पंचाहत्तरीतल्या शरद पवारांचा उत्साह आजही तरूणांना लाजवणारा आहे. मात्र अतिश्रमाने थकवा आल्याने रविवारी संध्याकाळी शरद पवार यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती उत्तम असल्याने बुधवारी ( 27 जानेवारी) त्यांना डिस्चार्ज देणार असल्याची माहिती रुबी हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांनी दिली आहे.
शरद पवारांना हॉस्पिटल्समध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत सोशल मिडीयामध्ये काही अफवांना ऊत आला होता. मंगळवारी पवारांच्या निधनाबाबत काही व्हॉटसअॅप मेसेज फिरत होते. मात्र शरद पवारांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती शरद पवारांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलद्वारा देण्यात आली आहे. ‘मी ठणठणीत असून हितचिंतकांना धन्यवाद ! ‘ असे ट्विट करण्यात आले आहे.
I am well and perfectly fine. Thank for your good wishes.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 26, 2016
( नक्की वाचा कसे ओळखाल व्हॉटाअॅपवरील खोटे मेसेज)
Pawar Saheb is fit and fine do not believe any rumours .
Posted by Jitendra Awhad on Tuesday, 26 January 2016
“अतिश्रमामुळे थकवा आल्याने शरद पवारांना शनिवारी संध्याकाळी रुटीन चेक-अपसाठी रुबी शनिवारी हॉल क्लिनीकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून, सारे रिपोर्ट नॉरमल असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. दरम्यान सुप्रिया सुळे आणि काही निकटवर्तीयांनी रुबी हॉस्पिटल्समध्ये जाऊन शरद पवारांची भेटही घेतली.त्यावेळी पवारांनी त्यांच्याशी केलेल्या खास बातचितीचा व्हिडीयो एनसीपी नेते जितेंद्र आव्हाड यांनी अपलोड केला आहे. सोबतच शरद पवारांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहनही त्यांनी लोकांना केले आहे.
शरद पवार त्यांना भेटायला आलेल्या व्यक्तींशी गप्पा मारत, पुस्तक वाचत आपला दिनक्रम चालू ठेवत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत फिरत असलेले मेसेज खोटे असून त्यावर विश्वास ठेऊ नका.
छायाचित्र सौजन्य – India.com