Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

तिशीत ‘आई’होताना त्रास कमी करायचाय ? मग 20शीतच या ’4′गोष्टींकडे लक्ष द्या !

$
0
0

आजकाल अनेक स्त्रियांना फर्टिलिटीची समस्या उद्भवते. अनेक तरुण मुलींना PCOS, फायब्रॉईड, ओवारीयन सिस्ट आणि इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होतात. म्हणून वयाच्या २० शीत जर तुम्ही हार्मोन्सचे संतुलन नीट राखले तर फर्टिलिटी वाढण्यासाठी मदत होईल. यासाठी काही सोप्या गोष्टी आहेत. पण त्या करणे गरजेचे आहे, असे स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अनिशा सिंग यांनी सांगितले.

१. हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी योग्य आहार घ्या: फर्टिलिटी वाढवणाऱ्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा. मोनोसॅच्युरेटेड फॅट्स अधिक प्रमाणात असलेले पदार्थ म्हणजे ताजी हंगामी फळे आणि भाज्या, सूर्यफुलाच्या बिया आणि ऍव्होकॅडो हे पदार्थ खा. मासिक पाळी आणि ओव्हुलेशनची क्रीया सुरळीत होण्यासाठी तुम्हाला योग्य ती पोषकतत्त्वे घेणे शरीरासाठी गरजेचे आहे. ओव्हुलेशनच्या टप्प्यात पालेभाज्यांचा ज्यूस, मासिक पाळीच्या पूर्वी रताळे आणि मासिक पाळीच्या काळात ऍव्होकॅडो भरपूर प्रमाणात खा. स्त्रियांमध्ये या ’5′ समस्या कमी करतात त्यांची आई होण्याची शक्यता !

२. ताण हाताळायला शिका: ताण हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे आणि ताण सगळ्यांचा येतो. परंतु, ताण नियंत्रित ठेवला नाही तर त्याचा तुमच्या जीवनावर परिणाम होईल. तसंच तुमच्या आरोग्यावर देखील त्याचे दुष्परिणाम दिसू लागतील. म्हणून ताणावर मात करायला शिका त्यामुळे तुमच्या शरीरावर परिणाम होणार नाही आणि गर्भधारणेच्या वेळेस येणारे अडथळे टाळता येतील. योगसाधना आणि ध्यानधारणेमुळे ताणावर मात करण्यास मदत होईल. तसंच तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता. या सगळ्यामुळे ताणावर नियंत्रण मिळवणे सोपे होईल. रोजच्या जीवनात येणारा ताण दूर करण्यासाठी एक्स्पर्ट टीप्स !

३.  नैसर्गिक प्रॉडक्स वापरा: ब्युटी आणि घरगुती प्रॉडक्स मध्ये असलेले केमिकल्स टॉक्सिक असू शकतात. ते एकदा शरीरात गेल्यास त्यामुळे फ्री रॅडिकल्स खराब होऊ लागतात आणि आरोग्याच्या समस्या उद्भवतात. म्हणून तुम्ही वापरत असलेले प्रॉडक्स lithium chloride आणि butyl alcohol पासून फ्री असायला हवेत. म्हणून शक्यतो किमान त्वचेसाठी तरी नैसर्गिक प्रॉडक्स वापरा.

४. हार्मोनल समस्यांवर उपाय म्हणून गर्भनिरोधक गोळ्या घेणे थांबवा: जर तुम्ही गर्भधारणा होऊ नये म्हणून गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल तर ते ठीक आहे. परंतु, तुम्ही त्या गोळ्या मासिक पाळी सुरळीत होण्यासाठी किंवा अॅक्नेवर उपाय म्हणून घेत असाल तर तो त्रास बरा होण्याऐवजी फक्त लपला जाईल. म्हणून गर्भनिरोधक गोळ्या घेणे थांबवा आणि हार्मोनचे संतुलन राखण्यासाठी योग्य ती औषधे घ्या. तसंच आहारात व जीवनशैलीत आवश्यक ते बदल करा. गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केल्यामुळे वंधत्व येते का?

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>