सिन्थेटिक डिस्पोजेबल पॅड्समुळे पर्यावरणाला हानी पोहचते, याबद्दल अनेक स्त्रिया जागरूक आहेत. म्हणून त्यासाठी सुरक्षित, पर्यावरण पूरक पर्याय अनेकजणी शोधत आहेत. यासाठी मेन्स्ट्रुअल कॅप्सचा पर्याय आहे. पण सगळ्यांच तो सोयीस्कर ठरेल असे नाही. मग दुसरा पर्याय आहे कपड्यांच्या पॅड्सचा. हे नक्कीच पर्यावरण पूरक असून वापरण्यास देखील सोयीस्कर आहेत.
परंतु, डिस्पोजेबल पॅड्सची सवय झाल्यानंतर अचानक कपड्याचे पॅड्स वापऱ्यायचे म्हटल्यावर मनात अनेक प्रश्न येतात. त्या प्रश्नांची ही उत्तरे.
- डिस्पोजेबल पॅड्स पेक्षा कपड्याचे पॅड्स वेगळे कसे?
वापरण्यासाठी डिस्पोजेबल पॅड्सपेक्षा कपड्याचे पॅड्स चांगले. कपड्याचे पॅड्स मागच्या बाजूने चिकट नसतात. त्याऐवजी त्याला बाजूला विंग्स असतात. त्यामुळे पॅड एका जागी नीट राहतो. ते विंग्स देखील चिकट नसल्याने ते चुकीच्या पद्धतीने चिकटण्याची किंवा पॅड हलण्याची शक्यता कमी असते.
कपड्याचे पॅड्स सिथेंटीक डिस्पोजेबल पॅड्सपेक्षा नक्कीच अधिक मऊ असतात व त्यामुळे योनीमार्गाजवळ हवा खेळती राहते. काही कपडाच्या पॅड वर प्लॉस्टिक लायनिंग असते त्यामुळे रक्तस्त्राव लीक होत नाही.
- कपड्याचे पॅड्स किती वेळाने बदलावे?
हे रक्तस्त्राव होण्याच्या प्रमाणावर अवलंबून आहे. तरीही ४-६ तासामध्ये पॅड बदलणे गरजेचे आहे. तसंच किती वेळा पॅड बदलावा हे प्रत्येकावर अवलंबून आहे. याचा अंदाज तुम्हाला कपड्याचे पॅड्स वापरायला सुरुवात केल्यावर येईल. कपड्याचे पॅड्स वापरणे आरोग्यदायी आहे का ?
- घराबाहेर असताना कपड्याचे पॅड्स कसे बदलावे?
हे पॅड बदलणे डिस्पोजेबल पॅड्स बदलण्याइतके सोपे आहे. परंतु, ते कचऱ्याच्या बादलीत टाकून देण्याऐवजी गुंडाळून ठेवा व घरी आल्यावर धुवा किंवा लगेचच धुवून टाका. पॅड गुंडाळण्यासाठी झिपलॉक पाऊच किंवा पॅडचे पाऊच (ज्यात पॅड गुंडाळून मिळतात) ते वापरा आणि नंतर पॅड धुवून स्वच्छ करा.
- कपड्याच्या पॅड्स मुळे डाग पडत नाही का ? त्याला वास येत नाही का?
बरेचसे कपड्यांचे पॅड्स स्टेन रेसिस्टन्स मटेरियलने बनलेले असतात. त्यामुळे सहजासहजी डाग पडत नाहीत. ते धुतल्यावर देखील डाग पडण्याची किंवा वास येण्याची शक्यता कमी असते. ते व्यवस्थित स्वच्छ होण्यासाठी अँटी बॅक्टरील लिक्विड चा वापर करा. या टीप्सने मासिकपाळीच्या दिवसात कपड्यांवर डाग पडण्याचे टेन्शन होईल दूर !
- कपड्याचे पॅड्स स्वच्छ कसे करावे?
इतर कपड्यांप्रमाणे पॅड्स देखील धुवा. पॅड नळाखाली धरा. त्यामुळे त्यावरील रक्त वाहून जाईल. त्यानंतर साबणाने धुवा. पॅड सुकण्यासाठी साधारण २-४ तास लागतील.
- साधारणपणे एका स्त्रिला किती कपड्यांचे पॅड्स लागतील?
हे रक्तस्त्राव होण्याच्या प्रमाणावर अवलंबून आहे. तसंच तुम्ही पॅड्स किती वेळा धुता यावर देखील. एका नोकरदार स्त्रिला जी घरापासून खूप वेळ बाहेर असते तिला ८-१० पॅड्स आणि रात्री २ पॅड्स लागतील.
- कपड्यांचे पॅड्स कुठे मिळतील?
हे पॅड्स ए-कॉमर्स स्टोर्समध्ये उपलब्ध आहेत. तसंच काही उद्योजक याचा व्यवसाय करतात. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock