Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

केंद्रिय अर्थसंकल्प 2016 : स्वस्त दरात आणि जिल्हा स्तरावर उपलब्ध होणार ‘डायलिसीस सेवा’

$
0
0

छायाचित्र सौजन्य -: IANS  Photos

केंद्र सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अरुण जेटली यांनी आज लोकसभेत सादर केला आहे. काही दिवसांपूर्वी मांडलेल्या रेल्वे अर्थसंकल्पातून सुरेश प्रभूंनी प्रवाशांचा रेल्वेप्रवास अधिक सुरक्षित आणि आनंदादायी करण्यासाठी 8 विविध योजना मांडल्या  आहेत. रेल्वे अर्थसंकल्पानंतर भारतीयांचे लक्ष बहूप्रतिक्षीत केंद्रीय अर्थसंकल्प 2016 कडे लागले होते. केंद्रिय अर्थसंकल्पामध्ये आरोग्य हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. त्यानुसार अर्थमंत्री अरूण जेटली  यांनी यंदाचा अर्थसंकल्पात ‘आरोग्य क्षेत्राशी’ निगडीत केलेल्या या काही महत्त्वाच्या घोषणा -:

#1  एलपीजी गॅस  सिलेंडर प्रत्येक घराला मिळणार –

स्त्रियांचे आरोग्य धोक्यात घालणारे चुलीवर जेवण बनवण्याची पद्धत आता कायमची हद्दपार करण्यासाठी सरकार सज्ज झाले आहे. सिलेंडर गॅस हा केवळ मध्यम आणि उच्च मध्यम वर्गासाठी असल्याचा समज होता. आजही ग्रामीण भागात हजारो घरघरात उघड्यावर/ चूलीवर जेवण बनवले जाते. परंतू यामुळे धूर शरीरात गेल्याने त्या स्त्रीप्रमाणेच कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात येते. म्हणूनच 17 लाख घरात एलपीजी गॅस सिलेंडर मिळावा म्हणून  2000 करोड रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

#2 आरोग्य विमा योजना - 

आरोग्य विमा योजना अंतर्गत प्रत्येक कुटुंबीयांचा 1 लाखाचा प्रतिवर्षीचा विमा काढण्यात येणार आहे. तर वयोवृद्ध लोकांसाठी या  रकमेत 40,000 रांची वाढ करण्यात  आली आहे. पीपीपी मॉडेलनुसार नॅशनल हेल्थ स्कीम राबवणार. 

#3 जेनरीक औषध उपलब्ध होणार - 

ग्रामीण भागामध्ये औषध मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावीत याकरीता जेनरीक औषध केंद्र उभारण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात औषधांचा तुटवडा जाणवू नये तसेच स्वस्त दरात औषधं उपलब्ध व्हावीत याकरिता देशभरात 3000 जेनरिक औषध केंद्र उभारण्यात येणार आहेत.

 #4 स्वस्त दरात आणि जिल्हा स्तरावर डायलेसिस केंद्र उपलब्ध होणार - 

मधूमेह तसेच किडनी विकारांच्या अनेक रुग्णांना नियमित डायलीसिसची गरज असते. ( नक्की वाचा -: किडनीविकारांना दूर ठेवा या ’10′ उपायांनी !) ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात तसेच अत्यावत डायलीसीस यंत्रणा उपबद्ध  नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यासाठी सरकारकडून जिल्हास्तरावर डायलिसीस केंद्र उभारण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत सुमारे 2000 डायलेसिस  केंद्र उभारण्यात येणार आहेत.

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>