भारतीय आहारात कार्ब्स अधिक प्रमाणात असतात, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण गव्हाचे पीठ सर्रास वापरले जाते. पराठा, चपाती गव्हाच्या पिठाची बनवली जाते. तर साऊथ मध्ये बनणारा vella dosai हा पदार्थ देखील गव्हाच्या पीठापासूनच बनवला जातो. गव्हाचे पीठ हा भारतीय खाद्यसंस्कृतीतील महत्त्वाचा भाग आहे. तसंच ते पौष्टिक मानले जाते. चहा चपाती हा नाश्त्याचा खरंच हेल्दी पर्याय आहे का ?
लहानपणापासूनच आपण अनुभवलं असेल की, गव्हाच्या चपातीला/पोळीला आपल्या आहारात किती महत्त्व आहे ते. म्हणजे लहानपणी आई डब्याला पोळी-भाजी द्यायची. भूक लागल्यावर तूप-साखर-पोळी किंवा गूळ-पोळी खाल्यावर भर द्यायची. बिस्कीट किंवा इतर पदार्थ खाण्यापेक्षा गव्हाच्या पिठाचे लाडू करून द्यायची. परंतु, मैद्याचे पदार्थ देणे टाळायची. कारण मैदा अनहेल्दी मानला जातो. अजूनही अनेकांकडे पोळी-भाजी किंवा चहा चपातीचा नाश्ता केला जातो. इतके गव्हाच्या पिठाचे आपल्या आहारात महत्त्व आहे. पण, गव्हाचे पीठ का पौष्टिक मानले जाते, तुम्हाला माहित आहे का ? या प्रश्नाचे उत्तर मुंबईचे न्यूट्रीशियनिस्ट Ifsha Qureshi यांनी दिले. तुम्हाला ठाऊक आहे, एका चपातीत किंवा भाकरीत किती कॅलेरिज असतात ?
गहू दळल्यानंतर त्यापासून पीठ मिळते. त्यात असलेल्या कोंड्यामुळे त्याची पौष्टिकता वाढते. जाणून घेऊया गव्हातील कोंडा शरीरासाठी कसा फायदेशीर असतो -
कोंडयाममध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आणि मिनरल्स असतात. अन्नपचनासाठी फायबरची मदत होते. त्याचबरोबर कार्डिओव्हॅस्कुलर आजारांचा धोका कमी होतो, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. वजन कमी करण्यास मदत होते आणि कोलन कॅन्सरचा धोका कमी होतो. तसंच पोट भरलेले राहते. त्यात असलेल्या मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम हे हाडांसाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. व्यस्त जीवनशैलीतही कसे जपाल हृद्याचे आरोग्य
तसंच गव्हाच्या कोंड्यात व्हिटॅमिन ई आणि बी कॉम्प्लेक्स असते. ही पोषकतत्त्वे अन्नपचनास, त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास महत्त्वपूर्ण असतात. मसल आणि नर्व्हसच्या कार्या सुधारण्यासाठी आवश्यक असतात.
मेटल ग्राइंडर किंवा चक्कीमध्ये गहू दळले गेल्यामुळे त्यावरील आवरण निघून जाते आणि फक्त गहू दळले जातात. पण पूर्वी दगडाच्या जात्यावर दळण दळले जात होते. त्यामुळे गव्हाचा संपूर्ण भाग दळला जात होता. कोंडा वेगळा काढला जात नव्हता. त्यामुळे त्यातील पूर्ण पौष्टीकता मिळत होती.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock