Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Osteoarthritis या समस्येवर कोणत्या आधुनिक उपचार पद्धती करण्यात येतात?

$
0
0

मी एक २६ वर्षांची महिला आहे.माझ्या आईला गुडघ्यांच्या Osteoarthritis या समस्येवर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.मला याबाबत फार ज्ञान नसल्यामुळे या समस्येबाबत नेमकी कोणती शस्त्रक्रिया करणे योग्य अाहे हे समजत नाही.तसेच गुडघेदुखी अथवा Osteoarthritis  असलेल्या प्रत्येक व्यक्तीला शस्त्रक्रिया करावीच लागते का? या समस्येवर उपचार करण्याचा दुसरा कोणता मार्ग आहे का? तसेच गुडघेदुखी अथवा Osteoarthritis वर इतर कोणते आधुनिक उपचार उपलब्ध आहेत का? Arthroscopy, Osteotomy, Joint fusion व Joint replacement (Arthroplasty) या उपचारांमध्ये नेमका काय फरक आहे? याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.

पलामविहार येथील कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे सिनीयर ऑर्थोपेडीक सर्जन डॉ.विभोर सिंघल यांच्याकडून या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात.

गुडघ्यांच्या Osteoarthritis या समस्येवर करण्यात येणा-या सर्जिकल अथवा नॉन-सर्जिकल उपचारांबाबत अनेक आधुनिक शोध लावण्यात आले आहेत.त्यामुळे प्रत्येक Osteoarthritis ग्रस्त रुग्णांवर आता शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही.पण रुग्णाच्या गुडघ्यामधील स्टिफनेस व वेदना फारच गंभीर असतील व त्यामुळे त्यांना हालचाल करणे कठीण होत असेल तर मात्र डॉक्टर अशा रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देऊ शकतात.या स्थितीतील रुग्णांना ब्रेसेस,शू इनसर्ट् व चालण्यासाठी मदत करण्या-या काही साधनांची काही प्रमाणात मदत होऊ शकते कारण त्यामुळे त्यांच्या सांध्यावरचा ताण कमी होतो.स्थिरतेसाठी वापरण्यात येणा-या ब्रेसेसच्या प्रभावावर संशोधन झालेले असून अनेक अॅथलीट देखील त्याचा वापर करतात.गुडघ्यांवर ब्रेसेस घातल्यामुळे शरीराचे वजन विभागले गेल्यामुळे सांध्यावर वजनाचा ताण कमी येतो.औषधोपचार व फिजीकल थेरपी दरम्यान ब्रेसेस वापरणे फायदेशीर ठरु शकते.दुखणा-या सांध्यावर डॉक्टर स्प्लिंट अथवा सॉफ्ट स्लीव्ह वापरण्याचा देखील सल्ला देतात.तसेच जाणून घ्या आर्थ्राटीस वर होमिओपॅथी उपचार घ्यावेत का?

गुडघ्यांच्या Osteoarthritis या समस्येवर करण्यात येण्या-या Arthroscopy, Osteotomy, Joint fusion व Joint replacement (Arthroplasty) या काही शस्त्रक्रियेच्या प्रक्रिया आहेत.ज्यामधील Arthroscopy ही सांध्याची एक की-होल सर्जरी असून Osteotomy मध्ये अलायमेंट सुधारण्यासाठी हाड कापण्याची गरज असते.जाइंट फ्युजन ही एक अशी प्रकिया आहे ज्यामध्ये दोन हाडांच्या सहाय्याने होणा-या संयुक्त हालचाली कायमस्वरुपी बंद करण्यात येतात.तर Joint replacement (Arthroplasty) मध्ये सांध्यांची हालचाल सुधारण्यासाठी सांध्याचा पुष्टभाग बदलण्यात येतो.यासाठी काही कृत्रिम घटक अथवा रुग्णाच्या शरीराचा इतर नैसर्गिक घटक वापरण्यात येतो.तसेच जाणून घ्या साधे सांध्यांचे दुखणे अर्थ्राईटीसच्या त्रासापासून या ’6′ लक्षणांनी वेगळे ठरते. !

Total knee arthroplasty (TKA)-याला जाइंट रिप्लेसमेंट असे देखील म्हणतात ज्या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णांचा सांधा कृत्रिम सांध्याद्वारे बदलण्यात येतो.यासाठी सिटीस्कॅन अथवा एमआरआय द्वारे रुग्णाची स्थिती तपासण्यात येते.यासाठी ३डी प्रिंटरचा देखील वापर करण्यात येतो व शस्त्रक्रियेद्वारे रुग्णाला नवीन कृत्रिम सांधा बसविण्यात येतो.अचुकतेसाठी या सर्जरी रोबेटीक तंत्रज्ञानाचा वापर करुन देखील करण्यात येतात.Total knee arthroplasty करण्यापूर्वी High Tibial Osteotomy (HTO) व Unicondylar किंवा Partial Knee Arthroplasty (UKA) या सर्जिकल उपचारांचा विचार करण्यात येतो.

High Tibial Osteotomy (HTO)- या प्रक्रियेमुळे Osteoarthritis या समस्येनधील वेदना कमी करता येतात.Osteoarthritis च्या सुरुवातीच्या काळात गुडघ्याच्या सांध्याच्या एका बाजूला झालेल्या बिघाडासाठी HTO हे उपचार फायदेशीर ठरतात.ज्यामध्ये tibia ला कट देण्यात येतो.

Unicondylar किंवा Partial Knee Arthroplasty (UKA)- या शस्त्रक्रियेमध्ये आर्थ्र्ाटीसमधून आराम मिळवण्यासाठी गुडघ्याच्या ज्या भागात बिघाड झालेला असतो तेवढाच भाग रिप्लेस करण्यात येतो.या शस्त्रक्रियेनंतर होणा-या वेदना कमी असून रिकव्हरी देखील लवकर होते.या प्रक्रियेमध्ये गुडघ्यामध्ये बिघाड झालेला आतील एकच भागच रिप्लेस करण्यात येतो.गुडघ्याचे आतील भाग,बाहेरील भाग व गुडघ्याची वाटी व मांडीचे हाड यामध्ये असे एकूण तीन विभाग असतात.

 Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>