इन्सुलिन हे आपल्या शरीरात स्वादुपिंडामार्फेत तयार करण्यात येणारे एक हॉर्मोन आहे.थोडक्यात इन्सुलिन ही अवयवांना लागणा-या आवश्यक शक्तीसाठी ग्लुकोजचा पुरवठा करणारी एक किल्ली आहे.मधूमेहींमध्ये टाईप १ मधूमेहामुळे शरीरातील इन्सुलिनची निर्मिती थोड्या प्रमाणात होते तर टाईप २ मधूमेहामध्ये जास्त प्रमाणात कमी होते अथवा ते अधिक पुरेसे क्रियाशील नसते.तसेच यासाठी जाणून घ्या मधूमेहींसाठी ब्लडशूगर नियंत्रित ठेवणारे खास व्यायाम प्रकार !
बेंगलोरच्या फोर्टीस हॉस्पिटलचे Consultant Endocrinologist डॉ.मंजूनाथ मालीगे यांच्याकडून जाणून घेऊयात मधूमेहाच्या निरनिराळ्या टप्प्यांवर घेण्यात येणा-या इन्सुलिनच्या वापराबाबतचा खास सल्ला
आपल्या शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी इन्सुलिन कसे मदत करते.
आपण जे अन्न खातो त्यातून रक्तातील साखरेची पातळी वाढते व स्वादुपिंडातून इन्सुलिनची निर्मिती होते.इन्सुलिनमुळे शरीरातील अवयवांना साखरेचा पुरवठा होतो व त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते.जेव्हा ही साखरेची पातळी कमी अथवा सामान्य असते तेव्हा शरीर इन्सुलिनची निर्मिती थांबविते त्यामुळे ग्लुकोजची पातळी कमी होत नाही.जर शरीराने पुरेशा इन्सुलिनची निर्मिती केली नाही तर इन्सुलिन इंजेक्शन द्वारे घ्यावे लागते.तसेच वाचा मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय
इन्सुलिनचे बाजारात उपलब्ध असलेले प्रमुख प्रकार-
१.रॅपीड अथवा शॉर्ट-अॅक्टींग इन्सुलिन-हे इन्शूलीन इंजेक्ट करताच काही मिनीटांमध्ये ते त्यांचे कार्य करु लागते व रक्तातील साखरेची पातळी वेगाने कमी होऊ लागते.हे इन्सुलिन शरीरात चार तास कार्यरत असते.शक्यतो जेवणाआधी हे इन्सुलिन घेण्यात येते.
२.इंटरमिडीएट-अॅक्टींग इन्सुलिन-हे इन्सुलिन इंजेक्ट केल्यावर १ ते २ तासांनी हळूहळू त्याचा परिणाम दिसून येतो.यामुळे त्यानंतर पुढील १२ तास रक्तातील साखरेची पातळी कमी रहाते.हे इन्सुलिन नास्ता अथवा जेवणापूर्वी असे दिवसभरात एकदा अथवा दोनदा घ्यावे लागते.
३.लॉन्ग अॅक्टींग इन्सुलिन-हे इन्सुलिन घेतल्यावर त्याचा २ ते ३ तासांनी परिणाम जाणवतो.या इन्सुलिन मुळे २४ ते ३६ तास रक्तातील साखर नियंत्रणात राहते.तसेच हे इन्सुलिन दिवसभरात एकदाच सकाळी अथवा संध्याकाळी घ्यावे लागते.
इन्सुलिनची वैशिष्ठ्य-
इन्सुलिन हे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्माण होणारे हॉर्मोन आहे.मधूमेही रुग्णांना इन्सुलिन स्वरुपात देण्यात येणा-या इंजेक्शनमधून देखील हे कार्य केले जाते.या इन्सुलिनचा प्रकार व डोस हे किती प्रमाणात असावा हे रक्तातील साखर किती नियंत्रित करायची आहे यावर अवलंबून असू शकते.अती इन्सुलिन मुळे जर रक्तातील साखरेची पातळी खूप कमी झाली तर ती वाढवण्यासाठी त्वरीत औषध-उपचार करावे लागतात.अयोग्य व अपूरे इन्सुलिन घेतल्यास मधूमेहाच्या समस्या अधिक वाढू शकतात.कधीकधी काही रुग्णांचे वजन यामुळे वाढू लागते त्यामुळे प्रत्येक इन्सुलिन प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीला मानवेलच असे नाही.यासाठी वाचा तुम्ही मधुमेहाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय का ?
इन्सुलिन थेरपी घेण्यापूर्वी या गोष्टी जरुर समजून घ्या-
इन्सुलिन इंजेक्शन नेहमी मधूमेहावरील तज्ञ डॉक्टरांच्या सल्लाने व देखरेखी खालीच घ्या.कारण अयोग्य प्रकारचे व अयोग्य प्रमाणात घतलेल्या इन्सुलिन मुळे तुमच्या समस्या अधिकच वाढू शकतात.टाईप १ मधूमेहावर निदान झाल्यावर लगेच इन्सुलिन घेणे सुरु करावे.तर टाईप २ मधूमेहावर निदान झाल्यावर रक्तातील साखरेची पातळी खाली आण्यासाठी घेण्यात येणा-या गोळ्यांचा परिणाम कमी झाल्यास काही वर्षांनी इन्सुलिन सुरु करावे लागते.इन्सुलिन हे जेवणापूर्वी घेताना योग्य पद्धतीने इंजेक्ट करावे लागते.तसेच त्वचेखाली गुठळ्या होऊ नये यासाठी इंजेक्शन टोचण्याच्या जागा सतत बदलत राहणे आवश्यक असते.यासाठी जाणून घ्या हळदीने ठेवा मधूमेह काबुत !
इन्सुलिन ठेवण्याची योग्य पद्धत-
इन्सुलिन हे नेहमी दरवाजा असलेल्या रेफ्रीजरेटर मध्ये ठेवावे.इन्सुलिन कधीही फ्रीजर मध्ये ठेऊ नये.रेफ्रीजरेटर मधून एकदा बाहेर काढल्यावर तुम्ही ते खोलीतील सामान्य तापमानात ठेऊ शकता.मात्र सुर्यप्रकाशापासून ते दूर ठेवावे.विमान प्रवास करताना इन्सुलिन हॅन्ड बॅगमध्ये ठेवावे.उच्च तापमानातील ठिकाणी प्रवास करताना इन्सुलिन कूल पॅकमध्ये घेऊन जावे.
इन्सुलिन घेण्याची योग्य वेळ-
इन्सुलिन नेहमी जेवणापूर्वी घ्यावे.रॅपीड-अॅक्टींग इन्सुलिन जेवणाआधी काही मिनीटे घेण्यात येते.तर शॉर्ट-अॅक्टींग इन्सुलिन जेवणाआधी २० ते ३० मिनीटे आधी घेण्यात येते.इंटरमिडीएट आणि लॉग-अॅक्टींग इन्सुलिन दिवसभरात ठराविक वेळी जवणापूर्वी घेण्यात येते.प्रत्येक रुग्णांच्या ग्लूकोजच्या पातळी नुसार इन्सुलिन घेण्याची पद्धत निराळी असू शकते.तसेच मधूमेहींच्या आहाराबाबतचे दूर करा हे ’6′ गैरसमज !
मधूमेहावर इन्सुलिन घेणे आवश्यक आहे का? कोणत्या प्रकारच्या मधूमेहावर इन्सुलिन घ्यावे लागते?
मधूमेह असल्यास प्रत्येकाला इन्सुलिन घ्यावेच लागते असे नाही.टाईप १ मधूमेहावर ब-याचदा इन्सुलिन घ्यावे लागते.टाईप २ मधूमेहींना इन्सुलिन घेण्याची आवश्यकता नसते कारण पहिली काही वर्षे गोळ्या घेऊन त्यांना मधूमेह नियंत्रणात ठेवता येतो.गरोदर महिलेला मधूमेह असल्यास तिला इन्सुलिन घ्यावे लागते.काही औषध-उपचारांमध्ये अथवा शस्त्रक्रीयेमध्ये अथवा ताण-तणावात काही काळासाठी मधूमेही रुग्णांना इन्सुलिन घ्यावे लागू शकते.मधूमेही रुग्णांची किडनी निकामी झाल्यास त्या रुग्णाला इन्सुलिनची गरज असू शकते.जाणून घ्या उपवासादरम्यान मधूमेहींच्या ब्लड शुगरमध्ये होणारा चढउतार कसा आटोक्यात ठेवाल ?
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock