इन्फेकशनपासून संरक्षण होण्यासाठी प्रत्येक मुलाला लस देणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यापैकी धर्नुवाताची लस अनिर्वाय आहे. ही लस बाळाला पहिल्या वर्षी दिली जाते. तसंच जीवनाच्या विविध टप्प्यांवर आणि परिस्थितीनुसार ही लस घेणे गरजेचे आहे. यंदाच्या World Immunisation Week ची थीम आहे #VaccinesWork. यानिमित्ताने फोर्टीज हॉस्पिटलचे Director व HOD, Paediatrics आणि Neonatology, डॉ. राहुल नागपाल यांनी धर्नुवाताच्या लसी विषयी माहिती दिली.
१. जर लहानपणी तुमचे प्राथमिक लसीकरण झाले नसेल तर DTP ((diphtheria, pertussis or whooping cough and tetanus) लसीकरण करून घ्या. कारण त्यामुळे या आजारांपासून तुमचे संरक्षण होईल.
२. लहानपणी लस घेतली असेल पण या १० वर्षात बुस्टर डोस घेणे राहून गेले असेल तर धर्नुवातासाठी लसीकरण करून घेणे योग्य ठरेल. बुस्टर डोस साधारणपणे बाळाच्या वयाच्या २ ऱ्या व ५ व्या वर्षी देतात.
३. धर्नुवाताची लस जेष्ठ नागरिकांनी आणि मधुमेहींनी घ्यावी असा सल्ला दिला जातो. कारण त्यांना धर्नुवाताचा धोका अधिक असतो. तसंच गेल्या १० वर्षात बुस्टर डोस न घेण्याची शक्यता अधिक असते.
४. सर्जरी करण्यापूर्वी इन्फेकशनचा धोका टाळण्यासाठी धर्नुवाताची लस घेण्याचा सल्ला दिला जातो. तसंच धनुर्वातातून बरं झालेल्या व्यक्तीला न चुकता Tdap किंवा Td घेणे गरजेचे आहे.
५. जर आतापर्यंत तुम्ही धर्नुवाताची लस घेतली नसेल तर एक Tdap डोस आणि एक Td बुस्टर डोस घ्या. त्यामुळे इन्फेकशनचा धोका कमी होवून त्याला आळा बसेल.
६. लहान मुलांच्या संपर्कात येण्यापूर्वी Tdap लसीकरण करून घ्या. कारण त्यामुळे डांग्या खोकला- pertussis (whooping cough) यापासून संरक्षण होते.
७. जर तुम्ही गरोदर असाल तर धर्नुवाताची लस घेणे योग्य ठरेल. आईने लस घेतल्यास त्याचा फायदा बाळाला देखील मिळतो. बाळाला इम्म्युनिटी मिळते व इन्फेकशन पासून संरक्षण होते. गरोदरपणात धर्नुवात प्रतिबंधक लस घेणे गरजेचे असते का ?
लक्षात ठेवा लस घेतलेल्या व्यक्तीलाच त्याचे फायदे मिळतात. म्हणजेच त्या व्यक्तीचे फक्त आजार, इन्फेकशन पासून संरक्षण होते. हे संरक्षण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही. तसंच pertussis पासून सुरक्षित राहण्यासाठी Td लसीऐवजी Tetanus-diphtheria-acellular pertussis (Tdap) ही लस फक्त मोठया व्यक्तीला दिली जाते. धर्नुवाताचे इंजेकशन हे फ्रिजमधून काढून लगेच दिल्यास सुरक्षित असते.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock