Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

साप्ताहिक भविष्य आरोग्याचे (8-14 फेब्रुवारी)

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

मेष –

तुमच्या राशीतील ग्रहमान आरोग्यास अनुकूल नाही. मध्यमवयीन व त्याहून अधिकच्या वयोगटातील लोकांनी जुने विकार नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष काळजी आणि वेळेवर औषधं घेणे गरजेचे आहे. या आठवड्यात पित्ताचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. त्यावर तात्काळ उपचार करा म्हणजे त्याची गंभीरता वाढणार नाही. 

वृषभ -

दीर्घकाळ त्रासदायक ठरणार्‍या काही आजारांच्या व्यक्ती वगळता इतरांना हा आठवडा ठीकठाक जाईल. ग्रहमान पाहता रक्तदाबाचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. तणावपूर्ण स्थितींपासून दूर रहा. नियमित ध्यानसाधना आणि योगासनं केल्यास स्वास्थ्य जपण्यास तसेच फीटनेस वाढण्यास मदत होईल. 

मिथून -

श्वसनाचे विकार या आठवड्यात त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. फिजिशियनचा सल्ला घेऊन त्यावर वेळीच औषधोपचार करा. सांध्याचे दुखणे असणार्‍यांसाठी हा आठवडा त्रासदायक जाण्याची शक्यता आहे. त्रास अधिक वाढू नये म्हणून वेळीच उपचार  घ्या. फीटनेस वाढवण्यासाठी व्यायाम नियमित करा.

कर्क -

तुमच्या राशीतील ग्रहमान आरोग्यास अनुकूल आहे. काही जुने त्रास थोडे त्रासदायक ठरू शकतात. त्यावर वेळीच उपचार करा. रक्तदाबाच्या समस्या किंवा सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका. त्याची गंभीरता वाढण्याआधीच उपचार घ्यावेत.

सिंह -

या आठवड्यात व्हायरल इंफेक्शनपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. त्यासंबंधी काही लक्षणं जाणवल्यास वेळीच उपचार करुन घ्यावेत. अस्थमासारख्या जुनाट समस्येकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या-

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सांधेदुखी, दातदुखी अशी दुखणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी कॅल्शियमुयुक्त भाज्या आहारात ठेवा. मध्यमवयीन व त्याहून अधिकच्या वयोगटातील लोकांनी नियमित मेडिकल चेकअप करून आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

तूळ -

निरोगी स्वास्थ्य राहण्यासाठी तुम्हांला ग्रहांची साथ उत्तम राहील. मात्र व्हायरल इंफेक्शनपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आजारपणामुळे काही दिवस सक्तीचा आराम करणे भाग पडेल. त्यामुळे वेळीच उपचार सुरू करा. आरोग्य उत्तम असणार्‍यांनी फीटनेस राखण्यासाठी नियमित न चुकता व्यायाम करा.

Image may be NSFW.
Clik here to view.
GaneshaSpeaks-Logo11

वृश्चिक -

मंदावलेली पचनशक्ती या आठवड्यात त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियमित सकाळी हलका व्यायाम करा आणि पचनसंस्थेच्या समस्या दूर ठेवा. यासोबत शरीराचे स्वास्थ्य सुधारण्यासही व्यायाम मदत करेल. या  आठवड्यात आरोग्यविषयक समस्या त्रासदायक ठरणार नाही.

धनू - 

या आठवड्यात पित्ताचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.जंकफूड खाणे टाळा. साधं परंतू पोषणयुक्त आहाराचा समावेश करावा. पित्ताच्या त्रासावर वेळीच उपचार घ्यावेत म्हणजे गंभीरता वाढणार नाही. व्यसनांचा त्याग करा.

मकर -
व्हायरल इंफेक्शनमुळे आजारी पडण्याची शक्यता आहे. शरीराच्या खालच्या बाजूला अपघातामुळे इजा होण्याची शक्यता आहे. सांध्यांचे दुखणे असणार्‍यांनी शारिरीक अ‍ॅक्टीव्हिटीज करताना काळजी घेणे आवश्यक आहे. फीटनेस वाढवण्यासाठी नियमित हलका व्यायाम करा.

कुंभ- 

ऋतूमानातील बदल आरोग्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे काही दिवस सक्तीचा आराम करावा लागेल. त्यामुळे काही लक्षणं आढळल्यास त्यावर वेळीच उपचार सुरू करा. अ‍ॅरोबिक व्यायामामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

मीन-

व्हायरल  इंफेक्शनमुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता आहे. काही दिवस तुम्हांला घरीच आराम करावा लागेल. त्यामुळे लक्षणं आढळताच उपचार सुरू करा. योगा आणि ध्यानसाधनेने आरोग्य सुधारण्याकडे लक्ष द्या.


 

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>