अनेकदा गर्भपाताचे कारण कळत नाही. हा काळ दोघांसाठी देखील अवघड असला तरी तिच्यासाठी थोडासा वेळ काढल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुरळीत होण्यास मदत होते. मुंबईच्या Cloudnine Hospital च्या Consultant Gynaecologist and obstetrician Dr Meghana Sarvaiya यांनी गर्भपात झाल्यानंतर नेमके काय करावे, त्यातून कसे बाहेर पडावे यावर मार्गदर्शन केले.
- नव्या बाळासाठी प्रयत्न करण्यापूर्वी थोडा वेळ द्या:
अलीकडेच झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की गर्भपात झाल्यानंतर देखील तुम्ही मनात कोणतीही भीती न बाळगता बाळासाठी प्रयत्न करू शकता. असे असले तरी गर्भपातानंतर तीन महिन्यांनी नव्या बाळासाठी प्रयत्न करणे योग्य असल्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे गर्भाशयाला पूर्ववत होण्यासाठी आणि नव्या गर्भधारणेसाठी शरीराला तयार होण्यासाठी वेळ मिळतो. एका गर्भपातानंतर दुसऱ्या वेळी गर्भपात होण्याचा धोका १४ % असतो तर दोन वेळा गर्भपात झाल्यास हा २६% इतका वाढतो आणि तीनदा गर्भपात झाल्यास हा धोका २८% इतका असतो. हा धोका लक्षात घेता शरीराला पूर्णपणे बरं होण्यासाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे असल्याचे तुमच्या लक्षात आले असेल. त्यामुळे घाई न करता नव्या बाळासाठी प्रयत्न करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- चेकअप करून घ्या:
अचानक गर्भपात झाल्यास डॉक्टरांची भेट घ्या आणि व्यवस्थित चेकअप करून घ्या. कारण नव्या बाळासाठी प्रयत्न करण्यापूर्वी गर्भपाताचे कारण जाणून घेणे गरजेचे आहे. गर्भपाताची अनेक कारणे असतात. chromosomal abnormalities, immunological problems, uterine fibroids, फॉलीक असिडची कमतरता यामुळे गर्भपात होऊ शकतो. पुन्हा गर्भधारणा होऊन गर्भारपणाचे ३६-४० आठवडे कोणत्याही अडथळ्यांशिवाय पार पडण्यासाठी खोलवर तपासण्या करणे डॉक्टरांसाठी गरजेचे आहे. गर्भपातानंतर पुन्हा बाळासाठी प्रयत्न करण्यापुर्वी करा या ५ डायग्नोस्टीक टेस्ट
- काउंसलिंग करून घ्या:
गर्भपातानंतर सामान्यपणे स्त्रिला नैराश्य येते. तसंच कुटूंबियांना देखील तिच्याशी कसे वागावे हे नीटसे समजत नाही. सगळ्यांसाठीच तो कठीण काळ असतो. या कठीण काळाला सामोरे जाण्यासाठी आणि हळूहळू पूर्ववत होण्यासाठी काउंसलिंगची मदत होते. नैराश्याच्या लक्षणांमुळे स्त्रिला दैनंदिन काम करण्यात रस वाटत नाही किंवा ते करणे अवघड होते. तसंच जर त्या वेळेस ती बाळासाठी प्रयन्त करत असेल तर ताणात वाढ होते. आणि अशावेळी गर्भधारणा झाल्यास ताण आणि नैराश्याचा परिणाम गर्भावर होतो. म्हणून ताणावर मात करण्यासाठी काउंसलिंग करून घेणे योग्य ठरेल. गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात कोणती काळजी घ्याल ?
- पुरेसा आराम करा:
तुम्ही जितका जास्त आराम कराल, तितके तुम्हाला लवकर बरे वाटेल. गर्भपातानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुरळीत होण्यासाठी पुरेसा आराम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मासिकपाळी की गर्भपात – नेमका कशामुळे होतोय रक्तस्त्राव हे कसं ओळखाल ?
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock