Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

दालचिनी- मासिकपाळीतील क्रॅम्प व अति रक्तस्त्रावावर गुणकारी

$
0
0

मासिकपाळीतील तीव्र क्रॅम्प मुळे महिलांना दैनंदिन व्यवहार करणे देखील कठीण होते.अनेक महिला या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी पेनकिलर घेतात मात्र मासिकपाळीतील या समस्यांवर काही घरगुती औषधे व उपाय गुणकारी ठरतात.दालचिनी या घरगुती उपायामुळे देखील मासिकपाळीतील क्रॅम्प कमी होतात व मासिक पाळीतील अति रक्तस्त्रावाची समस्या देखील कमी होते.तसेच जाणून घ्या मासिकपाळीत 5 दिवसांपेक्षा अधिक रक्तस्त्राव होण्याची ७ कारणे !

२०१५ साली Iranian Red Crescent Medical Journal मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानूसार दालचिनीमुळे वेदनादायक क्रॅम्प,Dysmenorrhea,थकवा,मळमळ व अति रक्तस्त्राव या समस्या कमी होऊ शकतात.

Dysmenorrhea चा महिलांवर काय परिणाम होतो?

Dysmenorrhea ही समस्या प्रामुख्याने १८ ते ३० वयोगटातील महिलांमध्ये आढळते.अमेरिकेतील एका रिपोर्टनूसार यामुळे ६०० मिलीयन कामकाजाचे तास व दोन अब्ज डॉलर्सचे आर्थिक नुकसान होते.भारतामध्ये अशा सामाजिक-आर्थिक नुकसानाचा कोणताही डेटा उपलब्ध नाही.मात्र अनुभवानूसार या वेदनांमुळे भारतातील स्त्रीया घरात बसून आराम करतात अथवा काम किंवा शाळेमधून सुट्टी घेतात.या वेदनांपासून मुक्तता मिळवण्याचा एक घरगुती उपाय म्हणजे यासाठी दालचिनीचा वापर करणे.जवळजवळ सर्वच भारतीय घरातील स्वयंपाक घरामध्ये दालचिनी उपलब्ध असते.जाणून घ्या मासिकपाळीच्या वेदना हमखास दूर करणारे ’10′ नैसर्गिक उपाय !

दालचिनीचा या समस्येवर कसा उपयोग होतो?

यासाठी घेण्यात आलेल्या एका अभ्यासामधील परिक्षणामध्ये ७६ महिलांना ३८-३८ अशा दोन गटांमध्ये विभाजित करण्यात आले.तसेच त्यामधील एका ग्रुपमधील महिलांना दिवसभरात तीन वेळा स्टार्चयुक्त Placebo Capsule देण्यात आल्या व दुस-या ग्रुपमधील महिलांना त्याऐवजी ४२० मिग्रॅ दालचिनी युक्त कॅप्सुल्स देण्यात आल्या.या महिलांच्या मासिक पाळीतील त्रासाचे मोजमाप करण्यासाठी Visual Analogue Scale (VAS)चा वापर करण्यात आला.या प्रयोगाच्या ७२ तासानंतर असे दिसून आले की दालचिनीचा प्रयोग केलेल्या महिलांना मासिक पाळीच्या वेदना,उलटी व मळमळ हा त्रास कमी झाला.तसेच वाचा मासिकपाळीचा त्रास कमी करण्यासाठी पेनकिलर्स घेणं कितपत सुरक्षित ?

Dysmenorrhea ही समस्या गर्भाशयातील Prostaglandin च्या प्रसरणाच्या वाढीमुळे निर्माण होते.ज्यामुळे गर्भाशयाच्या खालील भागातील स्नायूंच्या आकुंचनामुळे Colicky, Spasmodic संक्रमित होते व त्यामुळे प्रसूतीवेदनांप्रमाणे वेदना निर्माण होतात.दालचिनीमध्ये अॅन्टी-इनफ्लैमटरी गुणधर्म असतात.दालचिनीमधील महत्वाचा घटक Cinnamaldehyde असून त्यामध्ये Antispasmodic गुणधर्म असतात.तसेच दालचिनीमधील Eugenol या घटकामुळे Prostaglandin चा प्रभाव कमी होतो व सूजेपासून मुक्ती मिळते.थोडक्यात या अभ्यासानूसार दालचिनीचा उपयोग मासिकपाळीमध्ये वेदना कमी करण्यासाठी करता येऊ शकतो.तसेच वाचा मासिक पाळीचा त्रास दुर करण्यासाठी ‘आलं’ फायदेशीर

यासाठी जाणून घ्या दालचिनीचा उपयोग कसा कराल?

मासिकपाळीतील वेदना कमी करण्यासाठी तुम्ही या पद्धतीने दालचिनी वापरु शकता.

  • मासिकपाळीत आराम मिळावा यासाठी तुम्ही दालचिनीचा चहा घेऊ शकता.
  • कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा दालचिनी मिसळा व ते पाणी प्या.स्वादानूसार तुम्ही त्यामध्ये लिंबू व मध देखील टाकू शकता.
  • स्वयंपाक करताना डाळ अथवा करी मध्ये दालचिनीची पावडर टाका

तसेच वाचा मासिकपाळी दरम्यान पाळा या १० स्वच्छता टीप्स.

संदर्भ-

Jaafarpour, M., Hatefi, M., Najafi, F., Khajavikhan, J., & Khani, A. (2015). The effect of cinnamon on menstrual bleeding and systemic symptoms with primary dysmenorrhea. Iranian Red Crescent Medical Journal, 17(4).

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles