Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

सेक्स संबंधित हे ’5′प्रश्न विचारायला तुम्हांला लाज वाटते ?

$
0
0

ही माहिती 18 वर्षांवरील प्रेक्षकांनीच पहावी. पालकांच्यासोबत किंवा त्यांच्या सल्ल्याने पुढील दृष्यं पहावीत. 18 वर्षाखालील मुलांनी ही दृष्यं पाहणे टाळा .  * T&C and Privacy Policy also apply 

Read this in English

सेक्स या विषयाबाबत तरुणांच्या मनात कुतुहल आणि भीती दोन्ही असते. मात्र आजही या विषयाबाबत मोकळेपणाने बोलले जात नसल्याने अनेकांना अपुरी माहिती असते. अज्ञानापेक्षा अपुरी माहिती अधिक धोकादायक असल्याने चूका होण्याचे प्रमाण वाढते. म्हणूनच सेक्सबाबत मुलींना  विचाराला संकोच वाटतो अशा या ’5′ प्रश्नांची आम्ही तुम्हांला उत्तरं देत आहोत. (  नक्की वाचा : सेक्स करण्यापूर्वी मुलींनी योनीमार्गाजवळील केस काढावेत का ?)

 

#1  कंडोम योनीमार्गात अडकला तर ? 

हा प्रश्न तुमच्या मनात येणं स्वाभाविक आहे. पण असे होणे भीतीदायक ठरू शकते. सहसा कंडोम योनीमार्गात अडकण्याची शक्यता फारच विरळ असते. परंतू तसे झाल्यास घाबरून जाऊ नका. शांतपणे तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. योनीमार्गाजवळील जागा स्वच्छ धुवा. तसेच अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी इमरजन्सी कॉन्ट्रासेप्टीव्ह गोळ्या घ्या.  ‘ कंडोम’ वापरताना या ‘ 6 ‘ चुका करत नाही ना ?  याची काळजी जरूर घ्या.

#2.  squirting म्हनजे काय ?

Squirting म्हणजे सेक्स किंवा कामक्रिडे दरम्यान योनीमार्गातून पांढरा स्त्राव जाणे. हे अत्यंत सामान्य आणि तुमच्या  G-spot ला योग्य चालना मिळाल्याचे लक्षण आहे. काहीवेळेस हे युरीन लिकेज समजले जाते. पण मुत्रापेक्षा हा स्त्राव पांढरा आणि चिकट असतो. त्यामुळे असा स्त्राव होणे हे अगदी सामान्य आहे. पण ‘अंगावरून पांढरे जाणे’ कधी होते चिंतेची बाब ?  हे देखील जाणून घ्या.

#3. सेक्स दरम्यान मूत्रविसर्जन करावे का ? 

सेक्सदरम्यान मुत्रविसर्जन करण्याची इच्छा अनेकांना होते आणि अनेकजणी सेक्सनंतर मुत्रविसर्जन करतात. पण हे चांगले नाही.  सेक्सदरम्यान मुत्रविसर्जनाची इच्छा होणे म्हणजे तुम्ही ऑर्गझमच्या जवळ आहात.  त्यामुळे काही जणींना सेक्सदरम्यान ब्लॅडर फूल असल्यास थोडी युरीन लीक होऊ शकते. किंवा squirting होऊ शकते. त्यामुळे संकोचून जाऊ नका.

#4. सामान्य मुली लेस्बियन पॉर्न व्हिडीयो पाहून उत्तेजित होतात. हे ठीक आहे का ? 

हो ! हे अगदी सामान्य आहे. अशाप्रकारचे लेस्बियन पॉर्न पाहाण्याचा आणि सेक्श्युअल प्रेफरन्सचा एकमेकांशी काही थेट संबंध नाही. एका अभ्यासानुसार समोर आलेली गोष्ट म्हणजे पुरूषांपेक्षा स्त्रिया सेम सेक्स पोर्न पाहणे अधिक पसंत करतात. अशाप्रकारच्या पॉर्न व्हिडीयो केवळ हस्तमैथुनासंबंधित कुतुहल पूर्ण करतात.

#5. माझ्या बॉयफ्रेंडच्या पेनिजचा आकार थोडा कर्व्ह आहे. हे चितेंचे कारण ठरू शकते का ? 

तुमच्या साथीदाराला इंटरकोर्स किंवा इरेक्शन करताना काही त्रास होतो का ? हे विचारा. या प्रश्नाचे उत्तर नाही असल्यास चिंतेचे कारण नाही. काहींच्या शिश्नाचा आकार थोडा वाकडा असू शकतो.  परंतू इरेक्शनच्यावेळी सरळ होऊ शकतो. पुरुषांच्या शिश्नाबद्दल या ’5′ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>