Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

काळामिरी आणि मध –हिवाळ्यात दूर ठेवेल कफाचा त्रास !

$
0
0

Read This in English

Translated By  -  Dipali Nevarekar

बदलत्या वातावरणाचा आणि थंड वातावरणामुळे सर्दी-पडशाचा त्रास होण्याचे प्रमाण वाढते. अनेकांना श्वसनाचा त्रास होतात. मग हिवाळ्याच्या दिवसात या समस्या गंभीर होण्याआधीच प्रतिबंधात्मक काळजी घेणे आवश्यक आहे. मसाल्याच्या डब्ब्यात आढळणारी काळामिरी आणि मध या घरगुती आणि सहज उपलब्ध होणार्‍या पदार्थांनी कफावर नियंत्रण मिळवता येते. ( नक्की वाचा : खोकल्याच्या प्रकारानुसार करा योग्य औषधाची निवड !)

  • मध आणि काळामिरी कसे ठरते फायदेशीर ?

सर्दी, खोकला, घशातील खवखव अशा थंडीत वाढणार्‍या समस्यांवर मध हा उत्तम घरगुती उपाय आहे. मधातील अ‍ॅन्टीबॅक्टेरियल घटक रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास आणि कफाचा त्रास कमी करण्यास मदत करते.

आहारात पदार्थाची चव आणि स्वाद वाढवण्यासाठी काळामिरी प्रामुख्याने वापरली जाते. मात्र त्यातील अ‍ॅन्टीबॅक्टेरियल घटक, फ्लॅवनॉईड्स,अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि व्हिटामिन सी घटक कफाचा त्रास कमी करतात. मधासोबत काळामिरी घेतल्यास कफ मोकळा होण्यास मदत होते. तसेच श्वसनमार्गातील अडथळा दूर होण्यास मदत होते. ( नक्की वाचा : शुद्ध आणि भेसळयुक्त मधातील फरक ओळखा अन वेळीच धोका टाळा ! )

  • कसा कराल हा उपाय ?

सर्दी-पडशाचा त्रास दूर करण्यासाठी मध आणि काळामिरी तुम्ही दोन प्रकारे आहारात घेऊ शकता.

#1 मिरपूड आणि मधाचे चाटण -

4-5 मिरीचे दाणे मंद आचेवर भाजावेत. ते थंड झाल्यानंतर त्याची पूड करावी. अर्धा चमचा मधामध्ये चिमूटभर मिरपूड मिसळावी. हे मिश्रण एकत्र करून खावे. हा उपाय नियमित सकाळी केल्यास कफ आणि घशातील खवखव दूर करण्यास फायदेशीर ठरते.

#2 काळामिरीचा काढा -

थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर साधा चहा पिण्याऐवजी काळामिरीचा काढा घ्यावा. यामुळे सर्दी-पडशाचा त्रास दूर राहतो. चहापावडर सोबत 2-3 मिरीचे दाणे चहाच्या पाण्यात टाकून उकळावेत. पाच मिनिटांनी हे मिश्रण गाळून त्यात एक टीस्पून मध मिसळावे. तसेच हा काढा गरम असताना पिणे अधिक फायदेशीर ठरतो. काळामिरीचा काढा वजन घटवण्यासही मदत करतो.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>