उन्हाच्या त्रासापासून बचावण्यासाठी, थोडं कूल राहण्यासाठी उन्हाळ्यात थंडगार कार्बोहायड्रेट ब्रेव्हरेजेज / शीतपेयं पिण्याचा मोह अनेकांना होतो. आरोग्याच्या बाबतीत थोडी दक्ष राहणारी लोकं फळांचा ताजा रस पितात. यामुळे शरीरात उर्जा आणि उत्साह टिकून राहण्यास मदत होते. पण बाजारात विकत मिळणार्या फळांच्या रसातही साखर असल्यास ते आरोग्यास त्रासदायक ठरू शकते. मात्र वर्षानुवर्ष आजीबाईच्या बटव्यातल एक असं पेय आहे जे उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हांला फ्रेश, हायड्रेटेड आणि सशक्त ठेवते ते म्हणजे पेजेचं पाणी किंवा कांजी !डी-हायड्रेशन पासून बचावण्यासाठी खास ’9′ टीप्स !
- कसं ठरते पेजेचं पाणी फायदेशीर ?
उष्माघात आणि उन्हाच्या काहलीपासून बचावण्यासाठी पेजेचं पाणी किंवा कांजी पिणं फायदेशीर आहे. कांजी हे उत्तम घरगुती आणि हेल्द ड्रिंक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात घाम येण्याचं प्रमाण इतर दिवसांच्या तुलनेत अधिक असते. त्यामुळे शरीरातून आवश्यक पोषकघटक, पाणी यांचे प्रमाण कमी होते. परिणामी हीट स्ट्रोक आणि डीहायड्रेशनचा त्रास वाढण्याची शक्यता दाट असते.
तांदळाची पेज किंवा कांजीमध्ये मीठ असते. संध्याकाळच्या वेळेस कांजीचे पाणी प्यायल्याने शरीरात कमी झालेले इलेक्ट्रोलाईट्स आणि पाण्याचे प्रमाण पुन्हा पूर्ववत होण्यासाठी मदत होते. डीहायड्रेशनचा त्रास कमी होतो. तसेच कांजी किंवा पेजेचं पाणी त्वचा मॉईश्चराईज्ड ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे बाहेर पडल्यावर शरीरात थकवाही जाणवत नाही. त्यामुळे तुम्हांला थकवा जाणवत असल्यास, घराबाहेर पडण्यापूर्वी ग्लासभर पेजेचं पाणी किंवा कांजी प्या.
- कसं बनवाल पेजेचं पाणी ?
घरी तांदळाची पेज बनवण्यासाठी कपभर तांदळामध्ये दुप्पट पाणी मिसळा. हे मिश्रण उकळत ठेवा. तांदूळ शिजायला लागल्यावर पाणी गाळून त्यामध्ये मीठ मिसळा. यामध्ये तुम्ही चमचाभर भातही मिक्स करू शकता. उन्हाचा त्रास टाळण्यासाठी तसेच हायड्रेटेड राहण्यासाठी कांजीचं पाणी अवश्य प्या. दिवसभराचा ताण, थकवा कमी करण्यासाठी संध्याकाळी ग्लासभर कांजीचं किंवा पेजेचं पाणी प्या.
पांढर्या तांदळाऐवजी तुम्ही बाजारात उपलब्ध असणारा हातसडीचा किंवा लाल तांदूळही वापरू शकतो. तो तांदूळ अधिक आरोग्यदायी आणि चविष्ट लागतो. केवळ उष्माघात किंवा डीहायड्रेशनच्या समस्येवर नाही तर भाताची पेज रोज पिण्याची ’5′ हेल्दी कारणं देखिल नक्की जाणून घ्या
With inputs from Dr Swati Dave, Ex-Senior Dietitian & Nutritionist Shalby Hospitals, Ahmedabad.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock