Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

यकृत व फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी आहारात हवीत ही 10 सुपरफूड्स !

$
0
0

यकृत व फुफ्फुसे तुमच्या शरीरातील महत्वाचे अवयव असून त्यांची निगा राखणे फार गरजेचे आहे.बदललेली जीवनशैली व चुकीचा आहार यामुळे आपणच या अवयवांचे नुकसान करत असतो.मात्र काही पदार्थ खाण्याने या अवयवांचे नुकसान नक्कीच टाळता येऊ शकते.

Alternative Medicine & Holistic Nutritionist चे MD.Mr. Luke Coutinho यांच्यामते हे सुपरफूड्स व्हिटॅमिन व मिनरल्स या पोषणमुल्यांनी परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्या सेवनामुळे आजार दूर ठेवणे व निरोगी आयुष्य जगणे शक्य होते.या सुपरफूडमध्ये भाज्यांसह मासे व दूधाचे पदार्थ देखील असू शकतात.या पदार्थांमुळे विशेषत: तुमच्या शरीरातील यकृत व फुफ्फुसे या महत्वाच्या अवयवांचे कार्य सुधारते.

यकृत व फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी आहारात या अन्नपदार्थांचा समावेश करा.

१.बीटाकॅरोटीनयुक्त पदार्थ- संत्री अथवा लाल रंगाच्या फळांमध्ये आढळणारे नारिंगी रंगाचे अॅन्टीऑक्सिडन्ट पिगमेंट अथवा रंगद्रव्य फुफ्फुसांना होणा-या कर्करोगाचा धोका कमी करते.या फळांमध्ये Glutathione असते ज्याची यकृताचे डिटॉक्सिफीकेशन करण्यास मदत होते.उदा. बीट,गाजर,टोमॅटो,रेड बेल पेपर,सुकवलेले जर्दाळू,लाल भोपळा व खरबूज.तसेच या आयुर्वेदीक डिटॉक्स डाएटने कसे कराल शरीर अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी !देखील जरुर वाचा.

२.व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ-व्हिटॅमिन सी असलेले पदार्थांमुळे एन्झाइमची निर्मिती वाढते ज्यामुळे यकृताचे नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्सिफीकेशन करणे सोपे होते व फुफ्फुसांमधून संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतो.जसे की द्राक्ष,किवी,पेरु,संत्री व लिंबासारखी लिंबूवर्गीय आंबट फळे,स्टॉबेरी,अननस,लाल व हिरवी सिमला मिरची व Brussels sprouts.

3.हिरव्या पालेभाज्या-हिरव्या पालेभाज्या कच्चा,वाफवून अथवा त्यांचा रस करुन आहारात घेतल्याने यकृत व फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते.या भाज्यांमध्ये हरितरंगद्रव्य मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्याचा यकृत व फुफ्फुसांमधील रक्त शुद्ध करण्यास मदत होते.या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर डिटॉक्सिफीकेशन करण्याची क्षमता असल्याने त्यामुळे यकृताचे संरक्षण करता येते.या भाज्यांमध्ये मॅग्नेशियम व पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे फुफ्फुसे निरोगी रहाण्यास मदत होते.यासाठी आहारात पालक,लेट्यूस,कोबी,मस्टर्ड ग्रीन,पातीचा कांदा,गव्हाकुंर,Kale, Dandelion, पुदिना व कोथिंबिरीची पाने यांचा समावेश करा.तसेच शरीर डीटॉक्स करण्याचे ७ सहज सोपे पर्याय !अवश्य वाचा.

४.हळद-भारतीय व दक्षिण आशियायी भागात स्वयंपाकासाठी प्राचीन काळापासून हळद हा मसाल्याचा पदार्थ वापरण्यात येतो.हळदीमध्ये असलेल्या सक्रिय Curcumin घटकांमध्ये जखमा ब-या करण्याची क्षमता असते.हळद अॅन्टीऑस्किडन्ट,अॅन्टी-इनफ्लैमटरी,अॅन्टीबायोटीक व रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक असतात.तसेच हळदीमध्ये अॅन्टी-कॅन्सर,अॅन्टी-कोलेस्टेरॉलेमिक व हेपेटोप्रोटेक्टीव्ह घटक देखील असतात.अन्नाचे पचन व शरीरातील फॅट्स कमी करण्यासाठी यकृतातील पाचकरसाला हळदीमुळे चालना मिळते.फॅटी लिव्हर डिसीज मध्ये यकृताच्या पेशींमध्ये होणारा दाह यामुळे कमी होतो.काही अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की हळदीमध्ये असलेल्या Curcumin या घटकामुळे अति धुम्रपानामुळे फुफ्फुसांमध्ये साठणारा Plaque कमी होतो ज्यामुळे चैन स्मोकर व्यक्तीला फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचा धोका असतो.तसेच ‘हळदी’ने ठेवा रक्तातील साखर नियंत्रणात !देखील नक्की वाचा.

५.आले-आले हे देखील पचन व रक्ताभिसरणाला चालना देणारा एक पदार्थ आहे.त्यातील पाचक घटक यकृतातील टॉक्सिन बाहेर टाकण्यास मदत करतात.आल्याचा फुफ्फुसांचे कार्य सुधारण्यासाठी देखील फायदा होतो. तसेच उन्हाळ्यात शरीराला डीटॉक्स करण्याचे ’6′ नैसर्गिक उपाय !जरुर वाचा.

६.लसूण-लसणामध्ये सल्फर,एॅलिसिन व सेलेनियम चे प्रमाण भरपूर असल्यामुळे त्याचा यकृतातील इन्झायमी सक्रिय करुन शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकण्यास मदत होते.लसणामधील अॅन्टी-इनफ्लैमटरी व इन्युन बिल्डींग प्रॉपर्टीजमुळे अस्थमा व फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

७.Cruciferous भाज्या- या भाज्या आहारात असल्यास शरीरातील Glucosinolate निर्मिती वाढते ज्याचा फायदा यकृत व फुफ्फुसांमधील टॉक्सिन बाहेर टाकण्यास मदत होते.या भाज्यामध्ये फ्लॉवर,ब्रोकोली,कोबी, Kale व Brussels sprouts चा समावेश असतो.

८.ग्रीन टी-ग्रीन टीमध्ये अॅन्टीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असतात विशेषत: EGCG (epigallocatechin) म्हणून ओळखला जाणारा कॅटेचिन हा घटक असतो ज्यामुळे यकृताचे कार्य सुधारते.तसेच यामध्ये फुफुसांना कॅन्सरच्या घटकांपासून संरक्षण देणारे घटक देखील असतात.या ’6′ कारणांसाठी आजपासून नक्की प्या ‘ग्रीन टी’

९.ओमेगा ३ युक्त पदार्थ-ओमेगा ३ युक्त पदार्थ यकृताच्या कार्यामधील LDL cholesterol व Triglyceride ची पातळी कमी करतात.यामुळे लठ्ठ व मधूमेहींच्या यकृताचे नुकसान होण्यापासून बचाव करता येतो.या पदार्थांमुळे श्वसनमार्ग मजबूत होतो त्यामुळे श्वसनविकारांपासून बचाव करता येतो.ओमेगा ३ युक्त पदार्थांमध्ये बदाम,पिस्ता,अक्रोड,फ्लॅक्स सीड,चीया सीड,सोयाबीन,पालक, Salmon, Mackerel, Trout व Oysters सारखे फॅटी फीश यांचा समावेश असतो.

१०.सफरचंद-सफरचंदामध्ये Pectin,व्हिटॅमिन,फ्लेवोनॉइड व केमिकल घटक असतात ज्यामुळे यकृताचे डिटॉक्सिफीकेशन होते.फ्लेवोनॉइड मुळे श्वसनव्यवस्था देखील निरोगी रहाते.यासाठी वाचा सफरचंदाची खीर – लहान मुलांसाठी हेल्दी-टेस्टी पर्याय !

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>