Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मुलांच्या हेल्दी टेस्टी पदार्थांसाठी व्हेजीटेबल स्टॉक कसा तयार करुन ठेवाल ?

$
0
0

ताज्या भाज्या उपलब्ध असताना व्हेजीटेबल स्टॉक तयार करुन ठेवण्याची का गरज आहे? किंवा ताज्या भाज्यांमध्ये अधिक पोषकमुल्य असतात का?अशा अनेक शंका तुमच्या मनामध्ये नक्कीच निर्माण झाल्या असतील.खरंतर साठवून ठेवलेल्या व्हेजीटेबल स्टॉक पेक्षा ताज्या भाज्या खाणे नेहमीच चांगले पण समजा कधी तुम्हाला भाज्या स्वच्छ करणे,निवडणे,धुणे,कापणे व शिजवण्यासाठी वेळ नसेल तर हा व्हेजीटेबल स्टॉक स्वयंपाक करताना फायदेशीर ठरु शकतो.तसेच यासोबतच वाचा भेसळयुक्त भाज्या कशा ओळखाव्यात ?

व्हेजीटेबल स्टॉकमधून देखील तुमच्या मुलांना व कुटूंबाला आवश्यक पोषणमुल्य मिळू शकतात.तसेच तुम्ही या स्टॉकचा वापर अगदी घाईच्या वेळी खिचडी करताना देखील करु शकता.या स्टॉकमुळे सहाजिकच तुमच्या मुलांना हेल्दी व पौष्टिक जेवण मिळेल व तुमचा स्वयंपाक घरातील वेळ वाचल्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टींसाठी देखील वेळ काढू शकाल.तज्ञांच्या मते व्हेजीटेबल स्टॉक बनवून ठेवण्याची कल्पना फारच कल्पक आहे.विशेषत: नोकरी करणा-या मातांसाठी ही कल्पना वरदानच ठरु शकते.यासाठी वाचा लहान मुलांचा नेमका आहार कसा असावा ?

जाणून घेऊयात व्हेजीटेबल स्टॉक बनविण्याची कृती-

एका भांड्यामध्ये पाणी घ्या.

त्यामध्ये सोलून रफ कट केलेले कांदे टाका.यासाठी भाज्या कशा कापाव्या याची मुळीच काळजी करु नका.

या रेसिपी साठी तुम्ही अगदी भाज्यांच्या मोठ्या मोठ्या फोडी कापल्या तरी चालू शकतात.

त्यानंतर त्यामध्ये गाजर,मटार,लसूण,ब्रोकोली(मुलांना न आवडणा-या सर्व भाज्या),फ्लॉवर,शेवग्याच्या शेंगा व हवे असल्यास कोथिंबिरी व पुदिना टाका.यातील भाज्यांचे प्रमाण देखील अगदी मोजून मापून पहाण्याची काहीच गरज नाही.

थोडक्यात तुम्ही सर्व भाज्या समप्रमाणात घेऊ शकता.

मीठ व मिरपूडीने हे मिश्रण तुम्ही अधिक स्वादिष्ट देखील करु शकता किंवा जर तुमचे मुल अगदी लहान असेल तर हे घटक तुम्ही वगळले तरी चालू शकेल.तसेच व्हेजीटेबल स्टॉक तयार करण्यासाठी तुम्ही घरात उपलब्ध असलेल्या कमी जास्त प्रमाणातील सर्व भाज्या वापरु शकता.एकत्र केलेले सर्व मिश्रण एक तास मंद गॅसवर उकळू द्या.

त्यानंतर हे मिश्रण थंड करा व गाळून तयार झालेला व्हेजीटेबल स्टॉक एखाद्या भांड्यामध्ये भरुन ठेवा.तसेच डाळीचे पाणी की पातळ डाळ बाळासाठी काय योग्य ठरेल ? हे देखील अवश्य वाचा.

व्हेजीटेबल स्टॉक कसा साठवून ठेवावा-

तुम्ही व्हेजीटेबल स्टॉक आईस ट्रे मध्ये भरुन ठेऊन स्वयंपाक करताना त्यातील दोन आईस क्युब्स दरवेळी वापरु शकता.लक्षात ठेवा व्हेजीटेबल स्टॉक दहा दिवसांपेक्षा अधिक दिवस फ्रीजरमध्ये साठवून ठेऊन वापरु नका.ताजा स्टॉक तुम्ही सूपसाठी वापरु शकता.जर तुम्ही मांसाहारी असाल तर त्यामध्ये चिकन टाकून मुलांच्या खाद्यपदार्थांसाठी चिकन स्टॉक देखील तुम्ही तयार करु शकता.अशा प्रकारे व्हेजीटेबल स्टॉकच्या सहाय्याने मुलांचे जेवण स्वादिष्ट व पौष्टिक करा. तसेच वाचा मुलांना हेल्दी खाण्याची सवय कशी लावाल ?

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>