मधूमेहींसाठी गुणकारी ‘हळद’
मधूमेहासारख्या आजाराशी सामना करताना तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते. त्यामुळेच मधूमेहातून हृद्यविकार, किडनीविकार, यकृता कमजोर होणे अशा समस्या उद्भवतात. तसेच हळदीतील अॅन्टीऑक्सिडंट, अॅन्टीमायक्रोबायल व दाहशामक घटकांमुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. तसेच अनेक संसर्गाजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी शरीर अधिक सक्षम बनते.
वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते :
वाढता लठठपणा हे मधूमेहींसमोरील एक मोठे आव्हान असते. यामुळे इन्सुलिन निर्मितीच्या कामात अडथळा निर्माण होतो. मात्र हळदीचे नियमित सेवन केल्यास त्यातील क्युरक्युमिन घटकांमुळे शरीरातील कोलेस्टेरॉईडचे प्रमाण नियंत्रणात राहते, पचन सुधारते, तसेच घातक मेदापासून तुमचा बचाव होतो.यामुळे वजनावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.
इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात ठेवते:
स्वादूपिंडात ( Pancreas) इन्सुलिनची निर्मीती होते. हळदीमुळे स्वादूपिंडाचे कार्य सुधारते. तसेच इन्सुलिननिर्मितीचेही कार्य नियंत्रणात राहते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.त्यामुळे मधूमेहींचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
कसा कराल हळदीचा आहारात समावेश ?
हळकुंड, पावडर, तेल अशा विविध स्वरूपात हळद उपलब्ध असते.
नेहमीच्या स्वयंपाकात चिमूटभर हळदीचा समावेश करणे हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र एखादा पदार्थ अतिप्रमाणात शिजवला गेल्यास त्यातील हळदीचे आवश्यक गुणधर्म नष्ट होण्याची चिन्ह असतात. त्यामुळे अन्न शिजवताना विशेष काळजी घ्या.
हळकुंडाचा तुकडा चघळणं हादेखील एक उत्तम मार्ग आहे. यामुळे मधूमेहाशी सामना करण्यास मदत होते तसेच त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत कमी होते.
कोणत्या स्वरूपातील हळद किती खावी ?
काप - 1.5-3 ग्रॅम / दिवस
पावडर – 1-3 ग्रॅम / दिवस
स्टॅडरराईझ पावडर -400-600 मिली ग्रॅ – दिवसातून 3 वेळा
रस – 30-90 थेंब / दिवस
खबरदारीसाठी -
हळद हा नैसर्गिक आणि घरगुती उपाय असला तरीही काही व्यक्तींनी त्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
जर तुम्ही हायपरग्लायसेमिया वर उपचार घेत असल्यास हळदीचे सेवन टाळा. यामुळे ग्लुकोजचे प्रमाण अचानकपणे कमी होऊ शकते.
तुमच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्यास हळद टाळा. यामुळे रक्त पातळ होते.
पित्ताशयाचे खडे झाल्यास हळदीचे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा.
अतिप्रमाणात हळदीचे सेवन केल्यास अॅक्ने, अल्सर, पोटदुखी यांसारख्या समस्या वाढू शकतात. म्हणून स्तनपान देणार्या व गरोदर स्त्रियांनी हळदीचे सेवन प्रमाणात करावे.
संबंधित दुवे
मधुमेहींसाठी खास औषधी चहाचे 5 पर्याय !
मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय