Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

अॅवोकॅडो योग्य प्रतीचे,पिकलेले आहेत हे कसे ओळखाल? व त्यांना कसे साठवून ठेवाल?

$
0
0

अॅवोकॅडो हे एक सूपरफूड म्हणून ओळखण्यात येते आजकाल बाजारामध्ये अथवा एखाद्या सूपरमार्केटमध्ये ते सहज उपलब्ध होते.या फळामध्ये ह्रदयाचे आरोग्य जपणारे मोनोसॅच्युरेटेड फॅट तसेच फायबर,फोलेट व व्हिटॅमिन बी ५ भरपूर प्रमाणात असतात.मात्र असे असले तरी अॅवोकॅडो मध्ये इतर फॅट देखील मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे दिवसभरात अर्ध्या फळापेक्षा जास्त प्रमाणामध्ये अॅवोकॅडोचे सेवन करु नये.पण अॅवोकॅडो खाण्यासाठी आधी ते योग्य प्रतीचे ओळखून कसे खरेदी करावे हे जाणून घेणे फार महत्वाचे असते.तसेच जाणून घ्या टवटवीत त्वचा मिळवण्यासाठी ही १० फळे आणि भाज्या खा !

यासाठी न्यूट्रीशनिस्ट प्रिया काथपाल यांच्याकडून जाणून घेऊयात बाजारातून योग्य प्रतीचे अॅवोकॅडो कसे खरेदी करावे व ते योग्य पद्धतीने कसे साठवून ठेवावे.

  • सूपरमार्केटमधून अॅवोकॅडो विकत घेताना त्याचे बाह्य आवरण खराब न झालेले व आकाराने जड असलेले अॅवोकॅडोच खरेदी करा.
  • अॅवोकॅडो विकत घेताना ते पिकलेले आहे का हे तपासणे फार महत्वाचे आहे.यासाठी त्याचे बाह्य आवरण हलक्या हाताने दाबून पहा.मात्र असे करताना लक्षात ठेवा की तुमच्या हातामुळे ते फळ खराब होणार नाही.कारण दाबल्यामुळे फळ तुटू शकते.
  • कधीकधी मऊ झालेले अॅवोकॅडो तुटू देखील शकते.त्यामुळे या फळाची परिपक्वता तपासण्यासाठी तुम्ही आणखी एक पद्धत वापरु शकता.यासाठी तुम्ही त्याचे बाह्य तपकिरी आवरण वरच्या बाजूने जरासे सोलून पाहू शकता.जर ते आवरण सहजपणे निघाले व त्याच्या आतील गर हिरव्या रंगाचा असेल तर ते फळ पिकलेले आहे असे समजा.तसेच जर ते बाह्य आवरण सहज निघत नसेल व त्याच्या आतील गर देखील तपकिरी रंगाचाच असेल तर ते फळ पिकलेले नाही असे समजा.तसेच जाणून घ्या फक्त फलाहार घेणे आरोग्यदायी आहे का ?

अॅवोकॅडो कसे साठवून ठेवाल?

  • अनेकजण अॅवोकॅडो पिकून तयार होईपर्यंत ते बाहेर टेबलवर ठेवतात.ते लवकर पिकण्यासाठी त्यांच्यासोबत तुम्ही सफरचंद,केळी व पिअर्ससारखी इतर फळे देखील ठेऊ शकता.
  • जर तुम्ही अति पिकलेले अॅवोकॅडो खरेदी केले तर ते तसेच ताजे रहावे यासाठी ते पिकलेले फळ तुम्ही पाच दिवसांपर्यंत फ्रीजमध्ये साठवून ठेऊ शकता.तसेच वाचा फ्रोझन फ्रुट्सचा पर्याय निवडणं खरंच आरोग्यदायी आहे का ?
  • कापलेल्या अॅवोकॅडोच्या फोडींवर तुम्ही थोडेसे लिंबू पिळून व प्लॅस्टिक रॅपमध्ये घट्ट बांधून तुम्ही फ्रीजमध्ये साठवून ठेऊ शकता व गरजेनूसार त्याचा वापर करु शकता.

तसेच वाचा हायपरटेंशनचा त्रास आटोक्यात ठेवायला मदत करतील ही १० फळं आणि भाज्या

 Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>