केसगळती ही काही प्रमाणात प्रत्येकामध्ये आढळून येते. केसगळतीचे प्रमाण दिवसाला 100 पेक्षा अधिक असल्यास ती समस्या गंभीर आहे. या समस्येचे एक कारण म्हणजे टाळूला होणारा अपुरा रक्तप्रवाह ! मग त्यावरचा एक उपाय म्हणजे टाळूला मसाज करा.
डॉ. एच. के. भाकरू यांच्या मते, केस धुतल्यानंतर बोटांनी टाळूला मसाज करणे हा केसगळती रोखण्याचा एक सहज- सोपा घरगुती उपाय आहे. मग केसगळती रोखण्यासाठी जरूर टाळा या चूका !
कसे आहे फायदेशीर ?
डॉ. एच. के. भाकरू, यांच्या ‘होम रेमेडीज फॉर कॉमन इएलमेंट्स’ या पुस्तकात लिहल्यानुसार थंड पाण्याने केस धुतल्यानंतर टाळूवर हातांच्या बोटांनी मसाज करावा. यामुळे डोक्याजवळील रक्तवाहिन्यांना चालना मिळाल्याने रक्तप्रवाह सुधारतो.परिणामी केसांची वाढदेखील सुधारते.
तुम्ही काय कराल ?
तुमच्या सोयीनुसार पाण्याचे तापमान, शाम्पूने केस धुवा. मात्र शेवटी ते कोमट किंवा साध्या पाण्याने धुवून निथळत ठेवा. यामुळे केस गुंतण्याची शक्यता कमी होते. केसांचे गुंतणे रोखण्यासाठी करून पहा हे उपाय.
काही वेळाने केस टॉवेलने पुसा आणि कोरडे करा. त्यानंतर हाताच्या बोटांनी गोलाकार दिशेने मसाज करा.
खबरदारीचा उपाय -
मसाज करताना तो हळूवार आणि समान प्रमाणात असावा. खूप जोरजोरात केस घालणे, मसाज करताना नखांचा वापर करणे टाळा. यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते.
संबंधित उपाय