गरोदर स्त्रीच्या आरोग्यावर एक जीव पूर्णपणे तिच्यावर अवलंबून असतो. त्यामुळे गर्भवती स्त्री रक्तदान करू शकते की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. Bannerghatta Road च्या फोर्टीज हॉस्पिटलचे Consultant Obstetrics आणि Gynaecologist Dr. Gayathri Kamath, यांनी गर्भवती महिलांनी रक्तदान करू नये, असा सल्ला दिला आहे .
गर्भारपणात शारीरिक बदलांमुळे ब्लड व्हॉल्युम आणि रेड ब्लड सेल मास वाढतो. परंतु, त्याच्या असंतुलित प्रमाणामुळे रक्तातील फ्लुईडचे प्रमाण वाढते. त्यामुळे अॅनेमिया वाढतो. असे सगळ्या गर्भार स्त्रियांमध्ये होते. भारतातील खेड्यापाड्यात गर्भवती महिलांमध्ये अनेमियाचे प्रमाण ५०% पेक्षा जास्त आहे. यासाठी आहार, पोटातील जंत, आतड्यांची आयर्न शोषून घेण्याची कमी क्षमता (फक्त १०% आयर्न शोषले जाते) हे घटक कारणीभूत ठरतात. आहारातील या ‘१०’अन्नघटकांनी वाढवा तुमचे हिमोग्लोबिन
गर्भवती महिलेसाठी हिमोग्लोबिन आणि आयर्न योग्य प्रमाणात असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच प्रसूतीत होणारा रक्तस्त्राव ती ब्लड ट्रान्सफ्युजन शिवाय सहन करू शकते. म्हणून, गर्भवती स्त्रीने रक्तदान न करण्याचा सल्ला दिला जातो. आहारात टाळू नका हे ’7′ आयर्नयुक्त पदार्थ !
परंतु, काही गंभीर परिस्थितीत एखाद्या महिलेवर रक्तदान करण्याची वेळ आलीच तर पहिल्या तीन महिन्यात रक्तदान करू नये. गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात कोणती काळजी घ्याल ?
गर्भारपणात रक्तदान केल्यास त्यामुळे बाळाला व आईला हानी पोहचू शकते. अशावेळी आहारात आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश करावा. काही वेळा गर्भधारणा कन्फर्म झालेली नसल्यामुळे महिलेलाच ती गर्भवती असल्याबद्दल काही माहीती नसते. अशावेळी रक्तदान केले जाते. हे टाळण्यासाठी महिलांनी मासिकपाळीच्या पहिल्या १४ दिवसात रक्तदान करावे. कारण त्यावेळेस गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते. रक्तदानाबाबत हे ’10′ गैरसमज आजच दूर करा !
ज्या स्त्रियांना anticipated placenta praevia असतो किंवा आई होण्याच्या मार्गावर असतात, त्यांना प्रसूतीच्या वेळेस खूप जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होतो. अशावेळी इतर मार्गांनी म्हणजे इंजेशन्स वगैरे घेऊन रक्त घेणे टाळा. गर्भवती स्त्री दुसऱ्या तिमाहीत रक्तदान करून ते रक्त ब्लड बँकेत साठवून ठेवा आणि प्रसूतीच्या वेळेस होणारी रक्ताची कमी भरून काढण्यासाठी ते रक्त वापरा.
जाणून घ्या: त्वचा विकार असताना रक्तदान करणे योग्य आहे का ?
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock