Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

स्तनपान देणारी आई वाईन पिऊ शकते का ?

$
0
0

गरोदरपणात आणि त्यानंतरच्या काळात म्हणजेच स्तनपान देणार्‍या स्त्रियांनीदेखील अल्कोहलचे सेवन करणं त्रासदायकच आहे. पण क्वचित वाईन पिणं गरोदरपणाच्या काळात सुरक्षित आहे. पण स्तनपान देताना थोडी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. शरीरात अल्कोहल जाऊन त्याचा बाळावर होणारा परिणाम आणि थेट स्तनपानाच्या वेळेस दूधातून बाळाच्या शरीरात जाणारे अल्कोहलचे घटक आणि त्याचा परिणाम हा वेगवेगळा असतो.स्तनपान देणा-या मातेला हे ९ सल्ले अजिबात देऊ नका !

स्तनपान देणारी आई वाईन पिऊ शकते का ?

तुम्ही आई होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणि जर तुम्हांला ड्रिंक करायची सवय असेल तर तात्काळ ही सवय सोडणं गरजेचे आहे. मात्र क्वचित, काही विशिष्ट पार्टींमध्ये प्रमाणात पिण्याची सवय असेल तर वाईनचा आस्वाद घेऊ शकता. पण त्यासाठीही काही काळजी घेणं आवश्यक आहे. स्तनपानाच्या काळात बाळाला दूध पाजल्यानंतर वाईन घेऊ शकता पण पुढील वेळेस दूध देताना त्यामध्ये 2-3 तासांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे.मात्र स्तनपान करणार्‍या स्त्रियांनी नियमित वाईन पिणं त्रासदायक ठरू शकते असा सल्ला  Lactation specialist at Diwakar Speciality Hospital, Bangalore and Member of Medela LC club च्या Dr Payel Biswas Soo यांनी दिला आहे.

सतत वाईन पिण्याची सवय स्तनपान करणार्‍या स्त्रिला कशी ठरते त्रासदायक ?

काही अभ्यासानुसार, अल्कोहलचे सेवन बाळाच्या आरोग्यावर अनेकप्रकारे परिणाम करू शकतो.

  •  बाळ दूध कमी घेते - जेव्हा आई अल्कोहलचे सेवन करते तेव्हा त्याचा रक्तामध्ये आणि स्तनपानाच्या दूधामध्येही समावेश होतो. अल्कोहलचे सेवन ही तुमची नियमित सवय असेल तर ते तुम्ही प्रमाणात किंवा अत्यल्प घेतले तरीही शरीरात दूधाची निर्मिती होण्याचे प्रमाण मंदावते. परिणामी बाळाला गरजेपेक्षा कमी प्रमाणात दूध मिळते.
  •  झोपेचं चक्र बिघडते - स्तनपानाच्या दूधामध्ये थोड्या प्रमाणातही अल्होहल आल्यास त्याचा परिणाम बाळाच्या झोपेवर होतो. ज्या स्त्रियांना अल्कोहोलिक पेय पिण्याची सवय असते त्यांच्या मुलांची पुरेशी झोप होत नाही.
  •  विकासावर परिणाम होतो - नियमित अल्कोहल घेण्याची सवय स्तनपानाच्या काळात अधिक त्रासदायक ठरतो. यामुळे शारिरीक, बौद्धिक विकास कमी होतो.
  •  वास घेण्याची क्षमता मंदावते - पाच ज्ञानेद्रियांपैकी एक म्हणजे नाक. बाळाच्या विकासामध्ये नाकाचे कार्य मंदावते.

 तुम्ही कोणती काळजी घेणं आवश्यक आहे ?

बाळाच्या स्वास्थ्यावर परिणाम होऊ नये म्हणून काही टीप्स

  •  अल्कोहलयुक्त पेयाचा तुमच्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, ड्रिंक घेतल्यावर दोन तासापेक्षा कमी वेळात तुमच्या बाळाला दूध द्यावे लागणार असेल तर  ब्रेस्ट मिल्क पंपच्या सहय्याने काढून साठवून ठेवा.  नवमातांचे दूध वाढवतील आयुर्वेदाने सुचवलेले हे ’5′ घरगुती उपाय
  • अल्कोहल युक्त पेय घेतल्यानंतर तीन तासांनी बाळाला स्तनपान द्यावे.
  • अल्कोहलयुक्त ड्रिंक्स घेतल्यानंतर भरपूर पाणी प्या. म्हाणजे शरीरातून टॉक्झीन / घातक घटक बाहेर पडतील.
  • रक्तामध्ये अल्कोहल कमी प्रमाणात जाण्यासाठी पिण्यासोबतच हेल्दी स्नॅक्सचादेखील समावेश करा. ग्लासभरापेक्षा अधिक वाईन किंवा इतर कोणतेही अल्कोहोलिक ड्रिंक्स घेऊ नका. वाईन प्रमाणेच हेल्दी असले तरीही हे ’7′ फक्त याच प्रमाणात खावेत

Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Reference:

Guelinckx, I., Devlieger, R., & Vansant, G. (2011). Alcohol during pregnancy and lactation: recommendations versus real intake. Archives of Public Health, 68(4), 134.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>