Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यामध्ये फरक काय ?

$
0
0

अनेकदा टीव्हीवर कुकरी शो पाहताना आपल्याला एखादा पदार्थ आवडतो, पाहताना तो सोप्पा देखील वाटतो. मग न लिहून ठेवताच तो आठवेल तसा केला जातो. पण यामुळे आपण अंदाजे काही साहित्य घटक वापरतो. हमखास गफलत होणारा एक पदार्थ म्हणजे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर. तुम्हांला ठाऊक आहे का ? हे दोन वेगवेगळे घटक आहेत. यामध्ये नेमका फरक काय आणि आरोग्यदायी पर्याय कोणता हे जाणून घेण्यासाठी आहारतज्ञ डॉ. स्वाती दवे यांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.

  •  बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरमध्ये नेमका फरक काय ?

बेकिंग करताना अनेकजण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा सर्रास वापरतात. पण हे दोन्ही केमिकली वेगवेगळे आहेत. बेकिंग सोडा हा अल्काईन स्वरूपाचा असून तो अ‍ॅसिडीक पदार्थांसोबत रिअ‍ॅक्ट करतो. म्हणजेच व्हिनेगर, ताक, लिंबाचा रस, दही यासारखे पदार्थ तुम्ही वापरत असाल तर बेकिंग सोडा त्याला रिअ‍ॅक्ट करून त्यामधून कार्बनडाय ऑक्साईड बाहेर पडतो. यामुळे पीठ किंवा बेकिंगचा गोळा फुगतो. तर बेकिंग पावडरमध्ये बेकिंग सोडा आणि त्यासोबत काही अ‍ॅसिडीक घटक असतात. यामुळे तो पदार्थ वेगळा  आणि सुका होण्यास मदत होते. सद्ध्या उपलब्ध असलेली बेकिंग पावडर ही दुप्पटीने काम करते.पहिल्यांदा जेव्हा तुम्ही त्यामध्ये पाणी मिसळता आणि दुसार्‍यांदा जेव्हा तो पदार्थ गॅसवर ठेवला जातो. बेकिंग सोड्याचा आहारातील वापर कितपत सुरक्षित आहे ?

  •  बेकिंग सोड्याऐवजी बेकिंग पावडर वापरणं योग्य आहे का ?

बेकिंग सोड्याऐवजी तुम्ही बेकिंग पावडर सहाजिकच वापरू शकता. फक्त त्याचे प्रमाण कमी जास्त असते. जर बेकिंग सोड्याऐवजी तुम्ही बेकिंग पावडर वापरत असाल तर तुम्हांला त्याचा वापर बेकिंग पावडरच्या तिप्पट करावा लागतो. तसेच जर एखाद्या पदार्थामध्ये एक टीस्पून बेकिंग सोडा  वापरणं गरजेचे असेल पण तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल आणि तुम्ही बेकिंग पावडर वापरत असाल तर ते तिप्पट वापरा. बेकिंग पावडरऐवजी बेकिंग सोडा वापरत असाल तर त्याचा वापर कमी करा आणि त्यामध्ये अ‍ॅसिडीक घटक वापरून पदार्थ फुगवा. त्यामुळे 1 टेबलस्पून बेकिंग पावडर तुम्ही बेकिंग सोड्यासोबत रिप्लेस करत असाल तर त्याचा वापर केवळ एक टीस्पून करा. सोबत दोन टीस्पून लिंबाचा रस मिसळा. किंवा गरजेनुसार इतर अ‍ॅसिडीक पदार्थ मिसळा.बेकिंग सोड्याने हटवा चेहर्‍यावरील ‘व्हाईटहेड्स’ची समस्या !

  •  बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर यांचा आहारात समावेश करावा का?

डॉ. स्वाती दवे यांच्या सल्ल्यानुसार, बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरचा वापर करण्याऐवजी काही नैसर्गिक पर्यायांचा वापर करा. इडली, ढोकळा किंवा केक बनवताना पीठांत त्याचा अवश्य समावेश केला जातो. बेकिंग सोडा किंवा बेकींग पावडरने पीठ आंबवण्यापेक्षा ते नैसर्गिकरित्या आंबवण्याचा प्रयत्न करा. इडली बनवताना उडीद  डाळ आणि  तांदूळ रात्रभर भिजत ठेवा. त्याचे मिश्रण बारीक वाटून काही तास आंबवत ठेवा. पदार्थ भारतीय आणि प्राचीन पद्धतीनेच शिजवा आणि बनवा. केक आणि चॉकलेट्ससारखे गोडाचे पदार्थ बनवताना त्यामध्ये बटर किंवा क्रीम मिसळा. यामुळे हे पदार्थ हलके होण्यास मदत होते. तुम्ही बाहेर असे कोणते पदार्थ खात असल्यास नेहमीपेक्षा   थोडे कमीच घ्या. म्हणजे त्रास होणार नाही. आंबवलेले पण आरोग्याला पोषक पदार्थांचे ’5′ पर्याय

Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>