग्न पाहणे आणि शरीराच्या आकाराला स्विकारणे ही अनेकांसाठी कठीण बाब आहे. काही मॉडेल्स आणि सिनेतारकांची ‘परफेक्ट बॉडी’ आंधळेपणाने आदर्श मानून अनेकांना स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होतो. नग्न झोपल्याने स्वतःबद्दलचे असे काही गैरसमज दूर करून स्वतःला स्विकारणे अधिक सुकर होते. तसेच हळूहळू स्वतःच्या शरीरामध्ये होणारे बदल तुम्हांला जाणवल्याने तुमचा दृष्टीकोन बदलायला मदत होईल.

#3. तुम्हांला शांत करते -:       

उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणात उष्णता असल्याने शांत झोपणे कठीण होते. अशावेळी कपड्यांमुळे अधिकच गरम होते. नग्न झोपल्याने अतिरिक्त उष्णता कमी करण्यास मदत होते. परिणामी एसीच्या अचानक थंड होणार्‍या वातावरणापासून दूर राहून शांत आणि पटकन झोप  येण्यास मदत होते.

#4.  त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते -:

दिवसभर कपड्यांमध्ये राहिल्याने उष्णतेमुळे, आद्रतेमुळे त्वचेला स्वतःहून पुनरुज्जीवित होण्यासाठी पुरेशी संधी मिळत नाही. मात्र रात्री झोपल्यानंतर त्वचेमध्ये काही बदल होतात. अशावेळी नग्न झोपल्यास त्वचेच्या कार्यामध्ये कपड्याचा अडथळा येत नाही. त्वचा स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकते तसेच अकाली स्किन एजिंगचा त्रास कमी होतो.

#5. शुक्राणूंचे कार्य/निर्मिती सुधारते - 

युनिव्हर्सिटी ऑफ सॅन्डफॉर्ड आणि नॅशनल हेल्थ इन्स्टिट्युट ऑफ़ चाईल्ड अ‍ॅन्ड ह्युमन डेव्हलप्मेंट 2015 यांच्या अभ्यासानुसार, रात्रीच्या वेळी घट्ट बॉक्सर किंवा अंडरवेअर घातल्याने शुक्राणूंच्या क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 500 पुरूषांवर केलेल्या प्रयोगाच्या निष्कर्षानुसार, घट्ट अंडरवेअर घालणार्‍यांच्या तुलनेत रात्री नग्न झोपणार्‍या पुरूषांच्या शुक्राणूंमध्ये डीएनए फ्रॅगमेंटेशनचा धोका 25 % कमी आढळून आला. हा अहवाल संशोधकांनी अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रोडक्टीव्ह मेडिसिनच्या वार्षिक सभेमध्ये मांडला. त्यामुळे बाळाचा विचार करत असाल तर नग्न झोपा आणि या सेक्स पोजिशन्स नक्की ट्राय करा.

#6. योनिमार्गाचे आरोग्य सुधारते -

त्वचेप्रमाणे योनिमार्ग ( vagina)देखील आरोग्यदायी राहण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. व्हर्जिनल यिस्ट इंन्फेक्शन हे दमट जागी अधिक होते. त्यामुळे नग्न झोपल्यास स्त्री शरीरातील नाजूक भागात फंगसची वाढ होत नाही. परिणामी खाज येणे, इंफेक्शनचा धोका कमी होतो.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>