Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

जावळ काढल्याने खरंच बाळाचे केस सुधारतात का ?

$
0
0

लहान मुलांचे पहिले केस काढणे म्हणजेच जावळ काढणे या प्रकाराला भारतात सांस्कृतिक महत्त्व आहे. अनेक पालकांना यामुळे मुलांच्या केसांची वाढ सुधारते, पोत सुधारतो असे वाटते. पण यामध्ये खरचं तथ्य आहे का ?

  • जावळ काढणे खरचं फायदेशीर आहे का ?  

वास्तवात हे खरे नाही. शेविंग केल्याने केसांच्या वाढीला गती मिळत नाही. तसेच केसांचा पोत हा अनुवंशिक असतो. उत्तम आहाराने मुलांचे केस अधिक आरोग्यदायी होऊ शकतात. आहारात पोषणयुक्त घटकांचा समावेश नसल्यास मसाज, तेल, क्रिम्स, शाम्पू  केसांचे आरोग्य सुधारण्यास फारसे फायदेशीर ठरू शकणार नाही. काही लहान मुलांमध्ये चार महिन्यांतच केसगळतीची समस्या सुरू होते. पण हे लहान मुलांमध्ये अगदीच सामान्य आहे. काही महिन्यातच त्यांचे केस पुन्हा येतात.

  • मुलांचे जावळ काढावे का  ?

अनेक पालक धार्मिक / सांस्कृतिक कारणांसाठी मुलांचे केस काढतात. जर तुम्हांला बाळाचे केस आरोग्यदायी व्हावेत असे वाटत असेल तर शेविंग / जावळ काढणे हा त्यावरील उपाय होऊ  शकत नाही. पण त्यामुळे काही नुकसानदेखील होणार नाही.उलट काही स्क्रिन कंडीशनपासून सुटका मिळू शकते.

मात्र जर जावळ  काढताना खालील गोष्टींची काळजी आवर्जून घ्यावी.  

  • बाळाचे डोके थोडे मजबूत झाल्यानंतरच जावळ काढण्याचा निर्णय घ्या. नवजात बालकाचे डोके अत्यंत नाजूक असते. त्यामुळे धारदार रेझरचा बाळाला त्रास होऊ शकतो. तुम्हांला अगदीच वर्षभराच्या बाळाचे जावळ काढायचे नसल्यास किमान 2-3 वर्ष  थांबा.
  • जावळ काढण्याचा कार्यक्रम मिड मॉर्निंगच्या वेळेत ठेवा. ज्या वेळी बाळ फारशी रडारड करत नाही.
  • रेझरचा वापर टाळा. त्याऐवजी ट्रिमर वापरा. तसेच रेझर वापरायची वेळ आलीच तर बेबी शाम्पू वापरा. तसेच एकावेळी पूर्णपणे एकाच बाजूचे जावळ पूर्ण काढा.
  • जावळ काढताना बाळाचे लक्ष एखाद्या खेळण्यामध्ये गुंतवा. तसेच बाळाचे डोके नीट आणि घट्ट पकडा. सतत हालचालीमुळे एखादी जखम होण्याची शक्यता असते.
  • शेविंग केल्यानंतर बाळाच्या डोक्याला आंघोळ घाला. तसेच सौम्य मॉईश्चरायझर लावा. टाळूवर तेलाचा हलका मसाज करा म्हणजे खाज येण्यापासून बचाव होईल.

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source –  Is shaving a baby’s head (mundan) good or bad?

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>